Home » मुकेश अंबानींचे हे आहेत 5 अरबपति शेजारी

मुकेश अंबानींचे हे आहेत 5 अरबपति शेजारी

by Team Gajawaja
0 comment
Mukesh Ambani Neighbors (1)
Share

एशियातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी हे किती श्रीमंत आहेत याबद्दल बोलू तेवढे फार कमी आहे. अंबानी परिवार आपल्या लग्जरी लाइफस्टाइलसाठी ओळखला जातो. ते ज्या घरात राहतात जे सुद्धा जगातील सर्वाधिक दुसरे महागडे घर आहे. मुकेश अंबानी हे अल्टामाउंट रोडजवळ राहतात. तुम्ही हे ऐकून हैराण व्हाल की, हा रोड एशियातील सर्वाधिक महागड्या रोड पैकी एक आहे. याला Billionaires Row अशा नावाने सुद्धा ओळखले जाते. हा जगातील सर्वाधिक दहावा महागडा रोड आहे. खरंतर येथे काही अरबपतींचे घर आहे. (Mukesh Ambani Neighbors)

अंबानी यांच्या एंटालियाच्या आसपास काही अरबपती राहतात. त्यांच्याकडे बक्कळ संपत्ती आहे. अशातच जाणून घेऊयात अंबानी यांच्या अरबपती शेजाऱ्यांबद्दल अधिक.

मोतीलाल ओसवाल
मुकेश अंबानी यांच्या शेजाऱ्यांबद्दल बोलायचे झाल्यास या लिस्टमध्ये सर्वात पहिले नाव तीलाल ओसवाल यांचे येते. ओसवाल परिवार अंबानींच्या जवळच राहतात. मार्च २०२२ च्या रिपोर्ट्सनुसार मोतीलाल ओसवाल यांचे नेटवर्थ ४२४२.११ कोटी रुपये होते. मोतीलाल ओसवाल यांनी ३३ कोटी रुपयांचे डुप्लेक्स हाउस साउथ टॉवर मध्ये खरेदी केले आहे. रिपोर्ट्सनुसार त्यांचे घर अतिशय शानदार आणि रॉयल आहे.

नटरा चंद्रशेखरन
नटरा चंद्रशेखरन जनटाटा ग्रुपचे टाटा सन्स कंपनीचे चेअरमन आहेत. जे टाटा ग्रुपच्या काही कंपन्यांमध्ये सीईओ आणि निर्देशकच्या रुपात कार्यरत होते. नटरा चंद्रशेखरन यांनी २०२० मध्ये त्यानी एका टॉवरमध्ये ११ वा आणि १२ व्या फ्लोवर डुप्लेक्स फ्लॅट खरेदी केला होता. त्याची किंमत १०० कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. नटरा चंद्रशेखरन सर्वाधिक चार्ज करणारे भारतीय सीईओच्या लिस्टमधील एक आहेत. त्यांची कमाई १०९ कोटी रुपये आहे.

हर्ष जैन
एंटलिया जवळ आणखी एक अरबपती परिवार राहतो. ड्रीम ११ चे फाउंडर हर्ष जैन हे सुद्धा अंबानी यांचे शेजारी आहेत. पत्नी रचना जैन आणि फॅमिलीतील अन्य सदस्यांसोबत ते तेथे राहतात. त्यांनी आपले हे घर ७२ कोटींना खरेदी केले होते. त्यांचे घर फार सुंदर असल्याचे सांगितले जाते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांची एकूमण संपत्ती ८४७.८ कोटींहून अधिक आहे.

प्रशांत जैन
JSW चे सीईओ प्रशांत जैन सुद्धा अंबानी यांच्या बाजूला राहतात. खरंतर त्यांनी गेल्या वर्षात या परिसरात ५४ कोटींना एक डुप्लेक्स घर खेरीद केले होते. प्रशांत जैन या घरात आपल्या परिवारासोबत राहतात. (Mukesh Ambani Neighbors)

हेही वाचा- केवळ राजकरणच नव्हे तर क्रिकेट आणि कॉर्पोरेटमध्ये ही शरद पवारांची होते चर्चा

राणा कपूर
येस बँकेचे फाउंडर राणा कपूर सुद्धा अंबानी यांच्या शेजारी राहतात. ते मुंबईतील या प़श परिसरात २०१३ मध्ये १२८ कोटींचा रेजिडेंशियल कॉम्पेक्स खरेदी केला होता. राणा कपूर यांनी या इमारतीचे नाव खुर्शीदाबाद असे ठेवले आङे. त्याची सध्या किंमत १५० कोटी असल्याचे सांगितले जाते. यांची एकूण संपत्ती ४३ अरब रुपये आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.