Home » माउंट एवरेस्ट नव्हे तर मौना केआ जगातील सर्वाधिक उंच पर्वत?

माउंट एवरेस्ट नव्हे तर मौना केआ जगातील सर्वाधिक उंच पर्वत?

by Team Gajawaja
0 comment
Highest Mountain
Share

जगातील सर्वाधिक उंच पर्वत कोणता आहे हे आपल्या सर्वानांच माहिती आहे. कोणालाही या बद्दल विचारले तर तो माउंट एवरेस्ट हेच उत्तर देईल. मात्र तुम्हाला म्हटले हे उत्तर चुकीचे आहे तर तुम्ही हैराण व्हाल. असे असू शकते की, एखादा यामधेच बोलेल मज्जा केली. मात्र खरंतर माउंट एवरेस्टपेक्षा सुद्धा सर्वाधिक उंच पर्वत आहे. (Highest Mountain)

सायन्स फोकसने या संबंधित एक रिपोर्ट्स पब्लिश केला आहे. त्यात त्यांनी असे म्हटले आहे की, जगातील सर्वाधिक उंच पर्वत हा माउंट एवरेस्ट नाही. रिपोर्टमध्ये याचे कारण सुद्धा सांगितले आहे. अशातच त्यांचा हा रिपोर्ट तु्म्हाला हैराण करू शकतो.जगातील सर्वाधिक उंच पर्वत वास्तवात नेपाळ मध्ये नव्हे तर अमेरिकेत आहे. हवाई मध्ये एक सुप्त ज्वालामुखी आहे, मौना केआ. याला वैज्ञानिक जगातील सर्वाधिक उंच पर्वत असल्याचा दावा करतात. त्यांनी आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ काही तर्क सुद्धा समोर ठेवले आहेत.

संशोधकांच्या मते, माउंट एवेस्ट वास्तवात समुद्र सपाटीपासूनचा जगातील सर्वाधिक उंच पर्वत आहे. याची उंची समुद्र सपाटीपासून ८८४९ मीटर आहे. जो जगातील सर्वाधिक उंचीवर आहे. मात्र तांत्रिक रुपात समुद्र सपाटीच्या खालून सुद्धा एखादा डोंगर, पर्वतरांगा असतात. ज्यावर कधीच विचार केला गेला नाही.

Highest Mountain
Highest Mountain

समुद्राच्या आतमधून ते समुद्राच्या वर पर्यंत जगतील सर्वाधिक उंच पर्वत मौना केआ असल्याचे सांगितले जाते. हा दीर्घकाळापासून एक निष्क्रिय ज्वालामुखी आहे. याची एकूण उंची १०२०५ मीटर आहे. तर माउंट एवरेस्टची उंची ८८४९ मीटर आहे. याच कारणास्तव मौना केआ हा सर्वाधिक उंच पर्वत आहे. मौना केआचा सर्वाधिक भाग हा प्रशांत महासागराच्या आतमध्ये आहे.डोंगराचा जवळजवळ ६ हजार मीटर हिस्सा हा समुद्राखाली आहे. तर ४२०५ मीटर समुद्र तलावर आहे. एकूणच मौना केआ एवरेस्ट पेक्षा १.४ किमी लांब आहे.

संधोधकांच्या मते मौना केआ जवळजवळ ४५०० वर्षांपासून निष्क्रिय आहे. मात्र अमेरिकन भुवैज्ञानिक सर्वेक्षणाने दावा केला आहे की, तो कधीही फुटू शकतो. मौना केआनंतर हवाईत सक्रिय ज्वालामुखी मौना लोआ पृथ्वीवरील सर्वाधिक उंच पर्वत आहे. याची एकूण उंची ९.१७ किमी आहे. (Highest Mountain)

हेही वाचा- अत्यंत अवघड अशी श्रीखंड महादेव यात्रा

पृथ्वीवरील सर्वात उंच पर्वत सूर्यमालेतील सर्वात उंच पर्वतांच्या तुलनेत कोठेही उभे नाहीत. मंगळावरील ऑलिंपस मॉन्सच्या नावावर सूर्यमालेतील सर्वात उंच पर्वताचा विक्रम आहे. Olympus Mons तळापासून वरपर्यंत सुमारे २१.९ किमी लांब आहे, जे मौनापेक्षा दुप्पट आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.