Home » ज्वालामुखीतून सोन्याची धूळ!

ज्वालामुखीतून सोन्याची धूळ!

by Team Gajawaja
0 comment
Volcano
Share

अंटार्क्टिका. या बर्फाच्या खंडाचे प्रत्येकालाच आकर्षण आहे. अंटार्क्टिका हा पृथ्वीचा सर्वात दक्षिणेकडील खंड आहे. १४० दशलक्ष चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेला, आशिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेनंतर हा पृथ्वीचा पाचवा सर्वात मोठा खंड आहे. या अंटार्क्टिकेवर सर्वत्र बर्फाचे साम्राज्य आहे, मात्र या थंडगार प्रदेशातही १३८ सक्रिय ज्वालामुखी(Volcano) आहेत. यातील सर्वात मोठ्या ज्यालामुखीतून चक्क दररोज सोन्याची धुळ उडत असल्याची माहिती तुम्हाला मिळाली तर आश्चर्य वाटले.

पण हे सत्य आहे. अंटार्क्टिकामधील सर्वात मोठ्या ज्यालामुखीमधून(Volcano) दररोज ८० ग्रॅम सोन्याची धूळ उडत आहे. अर्थातच हा ज्वालामुखी सक्रीय आहे. त्यातही हा ज्वालामुखी ज्या भागात आहे, तिथे मानवी वस्ती नसल्यासारखी आहे. त्यामुळे हे धुळीतील सोने गोळा करण्यासाठी कोणीही जात नाही. अंटार्क्टिकामध्ये असलेल्या अन्य ज्वालामुखीमधूनही असेच सोन्याचे कण बाहेर फेकले जातात का याचा तपास सुरु आहे. या बर्फाच्या खाली अनेक सोन्याच्या खाणी दडल्याचा अंदाज संशोधकांनी व्यक्त केला आहे.

अमेरिकेच्या नासा म्हणजेच नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशनच्या अर्थ वेधशाळेतर्फे अंटार्क्टिकामधील ज्वालामुखींचा(Volcano) अभ्यास करण्यात येत आहे. अंटार्क्टिकामधील बर्फाच्या खाली अनेक खनिजे दडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतो. त्यासंदर्भात संशोधन चालू आहे. हे संशोधन करतांना अंटार्क्टिकामधील एका सक्रीय ज्वालामुखीतून चक्क सोन्याचे कण फेकले जात असल्याची माहिती नासाच्या हाती लागली आहे.

अंटार्क्टिकामधील हा ज्वालामुखी(Volcano) दररोज ८० ग्रॅम सोन्याची धूळ उडवत आहे. या ज्वालामुखीचे नाव माउंट एरेबस असून हा जगातील सर्वात मोठा सक्रिय ज्वालामुखी मानला जातो. हा ज्वालामुखी सक्रीय असल्यानं या सोन्याच्या कणांना शोधता येणार नाही. शिवाय हा ज्वालामुखीही अतिशय दुर्गम भागात आहे. तिथे मानवी वस्तीही नाही. त्यामुळे हे सोन्याचे कण या परिसरात सुरक्षित आहेत.

बर्फाचा प्रदेश असलल्या अंटार्क्टिकामध्ये १३८ सक्रिय ज्वालामुखी आहेत. त्यापैकी माउंट एरेबस या ज्वालामुखीतून(Volcano) बाहेर पडणा-या लाव्हाचा आणि त्यातील धुळीच्या कणांचा अभ्यास नासातर्फे करण्यात आला. त्यातून ही धक्कादायक माहिती पुढे आली. अभ्यासातून या ज्वालामुखीतून दररोज जी धुळ उडते त्या धुळीत सोन्याचे कण सापडले आहेत.

 

ज्वालामुखीतून दररोज बाहेर पडणाऱ्या सोन्याची किंमत ५ लाखांहून अधिक असल्याचा अंदाज आहे. याचा तपास करण्यासाठी नासानं स्वतंत्र संशोधकांचे पथक तयार केले आहे. त्यांनी या ज्वालामुखीतून उडणा-या धुळीचे विश्लेषण करून त्यात सोन्याचे कण असल्याची पुष्टी केली आहे. या तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, दररोज अंदाजे ८० ग्रॅम क्रिस्टलाइज्ड सोने बाहेर पडत आहे. याचाच अर्थ या ज्वालामुखीच्या (Volcano)खाली सोन्याची खाण असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

माउंट एरेबस अंटार्क्टिकामधील डिसेप्शन बेटावर असून हे बेटावर अजून एक सक्रीय ज्वालामुखी(Volcano) आहे. संशोधकांनी आता माऊंट एरेबस नंतर या दुसऱ्याही ज्वालामुखीचे परीक्षण करण्यासाठी सुरुवात केली आहे. माउंट एरेबस ज्वालामुखीतील धुळीचे कण गोळा करण्याचे काम अत्यंत कठिण आहे. नासानं यासाठी आपल्या सर्व आधुनिक साधनांचा उपयोग करुन झाला आहे. नासाच्या संशोधकांनी ज्वालामुखीच्या केंद्रापासून ६२१ मैलांवर ही सोन्याची धुळ आढळली आहे.

========

हे देखील पहा : दुबईचा पाऊस की रईसीची हौस…

========

१२४४८ उंच असलेल्या या ज्वालामुखीतून(Volcano) अनेकवेळा धुळीच्या कणांसोबत मोठे खडकही बाहेर फेकले जात आहेत. या खडकांमध्येही सोन्याचे प्रमाण आहे. १९७२ पासून या ज्वालामुखीची(Volcano) पाहणी करण्यात येत आहे. त्याच्या आसपास आता लाव्हा रसानं भरलेला एक छोटा तलावच तयार झाला आहे. ही एक दुर्मिळ घटना असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. कारण अंटार्क्टिकासारख्या थंड प्रदेशातील हे लाव्हा रसाचे तलाव हा संशोधनाचा विषय ठरला आहे.

संपूर्ण अंटार्क्टिकामध्ये पेंग्विन, सील सारखे प्राणी आढळतात. हे समुद्राच्या पाण्यात आणि बर्फावरही सहजपणे राहू शकतात. मात्र या माउंट एरेबसच्या भागात मात्र कोणताही पेंग्विन आढळत नाही. बर्फाळ असूनही ज्वालामुखीची उर्जा या बागात जाणवते. अंटार्क्टिकामधील बर्फ काही वर्षानंतर वितळणार असे सांगण्यात येते. त्यासाठी तेथील असेच सक्रीय ज्वालामुखी कारणीभूत ठरणार आहेत.

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.