Home » शनिग्रहावर एलियनची वस्ती?

शनिग्रहावर एलियनची वस्ती?

by Team Gajawaja
0 comment
Alien settlement
Share

2023 च्या सुरुवातीला बल्गेरियन भविष्यवक्ता बाबा वेंगाच्या भविष्यवाणीनं धुमाकूळ घातला होता. बाबा वेंगाच्या भविष्यवाणीनुसार 2023 हे वर्ष सर्वाधिक घातक वर्ष असणार आहे. या वर्षात कुठे जोरदार पाऊस होईल, तर कुठे प्रचंड उष्म्याचा सामना करावा लागणार आहे. तर आग लागण्याच्याही मोठ्या घटना होणार आहेत. याशिवाय बाबा वेंगाच्या आणखी एका भविष्यवाणीनं सर्वांचे लक्ष वेधले होते, ती भविष्यवाणी म्हणजे, या 2023 मध्ये एलियन म्हणजेच परग्रही पृथ्वीवर आक्रमण करणार. परग्रहींचा वावर पृथ्वीवर वाढणार… बाबा वेंगाच्या इतर भविष्यवाणींची कोणी फार दखल घेतली नसली तरी या भविष्यवाणीची मात्र खूप चर्चा झाली. कारण एलियनबाबत पृथ्वीवरील तमाम नागरिकांच्या मनात कमालीची उत्सुकता आहे. पृथ्वीच्या बाहेर खरोखरच आणखी कुठे मानवी वस्ती आहे का? हे जाणण्यासाठी आतापर्यत अनेक प्रयत्न करण्यात आले आहेत. पण त्या प्रयत्नांना अपेक्षित असे यश आले नाही. अलिकडे काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या नासा या अंतराळ संशोधन संस्थेने एलियन संशोधनाबाबत एक समिती स्थापन केली आहे. मात्र आता या सर्वांपलिकडे एक बातमी आली आहे. ती म्हणजे, ज्या ग्रहाचा तमाम हिंदू धर्मियांना धाक आहे, अशा शनीग्रहावर एलियन वस्ती (Alien settlement) असल्याची माहिती आली आहे. खुद्द नासानेच अशी शक्यता वर्णन केली आहे.(Alien settlement)  

पृथ्वीचा चंद्र आणि गुरूचा युरोपा व्यतिरिक्त, शनीचा सहावा सर्वात मोठा चंद्र एन्सेलाडस आहे. त्याच्यावर पाणी अस्तित्वात असल्याचा शोध लागला आहे. यामुळेच खगोलशास्त्रज्ञांचे लक्ष या ग्रहाकडे लागले आहे. अलीकडील अभ्यासात एन्सेलाडसवर मोठ्या प्रमाणात फॉस्फेट आढळले आहे. शनीग्रहाच्या चंद्रावर फॉस्फेट आढळल्यामुळे शनीग्रहावरही पाणी आणि त्याबरोबर जीवन असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नासाने एन्सेलाडसवर फॉस्फेटचे मोठे प्रमाण शोधले आहे. फॉस्फरस हा फॉस्फरसचा नैसर्गिक स्त्रोत आहे. हाच घटक जीवनाचा मुख्य स्त्रोत मानला जातो. (Alien settlement) 

शनीच्या सहाव्या क्रमांकाचा सर्वात मोठा चंद्र असलेल्या एन्सेलाडसवर जीवसृष्टी अस्तित्वात असल्याची आशादायक चिन्हे आहेत. नासाच्या सेवानिवृत्त कॅसिनी अंतराळयानाच्या माहितीवरुन आता शनीच्या या चंद्राचे संशोधन सुरु झाले आहे. हे संशोधन करणा-या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, फॉस्फेट खडकाळ खनिजांमध्ये अडकलेले नाहीत, परंतु चंद्राच्या द्रव समुद्राच्या पाण्यात क्षार म्हणून विरघळल्याच्या स्वरुपात आढळले आहेत. एन्सेलॅडसच्या बर्फाळ पृष्ठभागावर लांब, सापासारख्या लाटा असल्याचे नासाला दिसले आहे. 

यातून  बर्फाचे कण आणि पाण्याची वाफ यांच्यापासून बनलेला धूर बाहेर निघत असल्याचे आढळून आले आहे. गेल्या महिन्यात, संशोधकांनी उघड केले की, त्यांना एन्सेलाडसच्या दक्षिण ध्रुवावरून एक मोठा प्लम आढळला आहे जो जीवनाचे लक्षण असू शकतो. खारट द्रव पाण्याचा हा महासागर, चंद्राचा खडकाळ गाभा आणि बर्फाचा चमकदार पांढरा कवच यांच्या मधोमध आहे. त्याची जाडी किमान 12 मैल आहे. हिच शास्त्रज्ञांसाठी सर्वात आशादायक गोष्ट आहे. कारण पृथ्वीवरील महासागरांशिवाय इतर कोठेही फॉस्फरस आढळून आलेला नाही. नवीन संशोधनाचे नेतृत्व करणाऱ्या बर्लिनमधील फ्री युनिव्हर्सिटीच्या तज्ज्ञांच्या मते, याचा अर्थ आपल्या सूर्यमालेतील जीनवाचा शोध घेणा-या मोहिमेला कुठेतरी आशेचा दिवा दिसला आहे. (Alien settlement)

=======

हे देखील वाचा : पावसाळ्यात घरात माश्या त्रास देतात… ‘या’ टीप्स येतील कामी

=======

कारण फॉस्फेट हा फॉस्फरसचा नैसर्गिक स्रोत आहे, जो वनस्पतींना त्यांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी आवश्यक असलेल्या सर्व पोषक तत्वांपैकी एक चतुर्थांश घटक पुरवतो. एकूण काय शनीच्या चंद्रावर आणि पर्यायानं शनीवरही परग्रही वास्तव्य करुन आहेत का? यावर आता संशोधन करण्यात येत आहे. ही सर्व माहिती पुढे येत असतांनाच ग्वेन ब्लाइड नावाची महिला चर्चेत आली आहे. या महिलेनं चक्क 30 वर्षापूर्वी आपले एलियनने अपहरण केल्याचे सांगितले आहे. ग्वेन 18 वर्षाची असतांना तिला रात्री काही विचित्र माणसांनी पळवल्याचे सांगितले आहे.  आता 47 वर्षाची असलेली ग्वेनला यासंदर्भात आता  काहीही आठवत नसले तरी तिला पळवून नेणा-यांचे हात हिरव्या रंगाचे असल्याचे फक्त ग्वेनला आठवत आहे. ग्वेनच्या या दाव्याचा आता आणखी तपास होत आहे. पण बाबा वेंगाच्या भविष्यवाणीतील एलियन प्रत्यक्ष पृथ्वीवर येणार की नाही, हे स्पष्ट नसले तरी मानवाला त्यांच्याबाबत अधिक उत्सुकता लागली आहे, हे मान्य करावे लागेल.

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.