Home » ट्रक चालकांची केबिन होणार गारेगार

ट्रक चालकांची केबिन होणार गारेगार

by Team Gajawaja
0 comment
AC Cabin
Share

आपल्या देशात रस्ते वाहतुकीचे एक वेगळे स्थान आहे. आपल्याकडे कितीही वेगवान अशी ट्रेन आली तरी रस्ता वाहतूक ही अशीच गजबजलेली राहणार आहे. या वाहतुकीत ट्रक हे मुख्य साधन आहे. गुलाबासारख्या फुलांची वाहतूक असो की, काश्मिरीमधील रसाळ सफरचंद असोत, महाराष्ट्रातील कांदे असो की, एका मोठ्या कंपनीचे लोखंडी खांब असो, या सर्वांची वाहतूक करण्यासाठी रस्ते वाहतुकीलाच प्राधान्य दिले जाते आणि ट्रक या साधनावर भर दिला जातो. भारतातील प्रत्येक रस्त्यावर दिवस रात्र ट्रकची वाहतूक सुरु असते. लाखो ट्रकचालक आपले लक्ष गाठण्यासाठी कोणत्याही ऋतूत कार्यतत्पर असतात.आपल्या ट्रकमध्ये लोड असलेला माल वेळेत पोहचवण्यासाठी ही ड्रायव्हर मंडळी अनेकवेळा रात्र-दिवस सलग ड्रायव्हिंग करतात. अशा ट्रक चालकांना असणा-या सुविधा मर्यादित आहेत. अनेकवेळा उन्हाच्या झळा सोसत हे ट्रकचालक ट्रक चालवतांना दिसतात. अशा सर्वासाठी आता एक चांगली बातमी आली आहे. केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्रक चालकांच्या केबिन एसी (AC Cabin) असणार आहेत, अशी घोषणा केली आहे.

भारतामध्ये रस्ता वाहतूक क्षेत्राचे खूप मोठे योगदान आहे. आज भारताची बहुतांशी अर्थव्यवस्था रस्ता वाहतुकीवर अवलंबून आहे. यातही  ट्रकची संख्या जास्त आहे. मात्र या ट्रकच्या व्यवस्थेकडे अद्याप लक्ष दिले गेले नाही. रस्तावर मालवाहतुकीसाठी वापण्यात येणारे अनेक ट्रक हे मुदत उलटून गेलेल असतात. त्यातून बाहेर पडणारा धूर हा पर्यावरणाला घातक ठरत आहे. या सर्वात ट्रकचालकांना मिळणा-या सुविधाही मर्यादित आहेत. मात्र आता याच ट्रक चालकांसाठी चांगली बातमी आली आहे. ट्रकची केबिन एसी (AC Cabin) होणार असल्याची बातमी आली आहे.  यामुळे हजारो ट्रक चालकांना ट्रक चालवतांना उष्म्याचा त्रास जाणवणार नाही.  

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी ही मोठी घोषणा केली आहे. नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमादरम्यान बोलतांना ट्रकची केबिन वातानुकूलित (AC Cabin) करण्याचा निर्णय घेतला गेल्याची माहिती दिली. यापुढे ट्रक चालकांच्या केबिनमध्ये वातानुकूलित यंत्रणा बसवणे बंधनकारक करण्यात येणार आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी या संदर्भात सांगितले की, देशातील वाहतूक क्षेत्रात ट्रक चालकाची मोठी भूमिका आहे. भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढवण्यासाठी या ट्रक चालकांचे मोठे योगदान आहे. अशा ट्रक चालकांच्या मनःस्थितीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. त्यासाठी काम करणेही आवश्यक असल्याचे रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. त्याचाच एक भाग म्हणून ट्रक चालकांसाठी असलेली केबिन पूर्णपणे वातानुकूलित करणे बंधनकारक होणार आहे. ट्रक चालक हे अत्यंत कठीण परिस्थितीत वाहतूक व्यवस्था सांभाळत असतात.  भारतातील ट्रक चालक हे 14-16 तास काम करतात. अन्य देशांमध्ये ट्रक चालकांच्या कामाचे तास निश्चित आहेत. तशीच व्यवस्था भारतात होऊ शकते का? याबाबत अभ्यासही सुरु असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले आहे. नितीन गडकरी यांनी सांगितलेले बदल प्रत्यक्षात सर्वत्र दिसण्यासाठी 2025 उजडावे लागणार आहे. हा काळ मोठा असला तरी यात होणा-या सुविधा लक्षणीय आहेत.(AC Cabin)  

========

हे देखील वाचा : काय आहे कोको बेटांचे रहस्य?

========

भारतात ट्रकची निर्मिती करण्या-या अनेक कंपन्या आहेत. भारतीय ट्रक उद्योगातही तंत्रज्ञान, डिझाइन, वैशिष्ट्ये या बाबतीत प्रचंड बदल होत आहेत. टाटा मोटर्स हे त्यातील प्रमख नाव आहे. टाटा ट्रक्सने 70 वर्षांहून अधिक काळ भारताच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. देशाच्या कुठल्याही कोप-यात आपण गेल्यास टाटा कंपनीचे ट्रक दिसतातच. भारतात असणा-या ट्रकमध्ये टाटा मोटर्सचे ट्रक अत्यंत आधुनिक समजले जातात.आता तर बहुतांश ट्रकमध्ये जीपीस प्रणालीही लागू आहे. टाटा मोटर्स पाठोपाठ अशोक लेलँड ही भारतातील दुसरी लोकप्रिय ट्रक कंपनी आहे. महिंद्रा अँड महिंद्रानेही भारतातील ट्रक उद्योगात खूप नाव कमावले आहे. भारतातील शेतक-यांकडे असणा-या ट्रकमध्ये महिंद्राच्या ट्रकची संख्या जास्त आहे. आयशर ट्रक्सनाही भारतात मोठी मागणी आहे. गेल्या काही वर्षांपासून, भारतीय ट्रकिंग उद्योगात आयशर ट्रक्सची मागणी वाढल्याची माहिती आहे. भारतबेन्झ या कंपनीचे ट्रकही लोकप्रिय आहेत. आता या सर्व ट्रकच्या केबिन या एसी (AC Cabin) होणार आहेत. त्यासाठी 2025 पर्यंत मुदत देण्यात येईल, अशी माहिती आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.