Home » Bastille Day म्हणजे काय? जाणून घ्या इतिहास

Bastille Day म्हणजे काय? जाणून घ्या इतिहास

by Team Gajawaja
0 comment
Bastille Day
Share

गेल्या काही दिवसांपासून फ्रांन्समध्ये तणावाची स्थिती असतानाच बॅस्टिल दिवस साजरा करण्याची तयारी जोरदार सुरु झाली आहे. बॅस्टिल दिनानिमित्त होणाऱ्या परेडमध्ये यंदा भारतीय सैन्य दलाचा सुद्धा समावेश असणार आहे. अशातच भारत आणि फ्रांन्स मधील नातेसंबंध अधिक सुधारण्यासह काही महत्त्वाचे करार होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.(Bastille Day)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदा बॅस्टिल दिनानिमित्त होणाऱ्या परेडमध्ये सन्मानित अतिथी म्हणून उपस्थितीत राहणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी फ्रांन्समध्ये जय्यत तयारी केली जात आहे. फ्रांन्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी पीएम मोदी यांना बॅस्टिड दिनानिमित्त होणाऱ्या परडेसाठी उपस्थितीत राहण्यासाठी आमंत्रण पाठवले आहे. खास गोष्ट अशी की, भारतीय सैन्य दल सुद्धा बॅस्टिल दिनानिमित्त परेडमध्ये दिसून येणार आहेत.

बॅस्टिल डे परेडला फ्रांन्समध्ये राष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो. ही जगातील सर्वाधिक जुन्या सैन्य परेडपैकी एक आहे. याचे आयोजन १४ जुलैला केले जाते. प्रत्येक वर्षी बॅस्टिल दिवसानिमित्त एक प्रसिद्ध एवेन्यू डेस चॅप्स-एलिसीसवर एक सैन्य परेड होते.येथे या दिवशी असे दृष्य पहायला मिळते जसे भारतात स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त असते.

बॅस्टिल दिवसाचा इतिहास
बॅस्टिल दिवस एक प्रकारे फ्रांन्सच्या क्रांतीच्या रुपात समजला जातो. बॅस्टिल वास्तवात एक किल्ला किंवा जेल होते. येथे राजाच्या आदेशावर कैद्यांना शिक्षा दिली जायची. त्यामध्ये काही राजकीय कैदी सुद्धा होते. सतराव्या शतकात बॅस्टिल ही एक भीती होती. मात्र १४ जुलै १७८९ रोजी राजेशाही विरोध क्रांतिकाऱ्यांनी त्यावर हल्ला केला. क्रांतिकाऱ्यांनी या दरम्यान सात कैद्यांचा जीव वाचवला होता. अशा प्रकारे बॅस्टिलचा किल्ला ध्वस्त झाला. तेव्हापासून फ्रांन्समधील सर्वसामान्य जनता या दिवसाला विजय दिवसाच्या रूपात साजरा करतात.(Bastille Day)

बॅस्टिलवर ताबा मिळवणे हा फ्रांसीसी क्रांतीची सुरुवात होतेय असा संकेत होता. अशा प्रकारेच ते प्राचीन राजेशाहीच्या शासनाच्या अंतापर्यंत प्रतीक बनले होते. हेच कारण आहे की, बॅस्टिल दिवसानिमित्त फ्रांन्समध्ये लोकशाहीच्या स्वातंत्र्याचा दिवस साजरा केला जात असल्यासारखे दिसून येते. खासकरून पॅरिसला रंगांनी सजवले जाते. ठिकठिकाणी अनोखी सजावट केली जाते. फटाके उडवले जातात. आकाशात वायुसेना आपली कामगिरी दाखवते.(Bastille Day)

हेही वाचा- G20 म्हणजे नक्की काय, भारताकडे किती वर्ष असणार अध्यक्षपद?

बॅस्टिल दिनानिमित्त देशभरात सुट्टी असते. या दिवसाला राष्ट्रीय स्तरावर साजरा करण्याची सुरुवात १८८० मध्ये झाली होती. सुरुवातीपासूनत या दिवशी आतिशबाजी आणि सैन्य परेड व्हायचे. सार्वजनिक उत्सवाव्यतिरिर्त देशाच्या नावाने संबोधन ही केले जाते. आधी तर १४ तारखेला विशेष आयोजनाव्यतिरिक्त जुलैच्या संपूर्ण महिन्यात नृत्य, गायन आणि मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जायचे. मात्र कालांतराने हे आयोजन एका मर्यादेपर्यंतच टिकून राहिले. कोरोनाच्या परिस्थितीनंतर आता पुन्हा एकदा बॅस्टिल दिवसाची धुम फ्रान्समध्ये येत्या १४ जुलैला पहायला मिळणार आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.