Home » तृतीयपंथ्यांकडून मिळालेल्या 1 रुपयाचे ‘हे ‘ आहे महत्त्व

तृतीयपंथ्यांकडून मिळालेल्या 1 रुपयाचे ‘हे ‘ आहे महत्त्व

by Team Gajawaja
0 comment
Facts about transgender
Share

भारत हा विविध जाती-धर्मांचा सन्मान करणारा देश आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या भावना, परंपरा जपल्या जातात. प्रत्येक धर्मात, प्रांत किंवा जातीच्या काही परंपरा असतात. काही मान्यता ऐवढ्या सखोल आहेत की, त्या धर्म आमि प्रांताच्या मर्यादा मोडतात आणि त्यापैकीच एक म्हणजे तृतीयपंथांकडून दिला जाणारा एक रुपया. असे मानले जाते की, जर एखाद्या तृतीयपंथीने तुम्हाला एक रुपया दिला तर तुमचे नशीब पालटते. तुमच्यावर धन वर्षाव होण्याची शक्यता असते. मात्र असे नक्की का बोलले जाते किंवा खरंच असे होते का? याच प्रश्नांची उत्तर आपण आज जाणून घेऊयात.(Facts about transgender)

खरंतर तृतीयपंथ्यांनी दिलेला एक रुपयाचे नाणे वापरुन काही लोक बिझनेसची सुरुवात करतात. मात्र काही लोक असे असतात की, त्यांच्याकडे तो एक रुपया देण्याची मागणी करतात मात्र हे खरंच योग्य आहे का? एस्ट्रोलॉजीच्या मते दान धर्म आणि उपाय आपल्या आयुष्यात बदल घडवून आणतात. तृतीयपंथांकडून मिळालेल्या नाण्याची तुलना एखाद्या जादूशी केली जाते.

काही तृतीयपंथी हे चेला प्रथेचे पालन करतात. आजच्या काळात एक रुपयाला अधिक महत्त्व दिले जात नाही. मात्र तृतीयपंथ्यांच्या जगात याला फार मान दिला जातो. ते असे म्हणतात की, एक रुपया म्हणजे उत्तम नशीबाचे प्रतीक. मात्र तो योग्य पद्धतीने दिला गेला पाहिजे. जेव्हा ते आपल्याला एक रुपयाचे नाणे देतात. तेव्हा ते थेट हातात देत नाहीत. ते आपल्या डोक्याला, हातातील बांगड्या असो किंवा एखादा दागिना त्याला स्पर्श करुन तो तुमच्या हातात देतात. म्हणजेच तुमच्या पासून नकारात्मक उर्जा दूर व्हावी.

हेही वाचा- पौर्णिमेला आपले मन विचलित होण्यामागे ‘हे’ आहे कारण

तृतीयपंथांबद्दलच्या या काही गोष्टी सुद्धा माहितेयत का?

तृतीयपंथी लोक आपल्या आनंदात सहभागी होतात. असे म्हटले जाते की, त्यांनी दिलेले आशीर्वाद फार महत्त्वाचे असतात. मात्र त्यांच्या श्रापापासून दूरच रहावे असे ही म्हटले जाते. त्यांची आयुष्य जगण्याची पद्धत ही सामान्य लोकांपेक्षा फार वेगळी असते.

-तृतीयपंथीय समाजात एखादा नवा तृतीयपंथी आला तर जल्लोष केला जातो. सामूहिक जेवणाचे आयोजन केले जाते.
-एखाद्या नव्या तृतीयपंथ्याला समाजात घेण्यापूर्वी काही प्रकारच्या परंपरांचे पालन करावे लागते. त्यानंतरच त्याला या समुदायात येण्याची परवानगी असते.
-असे म्हटले जाते की, तृतीयपंथी लोक आपले आराध्य दैवत अरावन याच्यासोबत वर्षातून एकदा विवाह करतात. हे लग्न केवळ एकाच दिवसाचे असते.(Facts about transgender)
-तृतीयपंथी हे स्वत:ला मंगलमुखी मानतात. हेच कारण आहे की, ते केवळ विवाह आणि शुभ कार्यात सहभागी होतात.
-यांच्या आशीर्वादामुळे कोणताही वाईट काळ दूर होतो. अशी मान्यता आहे की, श्रीरामांना वनवासानंतर वरदान मिळाले होते की, त्यांच्याकडून एक नाणं घेऊन आपल्याकडे ठेवल्यास धनाची कमतरता दूर होते.
-कोणत्याही तृतीयपंथ्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार हे अगदी गुप्त पद्धतीने केले जातात. कोणत्याही व्यक्तीला त्यांच्या मृत्यू बद्दल ही कळत नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.