Home » हॅरीचा अखेरचा रामराम

हॅरीचा अखेरचा रामराम

by Team Gajawaja
0 comment
Prince Harry
Share

ब्रिटनचा राजा चार्ल्स आणि राजकुमारी डायना यांचा लहान मुलगा प्रिन्स हॅरी (Prince Harry) यांनी आता अधिकृतरित्या ब्रिटनला शेवटचा रामराम केला आहे. प्रिन्स हॅरी आणि त्यांची पत्नी मेघन मार्कल हे आपल्या दोन मुलांसह गेल्या काही वर्षापासून कॅलिफोर्निया, अमेरिका येथे राहत आहेत. या जोडप्यानं चार वर्षापूर्वी राजघराण्यासोबत झालेल्या मतभेदानं ब्रिटनच्या राजघराण्यापासून दूर होत असल्याचे जाहीर केले. राणी एलिझाबेथ द्वितीय हिनं आपल्या या नातवाचा निर्णय मान्य करत त्याला राजघराण्याच्या कर्तव्यापासून मुक्त केले. 

मात्र प्रिन्स हॅरी (Prince Harry) याचा दावा ब्रिटीश राजगद्दीवर कायम असल्याचे सांगण्यात येत होते.  प्रिन्स हॅरी आणि त्याची पत्नी मेघन मार्कल यांच्याबाबत ब्रिटनमधील जनमत चांगले नसले तरी काहीजण त्याचा भावी राजा म्हणूनही उल्लेख करीत असत. त्यातच फ्रान्सचे प्रसिद्ध ज्योतिषवेत्ता नॉस्ट्रेडमस यांनी आपल्या पुस्तकात ब्रिटनच्या राजगादीवर जो सर्वात नावडता आहे, तोच ब्रिटनचा राजा होईल अशी भविष्यवाणी केली आहे. 

नॉस्ट्रेडमसचे हे पुस्तक १५५५ साली आले आहे. यात त्यांनी ब्रिटन राजघराण्याबाबत जे भविष्य सांगितले ते खरे झाले आहे.  त्यानुसार ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय यांचा मृत्यू झाल्यावर जो राजा होईल, त्याचा कार्यकाल अल्पकाळ असेल. आजारामुळे त्याला राजपदाचा त्याग करावा लागेल.  तो ही राजगादी एका नावडत्या व्यक्तिकडे देणार आहे.

सध्या ब्रिटनच्या राजगादीवर राजे चार्ल्स असले तरी त्यांना कॅन्सर झाल्येचा स्पष्ट झाले आहे.  तसेच गेले अनेक महिने राजा चार्ल्स यांना कोणीही पाहिलेले नाही. अशावेळी राजा चार्ल्स आपला उत्ताराधिकारी कोणाला नेमतात याची उत्सुकता आहे.  नॉस्ट्रेडमसच्या भविष्यवाणीनुसार हा उत्तराधिकारी प्रिन्स हॅरी असणार आहे.  मात्र आता याच प्रिन्स हॅरीनं आपला राजघराण्याशी असलेला उरला सुरला संबंधही तोडून टाकला आहे.  त्यामुळेच नॉस्ट्रेडमसची भविष्यवाणी खोटी ठरणार अशी चर्चा चालू झाली आहे.  (Prince Harry)

प्रिन्स हॅरी आणि त्याची पत्नी मेघन मार्कल हे गेले चार वर्ष अमेरिकेत रहात आहेत. असे असले तरी प्रिन्स हॅरी आत्तापर्यंत आपला कायमस्वरुपी पत्ता म्हणून ब्रिटनच्या फ्रोगमोर कॉटेजचा पत्ता लिहित असत.  हा छोटा महल असून ब्रिटनच्या राणी एलिझाबेथनं हा महल प्रिन्स हॅरीला २०१८ मध्ये त्याच्या लग्नाची भेट म्हणून दिला होता.  तेव्हापासून या फ्रोगमोर कॉटेजवर प्रिन्स हॅरीचा ताबा आहे. 

