Home » सेकेंड हँड iPhone खरेदी करण्याआधी तपासून पाहा ‘या’ गोष्टी

सेकेंड हँड iPhone खरेदी करण्याआधी तपासून पाहा ‘या’ गोष्टी

बहुतांशजण सेकेंड हँड आयफोन खरेदी करत करत असाल तर काही गोष्टी जरूर जाणून घ्या. अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते.

by Team Gajawaja
0 comment
Second Hand iPhone
Share

Second Hand iPhone Buying Tips : बहुतांशजण ऑनलाइन पद्धतीने आयफोन कमी किंमतीत कसा खरेदी करता येईल याचा प्रयत्न करतात. यामागे मुख्य कारण म्हणजे आयफोनची किंमत. खरंतर ई-कॉमर्सवर चालणे सेल किंवा सेकेंड हॅण्ड मोबाईल घेण्याचा बहुतांशजण विचार करतात. ही डील फायद्याची असली तरीही तुमचा पुढे जाऊन तोटा होऊ शकतो हे लक्षात घ्या. अशातच सेकेंड हॅण्ड आयफोन खरेदी करताना पुढील काही गोष्टी लक्षात ठेवा.

आधीच तपासून घ्या खरेदी बिल
ज्यावेळी सेकेंड हॅण्ड आयफोन खरेदी करता त्यावेळी ज्या व्यक्तीने घेतलाय त्याच्याकडून खरेदी बिल घ्या. खरंतर, काहीवेळेस फोन जुना झाला असला तरीही त्याची वॉरंटी असते. जर फोनची मूळ रिसिप्ट असल्यास तुम्ही फोनच्या वॉरंटीसंदर्भातील माहिती तपासून पाहू शकता.

सीरियल क्रमांक असा तपासून पाहा
वॉरंटी वेरिफाय करण्यासाठी सर्वप्रथम आयफोनच्या सेटिंग्समध्ये जा. येथे जनरल ऑप्शनवर जा आणि अबाउट सेक्शनवर क्लिक करा. आयफोनचा सीरियल क्रमांकही तपासून पाहू शकता. या सीरियल क्रमांकाला कॉपी करा आणि checkcoverage.apple.com वर टाकून सर्व माहिती तपासून पाहू शकता.

बॅटरी हेल्थकडे लक्ष द्या
कोणत्याही आयफोनची बॅटरी उत्तम असणे फार महत्त्वाचे असते. आयफोनची बॅटरी 80 टक्क्यांहून अधिक असल्यास फोन खरेदी करण्यास काहीही समस्या नाही. यासाठी आयफोनची बॅटरी हेल्थ तपासून पाहण्यासाठी सर्वप्रथम आयफोनच्या सेटिंग्समध्ये जा. येथे गेल्यानंतर बॅटरीच्या ऑप्शनवर क्लिक करा. येथे Battery health and charging च्या ऑप्शनवर क्लिक करा. येथे तुम्हाला बॅटरी हेल्थ तपासून पाहता येत नसल्यास आयफोन नकली आहे हे समजून जा. (Second Hand iPhone Buying Tips)

डिस्प्लेबद्दल माहिती मिळवा
लेटेस्ट आयफोनमध्ये तुम्ही अगदी सहज तपासून पाहू शकता की, आयफोनच्या डिस्प्ले अनऑफिशिअल सर्विस सेंटरवर रिप्लेस किंवा रिपेअर केला आहे की नाही. हे तपासून पाहण्यासाठी आयफोनच्या सेटिंग्समध्ये जा. येथे डिस्प्ले अॅण्ड ब्राइटनेसवर क्लिक करा. तुम्ही ट्रु टोन अॅक्विट्वह केला जाऊ शकतो. जर तुम्ही हे अॅक्टिव्ह करू शकत नसल्यास आयफोन रिपेअर केल्याचे समजून जा.


आणखी वाचा :
इंस्टाग्रामवर म्युझिकसह स्टोरी Save करण्यासाठी वापरा ‘ही’ ट्रिक
आता Deepfake बद्दल जाणून घेणे होणार सोपे, Meta करणार हा मोठा बदल
सोशल मीडियाचा अत्याधिक वापर करणाऱ्या व्यक्ती राहतात नैराश्यात, अभ्यासातून खुलासा

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.