Home » बाळासाहेब व शरद पवारांनी सुरू केलेलं एक ‘फ्लॉप’ मासिक

बाळासाहेब व शरद पवारांनी सुरू केलेलं एक ‘फ्लॉप’ मासिक

बाळासाहेब व शरद पवारांनी काढलेल्या 'त्या' मासिकाची एकही प्रत उरली नाही कारण...

by Team Gajawaja
0 comment
balasaheb-sharad-pawar
Share

महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन विरुद्ध विचारधारेचे लोकप्रिय नेते म्हणजे शिवसेनेचे सर्वेसर्वा दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कर्ताधर्ता शरद पवार. (Balasaheb and Sharad Pawar) या दोघांच्या राजकीय भूमिकांमध्ये जमीन आसमानाचं अंतर असलं तरी हे दोघेही एकेमकांचे उत्तम मित्र पहिले आणि मग राजकीय आणि वैचारिक विरोधक होते.

राजकीय क्षेत्रात दोघे कधीच एकत्र आले नसले तरी या दोघांनी मिळून एक मासिक काढलं होतं. त्या मासिकाचं नेमकं नाव काय होतं आणि ते बंद का झालं? यामागील एक भन्नाट गोष्ट आपण जाणून घेणार आहोत.

 

pawar ani thackrey

 

१९६० साली बाळासाहेब ठाकरे (Balasaheb and Sharad Pawar) यांनी ‘फ्री प्रेस जर्नल’मधील नोकरी सोडली अन् यापुढे कधीही कुणाची चाकरी करणार नाही अशी खूणगाठ मनाशी बांधली. ‘शिवसेना’ सुरू करायचा विचार तेव्हा त्यांच्या मनात होताच.

याचदरम्यान बाळासाहेबांनी ज्यांचा शिवसेनेच्या स्थापनेत मोठा वाटा होता अशा भा. कृ. देसाई आणि आपले मित्र शरद पवार (Balasaheb and Sharad Pawar) व शशीशेखर वेदक यांच्याबरोबर एका आंतरराष्ट्रीय मासिकाची सुरुवात केली. या तिघांनी मिळून हे मासिक काढायचे ठरवले खरे पण या मासिकामागची कहाणीही मजेशीर आहे.

बाळासाहेब आणि शरद पवार (Balasaheb and Sharad Pawar) हे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक पण तरीही बऱ्याच राजकीय मंचावर हे दोघे एकत्र आलेले आपण पाहिलं आहे. दोघांमध्ये चांगली मैत्री होती, खासगीमध्ये बाळासाहेब शरद पवारांबरोबर जेवढी थट्टा मस्करी करायचे तितकेच त्यांच्याविषयी जाहीर सभेत बोलताना ते आक्रमक आणि कठोर व्हायचे.

पवारही बाळसाहेबांवर (Balasaheb and Sharad Pawar) टीका करत असत पण कधीच या टिकांमुळे किंवा सभांमुळे त्यांचे मित्रत्वाचे संबंध खराब झाले नाहीत किंवा त्यांच्या मैत्रीत फुट पडली नाही. राजकीय स्तरावर एकमेकांना विरोध करत दोघांनी त्यांची मैत्रीही जपली. शिवाय पवार आणि ठाकरे यांचा राजकारणातला उगमही एकाच काळात झाला.

===

हेदेखील वाचा : २५० वर्षं जुना, पेशवेकालीन इतिहासाची साक्ष देणारा ‘लकडी पूल’

===

या दोघांनी त्यांच्या तरुणपणात सुरू केलेल्या मासिकाविषयीचा किस्सा खुद्द शरद पवार यांनी त्यांच्या ‘On My Terms from the Grassroots to the Corridors of Power’ या आत्मचरित्रात सांगितला आहे.

जेव्हा बाळासाहेब आणि शरद पवार  (Balasaheb and Sharad Pawar) यांनी मासिक सुरू करायचा निर्णय घेतला तेव्हा त्यात नेमकं काय असावं आणि असू नये यावर चर्चा सुरू झाली. यानंतर ‘राजनीति’ हे मासिकाचे नावही पक्के करण्यात आले. सगळं अगदी ठरल्याप्रमाणे होत होतं, अखेर मासिकाचा पहिला अंक हाती पडला आणि बाळासाहेबांनी एक इच्छा बोलून दाखवली. बाळासाहेब

यांच्या एक भगिनी होत्या ज्यांना भविष्यात काय होईल याचा अंदाज येत असे, त्यांच्याकडे जणू दैवी शक्तिच होती असं म्हंटलं जायचं. याबद्दल बाळसाहेब यांनी शरद पवार, (Balasaheb and Sharad Pawar) शशीशेखर वेदक आणि भा. कृ. देसाई यांना सांगितलं.

 

sharad pawar and balasaheb

 

यानंतर मासिक प्रकाशनासाठी योग्य दिवस, तारीख कोणती हे ठरवण्यासाठी ते चौघेही बाळासाहेबांच्या भगिनी यांच्याकडे गेले. त्यांनी मासिकाचा पहिला अंक प्रकाशित करण्यासाठी एक योग्य तारीख सांगितली तसेच पहिली प्रत सिद्धीविनायकासमोर ठेवायचा सल्लाही त्यांना दिला. “या मासिकाचे भविष्य उज्ज्वल असून, याची एकही प्रत बाजारात उरणार नाही” असं भाकीतही बाळासाहेबांच्या (Balasaheb and Sharad Pawar) भगिनींनी केलं.

त्यांनी सांगितल्याप्रमाणेच या चौघांनी या सगळ्या गोष्टी केल्या आणि मासिकाच्या प्रतिक्रियांची वाट बघू लागले, पण बरेच दिवस उलटून गेले तरी मासिकाबद्दल कुठेच चर्चा किंवा भाष्य होताना दिसत नव्हतं. इतकंच नव्हे तर कोणत्याच स्टॉलवरही हे मासिक उपलब्ध नव्हतं.

यानंतर चौघांनी असं नेमकं का झालं याचा छडा लावायचं ठरवलं. तेव्हा त्यांना एक गोष्ट समजली ती म्हणजे या मासिकाची कुणीच मागणी न केल्याने छापलेली सगळी मासिके ही विक्रेत्याच्या कपाटात पडून होती. त्यांचा मासिकाचा हा पहिलाच प्रयत्न ‘फ्लॉप’ गेला.

मासिक निघूनही ते कुठेच कुणीच घेतलं नाही अन् अखेर त्यांना या प्रोजेक्टचा गाशा गुंडाळावा लागला. बाळासाहेबांच्या बहिणीने केलेलं ‘एकही प्रत बाजारात उरणार नाही..’ हे भाकीत मात्रठरले पण ते अशारीतीने खरे ठरेल याचा विचार त्यांनीही कधीच केला नसेल.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.