Home » आंतरराष्ट्रीय विमानातील एअर हॉस्टेसचा किती असतो पगार?

आंतरराष्ट्रीय विमानातील एअर हॉस्टेसचा किती असतो पगार?

सर्वसामान्यपणे हॉस्टेसचा पगार 50 हजार रुपयांपासून सुरू होतो. पण आंतरराष्ट्रीय फ्लाइट्स बद्दल बोलायचे झाल्यास त्यामधील एअर हॉस्टेसचा पगार किती असतो माहितेय का?

by Team Gajawaja
0 comment
International Air Hostess Salary
Share

Air hostess salary : बहुतांश तरुणांना आयुष्यात काहीतरी हटके करायचे असते. अशातच काही तरुणी एअर हॉस्टेस होण्याचे स्वप्न पाहतात. पण त्यासाठी योग्यता, अभ्यास आणि अनुभव याबद्दल अचूक माहिती असणेही आवश्यक असते. अशातच जाणून घेऊया आंतरराष्ट्रीय फ्लाइट्समधील एअर हॉस्टेलला किती पगार असतो याबद्दल सविस्तर…..

एअर हॉस्टेस होण्यासाठी कोणता अभ्यास करावा लागतो?
एअर हॉस्टेस होण्यासाठी कोणत्याही क्षेत्रातून 12 वी परीक्षा उत्तीर्ण असणे अत्यावश्यक आहे. यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, आर्ट्स किंवा कॉमर्सची गरज नसते. केवळ तुम्हाला 12 वी मध्ये 50 टक्के गुण मिळणे अत्यावश्यक आहे. याशिवाय अॅकेडमीकचीही गरज नसते. कारण यामध्ये पर्सनालिटी फार महत्त्वाची असते.

एखाद्या तरुणीला एअर हॉस्टेस व्हायचे असल्यास तिची उंची कमीत कमी 5.5 असावी. याशिवाय वजनही नियंत्रणात असावे. तुमची उंची 5.5 असल्यास वजन 55 ते 60 दरम्यान असावे.

सर्वसामान्य फ्लाइट्सपेक्षा अत्याधिक पगार असतो एअर हॉस्टेसला
सर्वसामान्य फ्लाइट्सच्या तुलनेत एअर हॉस्टेसला इंटरनॅशनल फ्लाइट्समध्ये अधिक सॅलरी मिळते. यासाठी 12 वी मध्ये उत्तीर्ण असणे अत्याश्यक आहे. यानंतर कोणत्याही इंस्टिट्युटमदून कोर्स करावा लागतो. हा कोर्स दोन वर्षांचा असतो. त्याची वार्षिक फी एक ते दीड लाख रुपये असू शकतो. याशिवाय डोमेस्टिक फ्लाइट्समधील एअरहॉस्टेसचा कमीत कमी पगार 50 हजार रुपयांपर्यंत असतो. पण इंटरनॅशनल फ्लाइट्समधील एअर हॉस्टेसचा पगार दोन ते तीन लाख रुपये ही असू शकतो. (Air hostess salary)

आंतरराष्ट्रीय विमानात एअर हॉस्टेसला वेगळा व्हिसा काढावा लागतो का?
एअर हॉस्टेसला वेगळा व्हिसा काढावा लागतो का असा प्रश्न बहुतांशजणांना पडतो. पण काही देशांमधील पायलट्स आणि एअर हॉस्टेसला व्हिसाशिवाय प्रवास करण्याची परवानगी असते. तर काही देशांसाठी त्यांना स्पेशल व्हिसाची गरज भासते. याशिवाय पासपोर्टही आवश्यक असतो. पण त्यांच्या पासपोर्टवर वेगळा स्टॅप लावला जात नाही.


आणखी वाचा :
सर्वप्रथम YouTube वर कोणी अपलोड केला होता व्हिडीओ?
इंस्टाग्रामवर म्युझिकसह स्टोरी Save करण्यासाठी वापरा ‘ही’ ट्रिक
सेकेंड हँड iPhone खरेदी करण्याआधी तपासून पाहा ‘या’ गोष्टी

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.