Home » इंदिरा गांधींच्या सरकारने श्रीलंकेला सोपवलेल्या कच्चातिवु बेटाची कथा

इंदिरा गांधींच्या सरकारने श्रीलंकेला सोपवलेल्या कच्चातिवु बेटाची कथा

आरटीआयला मिळालेल्या उत्तरानंतर तमिळनाडूमध्ये कच्चातिवु बेट श्रीलंकेला सोपवल्याच्या मुद्द्याने जोर धरला आहे. आरटीआयच्या मते, वर्ष 1974 मध्ये तत्कालीन इंदिरा गांधी सरकारने कच्चातिवु बेट श्रीलंकेला सोपवले होते.

by Team Gajawaja
0 comment
Kachchatheevu Island
Share

Kachchatheevu Island : आरटीआयला मिळालेल्या उत्तरानंतर तमिळनाडूमध्ये कच्चातिवु बेट श्रीलंकेला सोपवल्याच्या मुद्द्याने जोर धरला आहे. आरटीआयच्या मते, वर्ष 1974 मध्ये तत्कालीन इंदिरा गांधी सरकारने कच्चातिवु बेट श्रीलंकेला सोपवले होते. तमिळनाडूतील भाजपचे अध्यक्ष के. अन्नामलाई यांनी या बेटासंदर्भात एक आरटीआय अर्ज दाखल केला होता. या अर्जावर उत्तर आल्यानंतर राजकीय वातावरण तापले गेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच आपल्या ट्विटमध्ये कच्चातिवु बेटाचा उल्लेखही केला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये लिहिले होते की, डोळे उघणारी आणि धक्कादायक बाब. नव्या तथ्यांमधून कळतेय की, कशाप्रकारे काँग्रेसने अमानुषपणे कच्चातिवुला सोडले. यामुळे प्रत्येक भारतीय नाराज आहे. काँग्रेसवर कोणीही विश्वास ठेवू शकत नाही. भारताची एकता, अखंडता आणि हिताला कमकुवत करण्याचे काम 75 वर्ष काँग्रेसने केले आहे. जाणून घेऊया कच्चातिवु बेटाचा इतिहास….

कच्चातिवु बेट कुठेय आणि काय आहे नेमका वाद?
कच्चातिवु बेट हिंद महासागरात भारताच्या दक्षिण दिशेला आहे. 285 एकर जमिनीवर विस्तारलेले कच्चातिवु बेट भारताच्या रामेश्वरम आणि श्रीलंकेदरम्यान आहे. 17 व्या शतकात हे बेट मदुराईचा राजा रामानंद यांच्या ताब्यात होते. इंग्रजांच्या शानसकाळात कच्चातिवु बेट मद्रास प्रेसीडेंसींकडे आले. त्याकाळात हे बेट मत्सपालनासाठी एक महत्त्वाचे ठिकाण होते. हेच कारण होते की, भारत आणि श्रीलंका आपापसात मच्छिमारीवरून या बेटावर आपला हक्क असल्याचा दावा करायचे. स्वातंत्र्यानंतर समुद्राच्या सीमेबद्दल वर्ष 1974-76 दरम्यान चार करार झाले होते. कराराअंतर्गत भारतीय मच्छिमारांना बेटावर आराम करणे आणि मासेमारीसाठी वापरली जाणारी जाळी सुकवण्यास परवानगी देण्यात आली. याशिवाय बेट श्रीलंकेला सोपवण्यात आले.

श्रीलंकेला का दिले बेट?
वर्ष 1974 मध्ये भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि श्रीलंकेचे राष्ट्रापती श्रीमावो भंडारनायके यांच्यामध्ये एक करार झाला होता. कराराअंतर्गत श्रीलंकेला कच्चातिवु बेट सोपवण्यात आले. या कराराबद्दल 26 जूना कोलंबो आणि 28 जूनला दिल्लीत दोन्ही देशांमध्ये बातचीत झाली होती. बैठकीनंतर काही नियम आणि अटींसह बेट श्रीलंकेला सोपवण्यात आले होते.(Kachchatheevu Island )

अट अशी होती की, भारतीय मच्छिमारांना बेटावर मासेमारीसाठी वापरले जाणारे जाळे सुकवणे आणि आराम करण्याची परवानगी असणार आहे. यामध्ये असेही म्हटले होते की, या बेटावरील चर्चमध्ये जाण्यास भारतीयांना व्हिसाशिवाय जाण्यास परवानगी नसणार आहे. याव्यतिरिक्त भारतीय मच्छिमारांना कच्चातिवु बेटावर मासेमारी करता येईल.

तत्कालीन तमिळनाडू मुख्यमंत्र्यांनी केला होता विरोध
जेव्हा इंदिरा गांधी यांनी श्रीलंकेला बेट सोपवले असता तमिळनाडूत जोरदार विरोध झाला होता. तमिळनाडूचे तत्कालीन मुख्यमंत्री करुणानिधी यांनी विरोध केला होता. याबद्दल वर्ष 1991 मध्ये तमिळनाडू विधानसभेत प्रस्ताव पारित करण्यात आला होता. प्रस्तावात कच्चातिवु बेटाला आपल्याकडे घेण्याची मागणी करण्यात आली होती. हे प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचले गेले होते.

वर्ष 2008 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता यांनीही सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. याचिकेत कच्चातिवु बेटासंदर्भात झालेला करार अमान्य असल्याचे घोषित करावे अशी मागणी केली होती. याचिकेत असेही म्हटले होते की, गिफ्ट म्हणून कच्चीतिवु बेट श्रीलंकेला देणे असंविधानिक आहे. कच्चातिवु बेटासंदर्भाव सातत्याने राजकीय वाद निर्माण झाले. वर्ष 2011 मध्ये जयललिता पुन्हा तमिळनाडूच्या मुख्यमंत्री झाल्या तेव्हाही विधानसभेत कच्चातिवु बेटासंदर्भात प्रस्ताव पास केला. (Kachchatheevu Island )

सध्याची स्थिती काय?
सध्या तमिळनाडूतील कही भागातील मासे संपुष्टात आले आहेत. भारतीय मच्छिमार कधीकधी आंतरराष्ट्रीय सीमा पार करच कच्चातिवु बेटावर पोहोचतात. काहीवेळेस भारतीय मच्छिमारांना श्रीलंकेतील नौसेनेने ताब्यातही घेतले होते. याबद्दलच्या बातम्याही येतात. आता लोकसभेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा कच्चातिवु बेटाचा मुद्दा तापला गेला आहे.


आणखी वाचा :
नॉर्थ कोरियाकडून स्पाय सॅटेलाइट लॉन्च
EVM मशीनचे बटण दोन वेळेस दाबले तर काय होईल?
भारतातील मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांना किती असतो पगार?

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.