Home » तुरुंगात असणारा कैदी निवडणूक लढवू शकतो पण मतदान करू शकत नाही? काय सांगतो नियम जाणून घ्या

तुरुंगात असणारा कैदी निवडणूक लढवू शकतो पण मतदान करू शकत नाही? काय सांगतो नियम जाणून घ्या

लोकसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. पण तुम्हाला माहितेय का, तुरुंगात बंद असणारे कैदी मतदान करू शकत नाही. पण तुरुंगातील कैदी निवडणूक लढवू शकतो. काय आहे नियम जाणून घेऊया सविस्तर...

by Team Gajawaja
0 comment
National Voters Day
Share

Voting Rules : देशात सात टप्प्यात निवडणूका होणार आहेत. पण तुम्हाला माहितेय का, तुरुंगात असणारा कैदी किंवा अंडरट्रायल कैदी मतदान करू शकतो का? खरंतर, तुरुंगातील कैद्याला निवडणूक लढवता येतेय. पण मतदान करता येते का? याबद्दलच जाणून घेणार आहोत सविस्तर….

तुरुंगात बंद असणाऱ्या कैद्यांना निवडणूक लढवता येते. पण मतदान करता येत नाही असा संविधानात नियम आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कोणत्याही व्यक्तीला निवडणुकीवेळी मतदान करता येत नाही. सुप्रीम कोर्टाने देखील या संबंधित एक जनहित याचिका फेटाळून लावली होती. खरंतर, सध्याच्या कायदे आणि नियमानुसार, तुरुंगात शिक्षा पूर्ण करत असलेल्या व्यक्तीला मतदान करण्याचा अधिकार नसतो. याशिवाय अंडरट्रायल कैद्याला किंवा न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेल्या कैद्यालाही मतदान करण्याची परवानगी नसते.

अंडरट्रायल कैद्यालाही मतदानाचा अधिकार नाही
लोक प्रतिनिधित्व अधिनियम 1951 च्या कलम 62(1) अंतर्गत तुरुंगात बंद असणाऱ्या कैद्याला मतदान करण्याचा अधिकार नसतो. कारण मतदान करण्याचा अधिकार कायदेशीर असतो. कायद्याचे उल्लंघन केलेल्या व्यक्तींना मतदान करता येत नाही. याशिवाय आरोपी ज्या कोर्टाद्वारे पोलिसांच्या ताब्यात किंवा न्यायालयीन कोठडीत असतो त्यांना निवडणुकीत मतदान करता येत नाही.

तुरुंगातील कैद्याला निवडणूक लढवण्याचा अधिकार
तुरुंगात बंद असणाऱ्या कैद्याला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. खरंतर, ज्या व्यक्तीला निवडणूक लढवायची आहे त्याने पीठासीन अधिकाऱ्यांना उमेदवारी अर्ज द्यायचा असतो. याशिवाय एक शपथही घ्यावी लागते. पण तुरुंगातील कैद्याला उमेदवारी अर्ज कसा करावा लागतो आणि तुरुंगाबाहेर जाण्याची त्याला परवानगी मिळते का? (Voting Rules)

तुरुंगातील कैदी निवडणूक लढवत असल्यास त्यांना आपल्या प्रतिनिधींच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज दाखल करावा लागतो. याशिवाय प्रतिनिधी कोण असेल याचेही नियम आहेत. बहुतांश प्रकरणात परिवारातील एखादा सदस्य प्रतिनिधी असू शकतो. एका नव्या नियमानुसार, तुरुंगात बंद असलेल्या अंडरट्रायल कैद्याला निवडणूक लढवता येते. शिक्षा झालेल्या कैद्यांना निवडणूक लढवण्यास पूर्ण बंदी आहे.


आणखी वाचा :
पक्ष की उमेदवार…? स्टार प्रचारकाचा खर्च कोण उचलतात? जाणून घ्या सविस्तर…
डीडी न्यूजचा नवा भगवा लोगो पाहून विरोधक म्हणाले, “हे तर प्रचार भारती…”
EVM मशीन ठेवल्या जाणाऱ्या खोलीला स्ट्रॉन्ग रुम का म्हणतात

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.