Home » नॉर्थ कोरियाकडून स्पाय सॅटेलाइट लॉन्च

नॉर्थ कोरियाकडून स्पाय सॅटेलाइट लॉन्च

उत्तर कोरियाने जगाला पुन्हा एकदा तंत्रज्ञानाच्या मदतीने घाबरवण्याचे काम सुरु केले आहे. उत्तर कोरियाच्या अधिकाऱ्यांचे असे म्हणणे आहे की, त्यांनी स्पेसमध्ये आपले पहिले सॅटेलाइट लॉन्च केले आहे.

by Team Gajawaja
0 comment
North Korea
Share

उत्तर कोरियाने जगाला पुन्हा एकदा तंत्रज्ञानाच्या मदतीने घाबरवण्याचे काम सुरु केले आहे. उत्तर कोरियाच्या अधिकाऱ्यांचे असे म्हणणे आहे की, त्यांनी स्पेसमध्ये आपले पहिले सॅटेलाइट लॉन्च केले आहे. हे प्रक्षेपण जपान आणि दक्षिण कोरियाच्या विरोधाच्या ठिक एक दिवसानंतर केले गेले आहे. (North Korea)

उत्तर कोरियाच्या आंतराळ एजेंसीचे असे म्हणणे आहे की, त्यांनी आपला पहिला स्पाय उपग्रह मल्लीगयोंग-१ उपग्रह यशस्वीपणे कक्षेत स्थापन केला आहे. उत्तर कोरियाने संयुक्त राज्य अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांकडून होणारा आंतरराष्ट्रीय निषेध फेटाळून उत्तर कोरियाने हा गुप्तचर उपग्रह प्रक्षेपित केला आहे.

नॅशनल एयरोस्पेस टेक्नॉलॉजी अॅडमिनिस्ट्रेशनच्या अधिकाऱ्यांनी असे म्हटले की, मल्लीगयोंग-१ उपग्रह मंगळवारी रात्री १० वाजून ४२ मिनिटांनी सोहे सॅटेलाइट लॉन्च फॅसिलिटीच्या माध्यमातून लॉन्च केला. याने १०:४५ मिनिटावर उत्तर कोरियाच्या राज्यातील कक्षेत प्रवेश केला.

North Korea's spy satellite is a big deal, regardless of how advanced its technology is | North Korea | The Guardian

असे मानले जात आहे की, उत्तर कोरियाकडून येणाऱ्या दिवसात आणखी काही सॅटेलाइट स्पेस मध्ये पाठवले जाऊ शकतात. राष्ट्राध्य७ किम जोंग उन लोक त्या दिशेने सातत्याने प्रयत्न करत आहेत. हे स्पाय सॅटेलाइट्स उत्तर कोरियाच्या सैन्यासाठी आंतराळातील डोळा म्हणून काम करेल. जेणेकरुन सैन्य क्षमता अधिक वाढली जाईल आणि सर्विलांसमध्ये मदत करेल.

उत्तर कोरियाने स्पाय उपग्रहाला कक्षेत स्थापन करण्यापू्र्वी दोन वेळेस प्रयत्न सुद्धा केले होते. पण ते अयशस्वी ठरले. यापूर्वी मे महिन्यात आणि ऑगस्ट महिन्यात याच्या प्रक्षेपणाचा प्रयत्न केला होता. परंतु तो पूर्ण झाला नाही. कोरियाचे असे म्हणणे आहे की,त्यांना आपल्या कॉम्पिटिटरच्या एक पाऊल पुढे जाण्यासाठी अशा प्रकारच्या स्पाय सॅटेलाइटची गरज आहे. (North Korea)

दुसऱ्या बाजूला उत्तर कोरियाच्या या स्पाय सॅटेलाइटच्या लॉन्चिंगनंतर जपान आणि युएसने विरोध दर्शवला आहे. ऐवढेच नव्हे तर जपानने ओकिनावाच्या दक्षिण प्रांतातील स्थानिकांना अलर्टही जारी केला आहे. दक्षिण कोरियाने उत्तर कोरियाला इशारा दिला आहे की, अशा प्रकारच्या स्पाय सॅटेलाइटचे लॉन्चिंग करू नये. या इशाऱ्यानंतर ठिक एका दिवसांनी उत्तर कोरियाने याचे प्रक्षेपण केले आहे.


हेही वाचा- चीन मधून बेपत्ता होतायत मंत्री


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.