Home » सर्वप्रथम YouTube वर कोणी अपलोड केला होता व्हिडीओ?

सर्वप्रथम YouTube वर कोणी अपलोड केला होता व्हिडीओ?

युट्युबला 14 फेब्रुवारी 2005 रोजी लाँच करण्यात आले होते. हळूहळू युट्यूब प्लॅटफॉर्म प्रसिद्ध झाला आणि याच्या माध्यमातून नागरिक बक्कळ कमाई करू लागले.

by Team Gajawaja
0 comment
YouTube Video Advertisement
Share

YouTube : जगप्रसिद्ध व्हिडीओ शेअरिंग प्लॅटफॉर्म युट्युब आज आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग झाला आहे. कोट्यावधी लोक मनोरंजनासाठी युट्युबचा वापर करतात. मनोरंजनासह युट्युबच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची कमाईही सध्या होत आहे. केवळ लक्षात घेण्याची गोष्ट अशी की, ज्या कॅटेगरीतील कंटेट त्यामधीलच एक महत्त्वाचा भाग म्हणजे त्यामधून पैसे मिळणे. अशातच तुम्हाला प्रश्न पडला असेल युट्युबवर पहिला व्हिडीओ कधी आणि कोणी अपलोड केला असेल? याबद्दलच जाणून घेऊया सविस्तर……

युट्युबवरील पहिला व्हिडीओ कोणता होता?
युट्युबवर पहिला व्हिडीओ Me at the zoo नावाने शेअर करण्यात आला होता. हा व्हिडीओ 23 एप्रिल 2005 रोजी रात्री 8 वाजून 27 मिनिटांनी अपलोड करण्यात आला होता. जावेद नावाच्या एका व्यक्तीने युट्युबवर पहिल्यांदा व्हिडीओ शेअर केला होता. तो सॅन डिएगो झू मध्ये फिरण्यासाठी गेला होता.

व्हिडीओमध्ये खास काय होते?
या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती प्रेक्षकांना हत्तीबद्दल माहिती देत होत. या व्हिडीओला जावेद नावाने युट्युब चॅनलवर जाऊन पाहू शकता. हा व्हिडीओ केवळ 19 सेकंदाचा असून त्याला आतापर्यंत 282 अब्जापेक्षा अधिक व्हूज मिळाले आहेत. (YouTube)

कधी लाँच झाले होते युट्युब? 
युट्युब 14 फेब्रुवारी 2005 रोजी लाँच केला होता. हळूहळू युट्युब प्लॅटफॉर्म ऐवढा प्रसिद्ध झाला की, याच्या माध्यमातून नागरिक मोठी कमाई करू लागले. सध्याच्या काळात जगातील सर्वाधिक सब्सक्राइब असणारा युट्युब चॅनल T-Series आहे.


आणखी वाचा :
इंस्टाग्रामवर म्युझिकसह स्टोरी Save करण्यासाठी वापरा ‘ही’ ट्रिक
सेकेंड हँड iPhone खरेदी करण्याआधी तपासून पाहा ‘या’ गोष्टी
LIC मध्ये गुंतवणूक केलेला तुमचा पैसे कुठे जातो? जाणून घ्या सविस्तर माहिती

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.