Home » चहा गरम करताना सावधान…

चहा गरम करताना सावधान…

by Team Gajawaja
0 comment
Hot Tea
Share

तमाम भारतीयांसाठी सर्वाधिक आवडते पेय म्हणजे चहा. आता तर थंडी सुरु झाल्यावर या चहाच्या सेवनात अधिकच वाढ झाली आहे.  भारतात पाण्यानंतर चहा हे दुस-या क्रमांकाचे सेवन होणारे पेय आहे, हे ऐकून आर्श्चय वाटेल, मात्र चहाची लोकप्रियता तेवढीच आहे.  सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सर्वांना चहा (Hot Tea)प्यावासा वाटतो.  विशेषतः थंडीत आणि पावसाळ्यात चहा अनेकांना वरदानासारखा वाटतो.  अर्थात चहा 12 महिने वापरला जात असला तरी जर थंड हवामानात चहाचा वापर अधिकच वाढतो.  इतर ऋतूंच्या तुलनेत हिवाळ्यात लोक जास्त चहा पितात. त्यामुळेच पहिला चहा घेतांना अनेकजण तो छान होईल, मसालेयुक्त असेल, विशेषतः त्यात आल्याचा मुबलक वापर झालेला असेल असा करतात.  हिवाळ्यात आल्याचा चहा हा औषधासारखा असतो.  आल्याचे औषधी गुणधर्म आहेत, हे गुणधर्म चहाद्वारे शरीरात जातात. सर्दी किंवा खोकल्यावरही हा आल्याचा चहा अनेकदा घेतला जातो.  हा चहा (Hot Tea) आरोग्यासाठी चांगला असला तरी, चहा घेतांना तो कितीवेळा घ्यावा आणि कसा घ्यावा याचेही भान ठेवावे लागते. सकाळी बनवलेला चहा तसाच दोन किंवा तीनवेळा उकळून  घेतला तर त्याचा शरीराला अपाय होऊ शकतो.  त्यामुळे चहा कसा घ्यावा याचीही काळजी घ्यावी लागते.

हिवाळ्यात आल्याचा चहा वरदान असल्यासारखा असतो.  आल्यामध्ये अँटिऑक्सिडंट घटक असतात.आल्यामध्ये असलेल्या अँटिऑक्सिडंट घटकामुळे मेंदूचे कार्य सुधारते.  हिवाळ्यात शरीराला गरम ठेवण्याची गरज असते.  तसेच शरीरात कफही होतो.अशावेळी आले टाकलेला चहा फायदेशीर होतो.  मात्र, शरीरातील कफ अर्थात सर्दी दूर करण्यासाठी आल्याचा वापर उपयोगी होतो असे नाही, तर त्याचा यापेक्षाही अधिक फायदा होतो. आलं हे अनेक औषधी तत्वांनी समृद्ध असून त्यामुळे शरीरातील अनेक रोगांपासून मुक्ती मिळण्यास मदत होते.  

आल्याचा चहा (Hot Tea) शरीरातील रक्ताभिसरण क्रिया सुधारण्यास मदत करतो.  त्यामुळे हद्यही निरोगी रहाते, असे निरीक्षण आहे. आल्यामध्ये आढळणारे जिंजरॉल आणि शोगोल नावाचे घटक कर्करोगापासून संरक्षण करतात.  हिवाळ्यात अनेकांना बद्धकोष्ठतेच्या समस्येला सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत मळमळ, उलट्या, सर्दी यासारख्या समस्या जाणवतात. अशावेळी आलं टाकलेला चहा अनेकांना रामबाण उपाय ठरतो.  आल्याचा चहा नियमितपणे प्यायल्यास रक्तदाब नियंत्रित राहतो.  शिवाय हृदयविकाराचा झटका, रक्त गोठणे आणि कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्याची शक्यताही कमी होते, असे सांगण्यात आले आहे.  हिवाळ्यात वजन वाढीचा त्रासही जाणवतो.  वाढत्या थंडीमुळे चालण्याचा व्यायाम होत नाही.  परिणामी काहींना वजन वाढीचा त्रास सहन करावा लागतो.  अशावेळी हा आलं टाकलेला चहा फायदेशीर ठरतो.  शरीरातील फॅट लेव्हल कमी करण्यासोबतच आल्याचा चहा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतो.  त्यामुळे वजन कमी करण्यास खूप मदत होते.  शरीरात कुठे वेदना होत असतील आणि शरीराच्या कुठल्या भागावर सूज आली असेल तर तेव्हाही आल्याचा चहा आरामदायी ठरतो.  वेदना आणि शरीरातील सूज यापासून सुटका मिळवण्यासाठी आल्याचा चहाही उत्तम असते. आल्यामध्ये असलेले जिंजरॉल आणि शोगोल हे घटक शरीरातील वेदना आणि सूज दूर करण्यास मदत करतात. 

========

हे देखील वाचा : अंड खाल्ल्याने तुम्हाला एलर्जी होते? जाणून घ्या कारणांसह लक्षणांबद्दल अधिक

========

आल्याचा चहा थंडीमध्ये फायदेशीर असला तरी अनेकवेळा सकाळी तयार झालेला चहा (Hot Tea) काहीवेळा दुपारपर्यंत तसाच गरम करुन घेतला जातो.  असा चहा आरोग्यासाठी फायदेशीर नाही तर घातकच ठरतो.  अनेकदा थंड चहा पुन्हा गरम करून प्यायला जातो.  यामुळे शरीरावर दुष्परिणाम होतो.  थंड चहा पुन्हा गरम केल्यानंतर प्यायलास जुलाब, उलट्या, किंवा पचनाच्या समस्या जाणवू शकतात.  एकदा बनवलेला चहा असाच जास्त दिवस ठेवल्यास त्यात बॅक्टेरिया जातात.  चहा पुन्हा गरम करून प्यायल्यास चहाची चव कडू होते.अशा परिस्थितीत हा चहा तोंडाची चव तर बिघडवतो पण आरोग्यालाही त्याची हानी पोहोचते.  चहा बनवून 15 मिनिटांपेक्षा अधिक जास्त वेळ झाल्यास त्याचा वाईट परिणार शरीरावर होतो.  तसेच रिकाम्या पोटीही चहा कधी घेऊ नये.  रिकाम्या पोटी चहा घेतल्यास आम्लपित्ताचा त्रास जाणवू शकतो.  काहीजण ब्लॅट टी लाही प्राधान्य देतात. मात्र  कुठलाही चहा घेतला तर तो उपाशी पोटी घेऊ नये.  तसेच कुठल्याही प्रकारचा चहा हा शक्यतो केल्या केल्या लगेच घ्यावा, तरच त्याचा स्वाद हवा तसा मिळतो, आणि त्याचे फायदेही मिळतात.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.