Home » IB आणि RAW मधील नेमका फरक काय?

IB आणि RAW मधील नेमका फरक काय?

जगभरातील देश आपल्या शत्रूंना दूर ठेवण्यासाठी बजेटमध्ये एक मोठी रक्कम देशाच्या सुरक्षिततेसाठी तरतूद करते.या रक्कमेतून आधुनिक हत्यारे खरेदी केली जातात किंवा अशा संघटना तयार केल्या जातात ज्या देशाच्या सुरक्षिततेसाठी योगदान देतील.

by Team Gajawaja
0 comment
IB Vs RAW
Share

जगभरातील देश आपल्या शत्रूंना दूर ठेवण्यासाठी बजेटमध्ये एक मोठी रक्कम देशाच्या सुरक्षिततेसाठी तरतूद करते.या रक्कमेतून आधुनिक हत्यारे खरेदी केली जातात किंवा अशा संघटना तयार केल्या जातात ज्या देशाच्या सुरक्षिततेसाठी योगदान देतील. अमेरिकेजवळ CIA, रशियाची KGB, इज्राइलकडे मोसाद अशा काही संघटना आहेत. तर भारतात सुद्धा IB, RAW सारखी गुप्त एजेंसी आहेत. ज्या देशात वाढणाऱ्या धोक्यांना आधीच ओळखते. या दोन्ही एजेंसीचे उद्देश एक असले तरीही त्यांची काम करण्याची पद्धत मात्र वेगळी आहे. (IB vs RAW)

IB (इंटेलिजेंस ब्युरो) म्हणजे काय?
इंटेलिजेंस ब्युरो देशाअंतर्गत सुरक्षितता बाळगतात. ही एजेंसी गृहमंत्रालयाअंतर्गत काम करते. याची स्थआपना १८८७ मध्ये केंद्रीय विशेष शाखेच्या रुपात करण्यात आली होती. १९२० मध्ये त्याला इंटेलिजेंस ब्युरो असे नाव दिले गेले. याचे प्रमुख काम राष्ट्रीय सुरक्षेच्या हालचालींवर लक्ष ठेवणे. खास गोष्ट अशी की, याची ओळख जगातील सर्वाधिक जुन्या गुप्त एजेंसीपैकी एक आहे.

रिसर्च अॅन्ड एनालिसिस विंगबद्दल पाहूयात
स्थापनेच्या वेळी आयबीकडे देशाअंतर्गत आणि बाहेरील गुप्त माहितीची जबाबदारी होती. १९६८ मध्ये आयबीला केवळ अंतर्गत सुरक्षिततेची जबाबदारी सोपवली होती आणि नवी रिसर्च अॅन्ड अॅनालिसीस विंग म्हणजेच RAW ची स्थापना झाली. खरंतर १९६२ आणि १९६५ च्या युद्धा दरम्यान आयबी त्या प्रकारची गुप्त सुचना एकत्रित जमा करण्यास विफोल ठरली ज्याची भारताला गरज होती. त्यामुळेच रॉ ची स्थापना केली गेली. रॉ थेटपणे गुप्त माहिती एकत्रित करुन भारतीय सैन्याला देते. याचे मुख्य काम चीन आणि पाकिस्तानच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे आहे.

रॉ आणि आयबी मध्ये आहे हा फरक
रॉ देशातील अॅनालिसिस विंग आहे जी बाहेरील धोक्यांबद्दल सुचना देता. तर आयबीचे काम देशाअंतर्गत धोक्यांची माहिती एकत्रित करणे. आयबी दहशतवाद विरोधी, काउंटर इंटेलीजेंस, सीमावर्ती क्षेत्रांची गुप्त माहिती एकत्रित करते. तर रॉ बाजूच्या देशातील गुप्त हालचालींबद्दल माहिती एकत्रित करते. आयबी गृहमंत्रालयाला रिपोर्ट करते तर रॉ थेट पंतप्रधान कार्यालयाला रिपोर्ट करते. (IB vs RAW)

हेही वाचा- Zero एफआयआर म्हणजे नक्की काय?

तर आयबी आणि रॉ मध्ये नियुक्तीचे वेगवेगळे नियम आहेत. खासकरुन आयबीमध्ये जे अधिकारी तैनात केले जातात ते भारतीय पोलीस सेवा, ईडी आणि सैन्यातील असतात. तर रॉसाठी आपले कॅडर आहे. ज्याला आरएसएसच्या रुपात ओळखले जाते. रॉ ची स्थापना झाली तेव्हा यामध्ये सुद्धा सैन्य, पोलीस आणि अन्य संघटनांच्या टॉप क्लास अधिकाऱ्यांना घेतले जायचे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.