Home » Bridal फोटोशूट वेळी या गोष्टींची घ्या काळजी

Bridal फोटोशूट वेळी या गोष्टींची घ्या काळजी

by Team Gajawaja
0 comment
Bridal photoshoot tips
Share

लग्न म्हटलं की, घरातील एक मोठा सोहळा म्हणून त्याकडे पाहिले जाते. लग्नाची तयारी होई होईपर्यंतच नाकेनऊ येतात. त्याच पाहुण्यांची उठबस असतेच. पण या मध्ये नवंवधू आणि नवंवराला फार लग्नाची उत्सुकता असते. पण त्यापेक्षा ही अधिक नवंवधुला लग्नात किंवा लग्नापूर्वी ब्राइडल फोटोशूटची फार उत्सुकता असते. त्यामुळे ती फोटोशूटमध्ये सुंदर दिसण्यासाठी विविध गोष्टी करते. आपल्या लग्नात फार सुंदर दिसावे असेच वाटत राहते. फोटोशूट भले ते आठवण म्हणून राहतील तरीही तिला ते खास क्षण कॅमेऱ्यात कैद करायचे असतात. आजकाल तर बहुतांश कपल्स हे लग्नापूर्वी प्रीवेडिंग फोटोशूट किंवा पर्सनल एखादे फोटोशूट, बॅचलर पार्टीजचे फोटो, हळदी, संगीतचे फोटोशूट करतात. त्यापैकीच एक म्हणजे ब्रायडल फोटोशूट. हे फोटोशूट करताना काही गोष्टींची खरंच काळजी घेतली पाहिजे. अन्यथा तुमचे फोटोशूट बिघडू शकते. (Bridal photoshoot tips)

कंम्फर्ट फार महत्त्वाचा
लग्नामध्ये सुंदर दिसण्यासाठी एखादी नवंवधू त्या सर्वगोष्टी करते ज्यामुळे ती अधिक सुंदर दिसेल. मात्र नेहमीच या गोष्टीकडे लक्ष द्यावे की, तुमची स्टाइल सुद्धा तुम्हाला कधीकधी अनकंम्फर्टेबल वाटू शकते. त्यामुळे ब्राइडल फोटोशूट वेळी तुमचा कंम्फर्ट झोन पहा.

लोकेशन
सुंदर फोटो येण्यासाठी परफेक्ट लोकेशनची सुद्धा गरड असते. त्यामुळे तुमचे जेव्हा फोटोशूट असेल तेव्हा या गोष्टीकडे सुद्धा लक्ष द्या. त्याचसोबत तुम्ही निवडलेले लोकेशन हे सुरक्षित आहे ना, तेथे काही समस्या नाही ना अशा सर्व गोष्टी पहा आणि नंतरच तेथे फोटोशूट करण्याचा निर्णय घ्या.

लूक
ब्राइडल फोटोशूटवेळी सौंदर्य अधिक खुलून दिसण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे, तुमचा लूक. तुमचा लूक हा तुमच्या कपड्यांसोबत मॅच होणारा असावा. तरच तुमचे फोटोशूट व्यवस्थितीत आणि सुंदर होऊ शकते. (Bridal photoshoot tips)

एक्सरेसरिज
ब्राइडल लूक उत्तम बनवण्यासाठी एक्सेसरिज फार महत्वाच्या असतात. आजकाल मार्केटमध्ये तुम्हाला विविध पॅटर्नच्या एक्सेसरिज मिळतील. त्यामुळे तुमच्या लूकनुसार तुम्ही त्या निवडा.

हेही वाचा- Ready to wear साडी खरेदी करण्यापूर्वी ‘या’ गोष्टींकडे द्या लक्ष

परफेक्ट लाइट आणि पोज
कोणतेही फोटोशूट उत्तम होण्यासाठी त्यामागे लाइट आणि पोज ही फार महत्वाची असते. लाइट व्यवस्थितीत असेल तर फोटो सुंदर येतील. त्याचसोबत लाइटच्या सेटिंगसह पोज ही व्यवस्थितीत असावी.

या काही ब्राइडल फोटोशूटच्या टीप्स आहेतच. पण तुम्ही थीम नुसार ही ब्राइडल शूट करु शकता. त्यासाठी विविध ऑप्शन तुम्हाला सोशल मीडियात, इंटरनेटवर सहज मिळतात. फक्त ब्राइडल फोटोशूटपूर्वी तुमचे बजेट किती असावे हे मात्र जरुर ठरवा.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.