Home » केवळ राजकरणच नव्हे तर क्रिकेट आणि कॉर्पोरेटमध्ये ही शरद पवारांची होते चर्चा

केवळ राजकरणच नव्हे तर क्रिकेट आणि कॉर्पोरेटमध्ये ही शरद पवारांची होते चर्चा

by Team Gajawaja
0 comment
Sharad Pawar Resigns
Share

राष्ट्रवादीचे दिग्गज नेते शरद पवार यांनी नुकत्याच आपण पक्षाचे अध्यक्षपद सोडत असल्याची घोषणा केली. यावरुन आता जोरदार चर्चा तर सुरु झालीच आहे. पण विविध अंदाज ही बांधले जात आहे. कारण राजकरणातील शरद पवार हे असे व्यक्ती आहेत ज्यांचा केवळ महाराष्ट्र नव्हे तर देशाच्या सत्तेवर प्रभाव असतोच. पण शेती, क्रिकेट आणि कॉर्पोरेटच्या जगात ही त्यांची चर्चा होते आणि तेथे सुद्धा त्यांचे खुप चांगले संबंध आहेत.(Sharad Pawar Resigns)

शरद पवारांनी प्रत्येक क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केलाय. राजकरणाचे माहिर खेळाडू म्हणून ओळखले जाणारे शरद पवार हे राजकरणात आपली चाल कधी चालतील हे चुकून ही कोणाला न कळण्यासारखेच आहे. महाविकास आघाडीत त्यांनी शिवसेना आणि काँग्रेस अशा विरुद्ध विचारसरणीच्या दोन पक्षांना एकत्रित केले. पण ऐकेकाळी सोनिया गांधी यांचा हात सोडून त्यांनी घड्याळ्याच्या चिन्हावर आपला पक्ष स्थापन केला.

खरंतर शरद पवार हे शेतकरी कुटुंबातील आहे. त्यांचा संबंध श्रमिक आंदोलनांसोबत ही होता. त्यांच्या बद्दल असे म्हटले जाते की, त्यांना शेतीसह त्या संबंधित अन्य गोष्टींची खुप चांगली माहिती आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी काही महत्वपूर्ण कामे केली होती.

हेच कारण आहे की, २००४ मध्ये शरद पवार हे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखालील युपीए सरकारमध्ये सामील झाले होते. तेव्हा त्यांना कृषी मंत्र्याचे पद दिले गेले होते. त्यानंतर २००९ मध्ये युपीए गठबंधनच्या सरकारमध्ये सुद्धा त्यांचे पद कायम राहिले.

शरद पवार यांच्याबद्द माजी पंतप्रधानांनी असे म्हटले होते की, ते देशातील आर्थिक सुधारणांसंबंधित कार्यक्रमांमध्ये समान भागीदार आहेत. मनमोहन सिंह यांनी असे ही म्हटले होते की, पवार हे एक महाराष्ट्रीय आहेच पण त्यांना देशातील संकटांचा सामना कसा करावा यासाठी ओळखले जाते. त्यांना औद्योगिक विकासाव्यतिरिक्त देशातील शेतीची सुद्धा चिंता असते. तर ज्यावेळी शेतकऱ्यांचे आंदोलन झाले होते तेव्हा सुद्धा केंद्रातील सरकारवर निशाणा साधला होता.(Sharad Pawar Resigns)

क्रिकेटची आवड
राजकारणाशिवाय मुख्यतः सत्ता आणि राजकारणाच्या मुख्य प्रवाहात स्वत:ला ठेवणाऱ्या शरद पवार यांचा क्रीडा जगताशीही सखोल संबंध आहे. कृषिमंत्री म्हणून काम करताना शरद पवारांना अनेकवेळा शेतीकडे कमी आणि क्रिकेटकडे जास्त लक्ष दिल्याने टीकेला सामोरे जावे लागले. कारण ते त्यावेळी बीसीसीआयचे अध्यक्ष होते. आणि त्याच्या उंचीचा आणि पदाचा मोठा प्रभाव होता.

शरद पवार यांनी 2005 ते 2008 या काळात बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषवले होते, तर 2010 ते 2012 या काळात ते आयसीसीचे अध्यक्ष होते. यानंतर 2013 ते 2017 या काळात शरद पवार यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपद भूषवले. त्यांच्या कार्यकाळात अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली, पण त्यांच्या वर्चस्वाला कधीच कमी लेखले गेले नाही. शिस्त आणि मोठे निर्णय यासाठी त्यांची ओळख होती.

हे देखील वाचा- एकटेपण, आजार आणि मृत्यूची भीती, अखेर कसे आयुष्य जगतायत पुतिन

कॉर्पोरेट जगाशी ही घट्ट नाते
अलीकडेच, शरद पवार यांनी गौतम अदानींच्या मुद्द्यावर राहुल गांधींची जेपीसीची मागणी योग्य ठरविली नाही . विरोधकांच्या संख्याबळाच्या जोरावर राहुल गांधींची मागणी व्यावहारिक होती, असे त्यांनी म्हटले नाही. पण शरद पवारांनी ही मागणी केवळ फेटाळून लावली नाही.

वास्तविक शरद पवार यांचे गौतम अदानी यांच्यासह अनेक उद्योगपतींशी चांगले संबंध आहेत. जवळपास अर्धशतक मुंबई आणि महाराष्ट्रात सक्रिय राजकारण केल्यामुळे, व्यवसाय आणि क्रीडा जगतामध्ये त्यांची मजबूत पकड आहे. या क्षेत्रात ते कोणत्याही महाराष्ट्रीय नेत्यापेक्षा आघाडीवर राहिले आहेत.(Sharad Pawar Resigns)

शरद पवार कधीच देशाच्या कॉर्पोरेट सत्तेच्या विरोधात नव्हते असे मानले जाते. उलट तो समर्थकच राहिला आहे. देशाला पुढे नेण्यात उद्योगक्षेत्राचे महत्त्वाचे योगदान आहे, असे त्यांचे मत आहे. त्यामुळे त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. यामुळेच शरद पवार हे कॉर्पोरेट जगतातील बड्या उद्योगपतींच्या विश्वासू राजकारण्यांपैकी एक राहिले आहेत.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.