Home » माधुरी दीक्षितचे ‘हे’ गाणे अडकले होते वादाच्या भोवऱ्यात, बंदी घातल्यानंतरही विक्री झाल्या एक कोटी कॅसेट्स

माधुरी दीक्षितचे ‘हे’ गाणे अडकले होते वादाच्या भोवऱ्यात, बंदी घातल्यानंतरही विक्री झाल्या एक कोटी कॅसेट्स

वर्ष 1993 मध्ये आलेला सिनेमा 'खलनायक' त्यावेळचा सर्वाधिक हिट सिनेमा ठरला होता. या सिनेमात संजय दत्तसह माधुरी दीक्षित मुख्य भूमिकेत झळकली होती

by Team Gajawaja
0 comment
Entertainment
Share

Entertainment : वर्ष 1993 मध्ये आलेला सिनेमा ‘खलनायक’ त्यावेळचा सर्वाधिक हिट सिनेमा ठरला होता. या सिनेमात संजय दत्तसह माधुरी दीक्षित मुख्य भूमिकेत झळकली होती. पण तुम्हाला माहितेय का, खलनायक सिनेमातील माधुरीचे सुपरहिट गाणे ‘चोली के पीछे क्या है’ ची देशभरात चर्चा झाली होती. याशिवाय माधुरीचे गाणे अश्लील असल्याचाही आरोप लावण्यात आला होता.

‘चोली के पीछे क्या है’ वरून वाद
‘चोली के पीछे क्या है’ गाण्यावर रेडियो आणि टीव्हीवर बंदी घालण्यात आली होती. गाण्यात माधुरीचे आउटफिट्स कमालीचे होते आणि ते सर्वांच्या पसंतीस पडले होते. पण गाण्याचे लिरिक्सवरून वाद निर्माण झाला होता. सिनेमा प्रदर्शित होऊ नये म्हणून दिल्ली कोर्टातही धाव घेण्यात आली होती. पण कोर्टाने हे प्रकरण फेटाळून लावत म्हटले की, गाण्यात काहीही आपत्तीजनक नाही.

माधुरी दीक्षितचे गाणे वादाच्या भोवऱ्यात अडकले तरीही प्रदर्शित झाल्याच्या आठवड्याभरातच एक कोटींहून अधिक कॅसेट्सची विक्री झाली होती. आजही चोली के पिछे क्या है गाणे माधुरीच्या करियरमधील आयकॉनिक सॉन्ग मानले जाते. गाणे अलका याग्निक आणि ईला अरुण यांनी गायले होते. याशिवाय सरोज खान यांनी गाण्याची कोरियोग्राफी केली होती. या गाण्याचे लिरिक्स आनंद बख्शी यांनी लिहिले होते आणि संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल होते. असे मानले जाते की, गाणे खलनायक सिनेमा सुपरहिट होण्यामागील एक मोठे कारण आहे. एवढेच नव्हे या गाण्यामुळे माधुरी दीक्षितने रातोरात प्रसिद्धी मिळवली होती. (Entertainment)


आणखी वाचा :
उदरनिर्वाहासाठी केली होती टुथपेस्टच्या रिकाम्या डब्याची विक्री… आज आहे टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री
वर्ष 1977 मधील ‘या’ ब्लॉकबस्टर सिनेमाने बॉक्स ऑफिसच नव्हे तर परदेशातही केली होती जबरदस्त कमाई
4-5 वर्ष बेरोजगारी, गटरात झोपून घालवल्या रात्री पण नंतर असे बदलले आयुष्य!

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.