Home » मानवांना दारू आवडण्याचे कारण आले समोर; मद्यधुंद माकडांवरील संशोधनातून समोर आली विचित्र गोष्ट

मानवांना दारू आवडण्याचे कारण आले समोर; मद्यधुंद माकडांवरील संशोधनातून समोर आली विचित्र गोष्ट

by Team Gajawaja
0 comment
Fruit Containing Alcohol
Share

पनामामध्ये ब्लॅक-हँडेड स्पायडर मंकी नावाच्या माकडाच्या प्रजातीला पाम फळ खूप आवडते. त्यांना या फळाचे इतके वेड आहे की, ते खाल्ल्यानंतर त्यांना नशा चढते. वास्तविक, पाम फ्रुटमध्ये इथेनॉल नावाचे अल्कोहोल (Fruit Containing Alcohol) असते, त्यामुळे ते खाल्ल्यानंतर माकडांना झोप येते. 

मद्यधुंद माकडांना लक्षात घेऊन अमेरिकेचे शास्त्रज्ञ आता माणसांना दारू इतकी का आवडते, याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी त्यांनी ब्लॅक हॅन्डेड स्पायडर माकडावर संशोधन सुरू केले आहे. तथापि, माकडांच्या इतर अनेक प्रजाती आहेत ज्यांना विविध प्रकारची फळे आणि फुले खाऊन नशा येते.

माकडांच्या मूत्रावर केले संशोधन

संशोधकांनी दोन स्पायडर माकडांच्या लघवीचे नमुने घेतले. तपासणीत, या माकडांच्या लघवीत इथेनॉलचा भक्कम पुरावा आढळला. माकडांच्या शरीरात इथेनॉलचे पचन होऊन, त्याचा वापर होत असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. माकडांनी अल्कोहोल हा त्यांचा थकवा दूर करण्याचा आणि झोपेचा मार्ग बनवला आहे.

माकडे दारूकडे होतात आकर्षित

संशोधनात सहभागी असलेल्या नॉर्थरिज कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञ क्रिस्टीना कॅम्पबेल सांगतात की, जंगलात राहणारी माकडे नशा करतात. हे पहिल्यांदा २००० मध्ये जीवशास्त्रज्ञ रॉबर्ट डडले यांनी सांगितले होते. 

डुडले म्हणाले की, माकडे दारूच्या चव आणि वासाकडे आकर्षित होतात. ते मादक फळे (Fruit Containing Alcohol) ओळखतात आणि त्वरीत खातात, जेणेकरून इतर कोणताही प्राण्यांनी तिथे येऊन ती फळे खाऊ नयेत. आता हे गृहितक खरे असल्याचे सिद्ध झाले आहे.

माकडे ऊर्जेसाठी इथेनॉल वापरतात

संशोधनात समाविष्ट असलेल्या माकडांना इथेनॉलने भरलेली फळे खायला देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, माकडांनी या फळांना स्वतःपासून लांब केले. जेव्हा या माकडांना बाहेर जंगलात सोडण्यात आले, तेव्हा मात्र ते स्वतःच पाम फ्रुट (Fruit Containing Alcohol)  शोधून खाऊ लागले.

या संशोधनातून असे दिसून आले आहे की, माकडे केवळ नशेसाठी नव्हे, तर त्यांची पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी आणि ऊर्जा पातळी वाढवण्यासाठी इथेनॉल असलेली, आंबलेली फळे (Fruit Containing Alcohol)  खाण्यास प्राधान्य देतात.

अल्कोहोलची सवय देखील आहे उत्क्रांतीचा एक भाग

माणसांची विचारसरणीही माकडांप्रमाणे असू शकते, असे क्रिस्टीना मानते. कदाचित मानवांना देखील ऊर्जा वाढवण्यासाठी आणि थकवा दूर करण्यासाठी अल्कोहोल घेणे आवडते. मध्य आणि दक्षिण अमेरिकेतील स्थानिक लोक या पाम फळाचा वापर करतात. यापासून चिचा नावाची देशी दारू तयार केली जाते. तुम्ही जितकी जास्त आंबलेली फळे खाल,  तितकी जास्त ताकद तुमच्या शरीराला मिळेल.

=========

हे देखील वाचा –

शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, उत्क्रांतीचे गुणधर्म लाखो वर्षांपासून माकडांकडून मानवांमध्ये हस्तांतरित केले गेले आहेत. म्हणजे माकड असो वा माणूस, दारू सर्वांनाच आवडते. मानव, चिंपांझी, बोनोबोस आणि गोरिलामध्ये खूप समान जीन्स आहेत. यापैकी एक जीन असे आहे की, ते इथेनॉल एंझाइम ४० पटीने सुधारते.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.