Home » पुतिन यांच्या प्रियसीचा भव्य महल आला जगासमोर…

पुतिन यांच्या प्रियसीचा भव्य महल आला जगासमोर…

by Team Gajawaja
0 comment
Palace
Share

रशियाची फर्स्ट लेडी…अर्थात व्लादिमीर पुतिन यांची प्रियसी असलेल्या आलिना काबाएवा हिच्या अलिशान महलाची छायाचित्रे नुकतीच जगासमोर आली आहेत. आलिना हिच्यासाठी पुतिन यांनी भव्य महल (Palace) बांधला असून हा महल अत्यंत महागड्या वस्तूंनी सजवण्यात आला आहे. या महलात असलेल्या खुर्च्याही सोन्याच्या असल्याची माहिती पुढे आली आहे. 39 वर्षाची आलिना काबाएबा ही जिम्नॅस्ट असून रशियासाठी तिनं ऑलंम्पिकमध्ये सुवर्ण पदकाचीही कमाई केलेली आहे.आता तिची ओळख एक राजकारणी आणि पुतिन यांची मैत्रिण अशी आहे.  या दोघांनीही या नात्याचा इन्कार केला असला तरी पुतिन आणि आलिना यांना एक मुलगीही असल्याची चर्चा आहे. याच आलिनासाठी पुतिन यांनी सोन्याचा राजवाडा (Palace) बांधला आहे. मॉस्कोपासून 250 मैल अंतरावर वलदाई तलावाच्या जंगलात असलेल्या या राजवाड्याबाबत आता विरोधी पक्षांनी पुतिन यांना काही प्रश्न विचारले आहेत. त्यामुळेच आलिनाच्या अलिशान राजवाड्याची (Palace) चर्चा सुरु झाली आहे. रशिया आणि युक्रेन युद्ध सुरु झाल्यावर आलिना काहीदिवस बंकरमध्ये लपली होती,  तेव्हाही ती चर्चेत आली होती.  मात्र आता तिच्या अलिशान राजवाड्याचे फोटो समोर आल्यावर तिच्या शाही राहणीमानावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत.  

अलिना काबाएवा ही रशियाची फर्स्ट लेडी असल्याचे म्हटले जाते. मात्र व्लादिमीर पुतीन आणि आलिना हे दोघेही फार क्वचित एकत्र दिसले आहेत. पुतिन यांनी 2014 मध्ये रशियाच्या नॅशनल मीडिया ग्रुपच्या प्रमुखपदी अलिनाची नियुक्ती केली, तेव्हापासून त्यांच्या नात्याबाबत चर्चा सुरु झाली. याच आलिनासाठी पुतिन यांनी भव्य राजवाडा (Palace) उभारला आहे. जिम्नॅस्ट असलेली अलिना काबाएवा ही ऑलिम्पिकची रिदमिक चॅम्पियन आहे. तिच्यासाठी पुतिन यांनी जी मालमत्ता खरेदी केली, तो पैसा जनतेच्या फंडातील असल्याचा आरोप होत आहे. राजवाड्यासारख्या या इमारतीचे बांधकाम 2020 मध्ये सुरू झाले. आता दोन वर्षांनी हा राजवाडा (Palace) तयार झाला आहे. 13,000 स्क्वेअर फूट परिसरात असलेला हा राजवाडा अत्यंत मौल्यवान लाकडांनी बांधला असून त्यात रशियन शैलीच्या लाजवाब कलाकृती आहेत. याच राजवाड्यात आलिना रहात असल्याचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत. तिच्यासह तिची आणि पुतिन यांची मुलगीही रहात असल्याची माहिती आहे. या राजवाड्यामध्ये काचेच्या टेबलाभोवती सोन्याच्या खुर्च्या आणि छतावर सोन्याचे पान लटकलेले गोलाकार झुंबर असून त्याचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत.  रशियातील एका वृत्तसंस्थेनुसार या राजवाड्यासाठी 990 कोटी खर्च झाले आहेत. सर्व सुविधांनी युक्त असलेला हा राजवाडा उभारण्यासाठी जनतेचा पैसा खर्च झाल्याचा आरोप पुतीनचे बँकर म्हणून ओळखले जाणारे रशियन उद्योगपती युरी कोवलचॅक यांनी केला आहे.  अलिना यांना 2014 मध्ये कोवलचॅक यांची कंपनी नॅशनल मीडिया ग्रुपची प्रमुख म्हणून नेमण्यात आले होते. तिला 8.6 दशलक्ष पौंड वार्षिक उत्पन्न मिळते. आलिनाकडे अनेक आलिशान मालमत्ता आहेत. त्यात ब्लॅक-सीमध्ये सोचीमध्ये एक पेंटहाउस आहे, जे रशियामधील सर्वात मोठे अपार्टमेंट आहे. 

आलिनाचे व्यक्तिमत्वही पुतिन यांच्यासारखेच गुढ असल्याचे सांगण्यात येते. ती फारशी कुठेही दिसत नाही. डिसेंबर 2021 मध्ये मॉस्को येथे झालेल्या डिव्हाईन ग्रेस रिदमिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत अलीना नृत्य करतांना दिसली होती.  त्यानंतर सार्वजनिक कार्यक्रमात ती दिसली नाही.  याचदरम्यान पुतिन आणि आलिना यांना दोन मुली असल्याची माहितीही पुढे आली. रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध चालू झाल्यावर अमेरिकेने रशियावर काही बंधने टाकली होती. तसेच रशियन व्यक्तिंना आपल्या देशात मज्जावही केला होता. मात्र आलिना तिच्या दोन मुलींसह अमेरिकेत मुक्त वावर करत होती, अशी माहिती एका वृत्तपत्रानं दिली आहे. युक्रेनवरील युद्ध तीव्र केल्यावर आलिनाला काही दिवस बंकरमध्येही ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येते. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर पुतिन यांच्या आदेशानुसार अलिना सायबेरियातील अणुबंकरमध्ये लपली असल्याची अफवा पसरली होती.(Palace)

======

हे देखील वाचा : कैलासा नावाच्या देशाची चर्चा….

======

आलिनाचा जन्म 1983 मध्ये उझबेकिस्तानमध्ये झाला. तिचे वडील, मरात काबाएवा, एक व्यावसायिक फुटबॉल खेळाडू होते. आलिनानेही वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत वयाच्या तिस-या वर्षी जिम्नॅस्ट म्हणून सराव सुरु केला.  2004 च्या अथेन्स गेम्समध्ये सुवर्णपदक आणि 2000 मध्ये सिडनी येथे कांस्यपदक जिंकले. याशिवाय 14 जागतिक चॅम्पियनशिप पदके आणि 21 युरोपियन चॅम्पियनशिप पदके तिने जिंकली आहेत.  जिम्नॅस्टिकमधून निवृत्ती घेतल्यानंतर आलिनाने राजकारणात प्रवेश केला. 2007 ते 2014 पर्यंत, ती युनायटेड रशियन पक्षाचे प्रतिनिधित्व करत रशियन संसदेची सदस्या होती.  2008 मध्ये आलिनाचे नाव पुतिन यांच्याशी प्रथम जोडण्यात आले. मॉस्कोच्या एका वृत्तपत्राने याबाबत बातमी दिली, पण काही दिवसातच हे वृत्तपत्र बंदच पडले. यानंतर पुतिन आणि त्यांची पत्नी ल्युडमिला यांचा 2013 मध्ये घटस्फोट झाला. आता याच आलिनासाठी पुतिन यांनी भव्य महाल (Palace) उभारला आहे आणि हा महल जनतेच्या पैशातून उभारल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.