Home » देशातील अनोखे रेल्वे स्टेशन, 4 भाषांमध्ये प्रवाशांना दिली जाते सुचना

देशातील अनोखे रेल्वे स्टेशन, 4 भाषांमध्ये प्रवाशांना दिली जाते सुचना

रेल्वे भारताचा एक महत्त्वाचा हिस्सा मानला जातो. सध्याच्या काळात कोणत्या ना कोणत्या कारणास्तव एकमेकांना भेटण्यासाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी ट्रेनच्या माध्यमातून प्रवास केला जातो.

by Team Gajawaja
0 comment
Indian unique railway stations
Share

रेल्वे भारताचा एक महत्त्वाचा हिस्सा मानला जातो. सध्याच्या काळात कोणत्या ना कोणत्या कारणास्तव एकमेकांना भेटण्यासाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी ट्रेनच्या माध्यमातून प्रवास केला जातो. ट्रेनमुळे दूरवर राहणाऱ्या लोकांदरम्यानचे अंतर फार कमी झाले आहे. खरंतर प्रत्येक श्रेणीतील कोच हे भारतीय रेल्वेला जोडले गेले आहेत. याच्या तिकिटाचे दर सुद्धा श्रेणीनुसार आकारले जातात. खरंतर भारतातील एकूण रेल्वे स्थानकांबद्दल बोलायचे झाल्यास तर 7 हजारांपेक्षा अधिक रेल्वे स्थानक आहेत. यामधील काही आपल्या सौंदर्यासाठी तर काही स्वच्छेतेच्या कारणास्तव ओळखली जातात. मात्र तुम्हाला माहितेय का, भारतात असे रेल्वे स्थानक आहे जेथे तुम्हाला ट्रेन संदर्भातील माहिती एक नव्हे तर चार भाषांमध्ये मिळते. त्याच्या सुचना सुद्धा त्याच पद्धतीने दिल्या जातात. (Indian unique railway stations )

भवानी मंडी रेल्वे स्थानक
दिल्ली-मुंबई मार्गावर भवानी मंडी रेल्वे स्थानक आहे. या स्थानकाचा संबंध दोन वेगवेगळ्या राज्यांशी आहे. म्हणजेच हे रेल्वे स्थानक राजस्थान आणि मध्यप्रदेशाच्या दरम्यान आहे. दोन राज्यांमध्ये विभागले गेले असल्याने भवानी स्थानकात थांबणारी प्रत्येक ट्रेनचे इंजिन हे राजस्थान आणि त्याचे कोच मध्य प्रदेशात असते. खास गोष्ट अशी की, स्टेशनच्या एका बाजूला राजस्थानचा बोर्ड लावण्यात आला आहे. तर दुसऱ्या बाजूला मध्य प्रदेशाचा बोर्ड लावण्यात आला आहे.

अटारी रेल्वे स्थानक
जर तुम्ही अटारी रेल्वे स्थानकातून ट्रेनचा प्रवास करणार असाल किंवा स्टेशनवर उतरायचे असेल तर तुमच्याकडे वीजा असणे गरजेचे आहे. भारत आणि पाकिस्तानच्या सीमारेषेवर असणाऱ्या अमृतसरमध्ये अटारी रेल्वे स्थानकात वीजा नसेल तर तुम्हाला तेथे जाता येत नाही. सुरक्षा बलाचे कर्मचारी तेथे चोवीस तास तेथील हालचालींवर लक्ष ठेवून असतात. वीजा शिवाय पकडले गेल्यस तर व्यक्तीला शिक्षा दिली जाते.

झारखंड मध्ये नाव नसलेले रेल्वे स्थानक
या स्थानकाबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. रांची येथून तोरीला जाणारी ट्रेन सुद्धा एका अज्ञात स्थानकातून जाते. येथे कोणत्याही प्रकारचा बोर्ड लावण्यात आलेला नाही. 2011 मध्ये जेव्हा पहिल्यांदा या स्थानकातून ट्रेनचा प्रवास सुरु झाला तेव्हा रेल्वेने याचे नाव बरकिंचपी ठेवण्याचा विचार केला होता. मात्र तेथील स्थानिकांमुळे हे स्थानक अद्याप अज्ञातासारखेच आहे. (Indian unique railway stations)

बंगाल मधील आणखी एक अज्ञात स्थानक
आणखी एक असे स्थानक आहे जेथे ट्रेनचे येणे-जाणे असते. मात्र त्याचे नाव नाही.पश्चिम बंगालमध्ये बर्धमान पासून 35 किमी दूरवर बांकुरा-मसग्राम रेल्वे मार्गावर अज्ञात रेल्वे स्थानकाची उभारणी 2008 मध्ये करण्यात आली होती. स्थानकाचे नाव आधी रैनागढ़ असे ठेवण्यात आले होते. मात्र स्थानिक लोकांची स्थानकाचे नाव बदलण्यासाठी रेल्वे बोर्डाकडे तक्रार केली होती. तेव्हापासून या स्थानकाला नाव देण्यात आलेले नाही.

हेही वाचा- Pet पासपोर्ट नक्की का काढला जातो?

नवापुर रेल्वे स्थानक
नवापुर रेल्वे स्थानकाचे नाव भारतातील सर्वाधिक अनोख्या स्थानकांमध्ये घेतले जाते. या स्थानकाचा एक हिस्सा महाराष्ट्र आणि दुसरा हिस्सा गुजरातमध्ये आहे. नवापुर रेल्वे स्थानक हे विविध राज्यांमध्ये दोन हिस्स्यांमध्ये विभागला गेला आहे. येथील प्लॅटफॉर्म ते बेंचवर महाराष्ट्र आणि गुजरात असे लिहिलेले आहे. खास गोष्ट अशी की, येथे चार विविध भाषा हिंदी, इंग्रजी, मराठी आणि गुजाराती भाषेत सुचना दिली जाते.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.