Home » लोकमान्य टिळकांवर लागला होता देशद्रोहाचा आरोप…

लोकमान्य टिळकांवर लागला होता देशद्रोहाचा आरोप…

by Team Gajawaja
0 comment
Bal Gangadhar Tilak
Share

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक एक प्रखर राष्ट्रवादी पत्रकार, विद्वान शिक्षक आणि महान स्वातंत्र्यसेनानी होते. त्यांच्या देशभक्तीमुळे इंग्रज सरकार घाबरायचे. त्यामुळेच इंग्रजांनी त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप लावत ६ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. टिळक ज्या दिवशी तुरुंगात गेले ती तारीख होती ३ जुलै १९०८. टिळकांचे संपूर्ण नाव केशव गंगाधर टिळक होते. मात्र त्यांना बाळ गंगाधर टिळक नावाने संबोधले जायचे आणि आजही त्याच नावाने संबोधले जाते. (Bal Gangadhar Tilak)

बाळ गंगाधर टिळक यांच्यावर लावण्यात आलेले आरोप आणि त्यांच्या अटकेचा प्रकार हा प्रत्येक भारतीयांना चिड आणणारा आहे. खरंतर ते एक सच्चे राष्ट्रभक्त होते. त्यांनी केसरी नावाने वृत्तपत्र सुरु केले होते. त्या वृत्तपत्रातून क्रांतिकाऱ्यांच्या कथा प्रकाशित करायचे. इंग्रजांच्या विरोधातील लेख आणि कविता सुद्धा ते लिहायचे. इंग्रजांना याचाच अधिक राग यायचा.

ही गोष्ट असेल तेव्हाची जेव्हा भारताला इंग्रजांनी गुलाम बनवले होते. अशातच इंग्रजांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी देशातील कानाकोपऱ्यातून तमाम क्रांतिकारी स्वातंत्रता सेनानी आवाज उठवत होते. ३० एप्रिल १९०८ ची गोष्ट असेल. खुदीराम बोस आणि प्रभुल्ल चंद यांनी जज किंग्सफोर्ड यांच्या ताफ्यावर बॉम्ब हल्ला केला होता. मात्र हल्ल्यात ते बचावले गेले आणि दोन महिलांचा मृत्यू झाला. इंग्रजांनी खुदीराम बोस आणि प्रभुल्ल चंद यांना अटक केली.

पण बाळ गंगाधर टिळ यांना याबद्दल कळले तेव्हा त्यांनी आपले वृत्तपत्र केसरीमध्ये त्या बॉम्ब हल्ल्याच्या समर्थनार्थ लिहिले आणि इंग्रजांच्या कार्यवाहीवर टीका केली. इंग्रज सरकारने केसरीमध्ये खुदीराम आणि प्रभुल्ल यांचे समर्थ टिळकांनी केल्याने त्यांना अटक केली. अटकेनंतर टिळकांवर खटला चालवला गेला. त्यंच्यावर देशद्रोहाचा खटला चालवला गेला. त्यानंतर त्यांना सहा वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.

देशहितासाठी लिहिणारे आणि आपल्या क्रांतीकाऱ्यांबद्दल आवाज उठणाऱ्या टिळकांबद्दल प्रत्येकाच्या मनात आदर होता. त्यांना बिनविरोध तुरुंगात जाणे स्विकारले. मात्र तुरुंगात त्यांनी सहा वर्षाच्या कालावधीत वेळेचा फार सदुपयोग केला. त्यांनी ४०० पानांचे गीता रहस्य नावाने पुस्तक लिहिले.(Bal Gangadhar Tilak)

टिळकांनी स्वराज्य आंदोलनात ही भाग घेतला होता. १९१६ मध्ये जेव्हा एनीबेसेंटने होम रुल लीगची स्थापना आहे त्यामध्ये टिळकांनी मोठ्या सक्रियेने त्यामध्ये भाग घेतला. तसेच जनतेत जागृकता निर्माण करण्यासाठी एक मोहिम चालवली.याच दरम्यान त्यांना लोकमान्य ही उपाधी दिली गेली.

हेही वाचा- नोबेल पुरस्काराने सन्मानित रवींद्रनाथ टागोर यांच्याबद्दलच्या खास गोष्टी

राष्ट्रासाठी संघर्ष करण्यासह टिळकांनी समाजसेवा ही केली. १८९६ मध्ये महाराष्ट्रात प्लेगचा आजार पसरला गेला होता. तेव्हा इंग्रजांनी या महारोगावर कंट्रोल करण्यासाठी काहीही प्रयत्न केला नाही. त्यामुळे टिळकांनी स्वत: यावर तोडगा काढण्यासाठी लोकांची मदत करण्याचा निर्णय घेतला. परंतु इंग्रज त्यांच्या या सामाजिक कार्याबद्दल फार त्रस्त होते.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.