कॅलिफोर्नियात राहत असलेला प्रिन्स जेव्हा ब्रिटनमध्ये येत असे, तेव्हा याच फ्रोगमोर कॉटेजमध्ये त्याचा मुक्काम असे.  तसेच प्रिन्स हॅरी (Prince Harry) आपला कायमस्वरुपी पत्ता म्हणूनही याच फ्रोगमोर कॉटेजचा उल्लेख करीत असत.  त्यावरुनच प्रिन्स हॅरी अद्यापही ब्रिटनमध्ये परत येण्यासाठी उत्सुक असल्याची चर्चा होती.  राजे चार्ल्स यांना कॅन्सर असल्याचे स्पष्ट झाल्यावर प्रिन्स हॅरी आपल्या वडिलांना भेटण्यासाठी तीनवेळा ब्रिटनमध्ये येऊन गेले आहेत. 

त्यावरुन आता या बापलेकामधली दुरी संपल्याचा अंदाज व्यक्त होत होता.  तसेच राजे चार्ल्स प्रिन्स विल्यमपेक्षा प्रिन्स हॅरीची निवड आपला उत्तराधिकारी म्हणून करतील, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती.  पण आता या सर्व शक्यतांना विराम मिळाला आहे.  कारण प्रिन्स हॅरी यांनी आपला कायमस्वरुपी पत्ताच बदलला आहे.  

हॅरीने आपला अधिकृत पत्ता ब्रिटनऐवजी कॅलिफोर्निया, यूएसए असा लिहिला आहे.  पर्यटन धर्मादाय ट्रॅव्हलिस्टच्या दस्तऐवजात, प्रिन्स हॅरीचे पूर्ण नाव आणि त्याचा प्राथमिक पत्ता कॅलिफोर्निया असा लिहिला गेला आहे.  त्यामुळे प्रिन्स हॅरी ब्रिटनमध्ये आता जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.  ब्रिटन राजघराण्याच्या उत्तराधिका-यांमध्ये पाचव्या क्रमांकावर असलेला प्रिन्स हॅरी कायम वादात राहीला आहे.  प्रिन्स विल्यम आणि प्रिन्स हॅरी या दोन भावांमधील नातेही बिघडलेले आहे.  राजघराणे प्रिन्स हॅरीची पत्नी मेघन मार्कल या सर्वांसाठी कारणीभूत असल्याचे सांगत आहे. (Prince Harry)

मेघन मार्कल ही अमेरिकन असून तिने अभिनेत्री म्हणून कामही केले आहे.  मेघन घटस्फोटीता आहे.  ती हॅरीपेक्षा वयानं मोठी आहे.  शिवाय तिची आई ही कृष्णवर्णीय आहे.  राजघराण्यात लग्न करतांना ज्या मुख्य अटी असतात, त्या सर्व अटी तोडून प्रिन्स हॅरीनं मेघन मार्कलसोबत लग्न केले.  या लग्नानंतर हॅरी राजघराण्यापासून दुरावला.  हॅरी आणि मेघननं त्यासाठी राजघराण्याला जबाबदार धरले.  त्यांच्यामते राजघराण्यानं मेघनला कायम कमीपणाची वागणूक दिली.  त्यामुळे चार वर्षापूर्वी हॅरीनं मेघनसह अमेरिकेची वाट धरली.  त्यांना आर्ची नावाचा मुलगा आणि लिलिबेट नावाची मुलगी आहे.  मार्च २०२१ मध्ये या दाम्पत्यानं टिव्ही चॅनलला दिलेली मुलाखत गाजली. 

==========

हे देखील वाचा : विरोधक नारायण राणेंना ‘कोंबडी चोर’ म्हणत का टीका करतात?

==========

या मुलाखतीत मेघनने राजघराण्यावर वर्णद्वेषाचा आरोप केला.  तसेच गरोदरपणातही आपल्यावर वर्णद्वेषाची टिप्पणी झाल्याचे सांगितले.  प्रिन्स हॅरीने १० जानेवारी २०२३ रोजी त्यांचे स्पेअर‘ नावाचे आत्मचरित्र प्रसिद्ध केले.  यातही राजघराण्यावर टिका करण्यात आली आहे.  या दोन्ही गोष्टींमुळे हॅरी आणि मेघनच्यावर ब्रिटनमध्ये प्रचंड टिका झाली.  पण राजे चार्ल्स यांच्या आजारपणात हॅरी ब्रिटनमध्ये येऊ लागल्यावर पुन्हा सर्व सुरळीत झाल्यासारखे वाटत होते.  आता याच हॅरीनं राजघराण्याशी शेवटचा धागाही तोडून टाकला आहे.  त्याच्या या कृतीतून त्याचा राजघराण्यावर असलेला रागच पुन्हा उघड झाला आहे.  

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.