Home » मोबाइलचेही असते आयुष्य, जुना झाल्यानंतर कधी बदलला पाहिजे?

मोबाइलचेही असते आयुष्य, जुना झाल्यानंतर कधी बदलला पाहिजे?

एखादा नवा फोन जवळजवळ अडीच वर्ष उत्तमपणे काम करतो. पण ब्रँड्सच्या आधारावर देखील फोनचे आयुष्य ठरले जाते.

by Team Gajawaja
0 comment
Technology Tips
Share

Technology Tips :  तुम्हाला माहितेय का नवा फोन कधी पर्यंत व्यवस्थितीत काम करू शकतो आणि यानंतर नवा फोन कधी घ्यायचा? असेच काही प्रश्न बहुतांशजणांना पडतात. खरंतर काही रिपोर्ट्समधून समोर आले आहे की, एक फोन जवळजवळ अडीच वर्षांपर्यंतच उत्तम काम करतो. पण ब्रँड्सच्या आधारावरही मोबाइलचे आयुष्य ठरले जाते. जसे की, आयफोनचे आयुष्य अंदाजे 4 ते 10 वर्ष असू शकते. पण कळणार कसे मोबाइलचे आयुष्य संपले आहे की नाही?

जुन्या फोनमध्ये निर्माण होतात समस्या
एका मर्यादित काळानंतर फोनची बॅटरी लाइफ कमी होऊ लागते. फोनचे अन्य काही पार्ट्स स्लो काम करू लागतात. अशातच फोनमध्ये समस्या निर्माण होऊ लागतात. स्मार्टफोन व्यवस्थितीत काम करणे अत्यंत गरजेचे असते. जर तुम्ही लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टिमवर स्मार्टफोन अपडेट न करू शकत नसल्यास नवा फोन घेणे बेस्ट पर्याय आहे. (Technology Tips)

फोनच्या बॅटरीमध्ये निर्माण होतात समस्या
जुन्या फोनसह फोनची बॅटरीही बिघडण्यास सुरूवात होते. फोन अचानक बंद होण्याची समस्याही उद्भवते. अशातच तुम्ही नवा फोन घेण्याचा विचार करू शकता.

नेटवर्क संबंधित समस्या
फोनमध्ये नेटवर्क येत असेल पण तुम्हाला फोनवरील व्यक्तीशी स्पष्टपणे बोलता येत नसल्यास फोन बदलावा.

स्टोरेजची समस्या
एखादा फोटो किंवा व्हिडीओ काढल्यानंतर स्टोरेज कमी झाल्याचे नोटिफिकेशन मिळत राहते. स्टोरेजची समस्या अधिक वाढल्यास फोन बदलावा.


आणखी वाचा :
YouTube ला टक्कर देण्यासाठी एलॉन मस्क यांचे X TV App लवकरच होणार लाँच
केवळ एका SMS च्या माध्यमातून जाणून घेता येईल मतदान कार्डसंबंधित सर्व माहिती, हा आहे सोपा पर्याय
सर्वप्रथम YouTube वर कोणी अपलोड केला होता व्हिडीओ?

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.