Home » गंगा नदीतील डॉल्फिनची बहिण मिळाली…

गंगा नदीतील डॉल्फिनची बहिण मिळाली…

by Team Gajawaja
0 comment
Share

पेरुमध्ये एका डॉल्फिनचे (Dolphin) जीवाश्म सापडले आहे. हे जीवाश्म तब्बल सोळा लाख वर्षापूर्वीचे आहेत. मुख्य म्हणजे, या जीवाश्माचे आणि भारतातील गंगा नदीमधील डॉफ्लिनमध्ये (Dolphin)  कमालीचे साम्य आढळले आहे. गंगा नदीमध्ये हजारो वर्षापासून डॉल्फिन (Dolphin)  सापडत आहेत. गेल्या काही वर्षापासून गंगा नदितील प्रदूषण दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यामुळे गंगा नदितील डॉल्फिनची संख्याही वाढली आहे. आता याच डॉल्फिनचा (Dolphin)  नातेसंबंध दूर 16000 किमी अंतरावर सापडली आहे. पेरु या देशामध्ये गंगा नदीतील डॉल्फिनचा सापडलेला जीवाश्म 16 लाख वर्षापूर्वीचा आहे. यातून एक मोठ्या जलीय चक्राचा उलगडा होऊ शकतो, असे संशोधकांचे मत आहे.

पेरु या देशामध्ये हे जीवाश्म सापडले आहेत. पेरू हा दक्षिण अमेरिका खंडात स्थित एक देश आहे. या देशाची प्रमुख नदी ही ॲमेझॉन आहे. याच नदीमध्ये अनेक प्रकारचे जलचर आहेत. त्यापैकी एक गोड्यापाण्यातील डॉल्फीनही आहेत. असेच गोड्यापाण्यातील डॉल्फिन (Dolphin)  गंगा नदीमध्येही आढळतात. यासंदर्भात संशोधन करणा-या संशोधकांना एक अनमोल असा जीवाश्म सापडला आहे.

हे जीवाश्म डॉल्फिनचे (Dolphin) आहेत. 16 दशलक्ष वर्षे जुने असलेल्या या जीवाश्मामधून जलचर प्राण्यांच्या एका साखळीचा उलगडा करण्यात येणार आहे. मुख्यम्हणजे, त्याचा एक स्त्रोत भारतामध्येही आहे. त्यामुळेच भारतातील डॉल्फिनवर   संशोधन करणा-या केंद्रांमध्ये याबाबत अभ्यास सुरु झाला आहे. डॉल्फिन हा किती जुना जलचर प्राणी आहे, हे यावरुन स्पष्ट झाले आहे. पेरूमध्ये सापडलेला हा जीवाश्म पाहून शास्त्रज्ञ आश्चर्यचकित झाले आहेत. कारण डॉल्फीन (Dolphin)  हा समुद्रात सापडणारा जलचर आहे, असे मानले जात होते, तेव्हा तो नद्यांमध्येही अस्तित्वात होता, हे स्पष्ट झाले आहे.

पेरूमध्ये शास्त्रज्ञांना एका महाकाय डॉल्फिनच्या (Dolphin)  कवटीचा जीवाश्म सापडला आहे. ही प्रजाती 16 दशलक्ष वर्षे जुनी असल्याचे स्पष्ट झाले आहे. पेरूच्या अमेझोनियन नद्यांमध्ये असेच अनेक जलचर आहेत, त्यांचा अभ्यास करण्याची गरज आहे. यातील अनेक जलचरांच्या जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यातीलच एक जलचर म्हणून डॉल्फिनचे नाव घेण्यात येते. मात्र आता सापडलेल्या जीवाश्मामुळे या नदीतील डॉल्फिनच्या (Dolphin) जीवनशैलीवर अधिक प्रकाश टाकता येणार आहे. पेरुमध्ये ज्या डॉल्फिनच्या कवटीचा जीवाश्म मिळाला त्याची लांबी 3.5 मीटर पर्यंत मोजली गेली असती, असेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच अमेझॉन नदीमध्ये महाकाय आकाराचे डॉल्फिन (Dolphin)  16 दशलक्ष वर्षाआधी होते, हे स्पष्ट झालं आहे.

डॉल्फिनसंदर्भात ही माहिती, सायन्स ॲडव्हान्सेसमध्ये प्रसिद्ध झाली आहे. ही माहिती देणा-यांनी या नवीन प्रजातीचे नाव पेबनिस्टा याकुरुना असल्याचे सांगितले आहे. या संशोधकांच्या मते जगभरातील डॉल्फिनवर नामशेष होण्याचा धोका आहे. पुढच्या 40 वर्षापर्यंत डॉल्फिन हा अत्यंत दुर्मिळ जलचर होणार आहे. समुद्रातील डॉल्फिनवर अन्नाच्या कमतरतेचे सावट आहे. असेच सावट काही लाख वर्षापूर्वीही या जलचरांवर आले असावे. त्यामळे अन्नाच्या शोधात काही डॉल्फिन समुद्रातून नदीच्या प्रवाहाकडे गेले. तिथेच त्यांना सुरक्षित आश्रय मिळाला, म्हणजेच त्यांची अन्नाची गरज पूर्ण झाली. मग हे डॉल्फिन (Dolphin) पूर्णपणे गोड्यापाण्यात राहू लागले. आता लाखो वर्षानंतर हेच जलचरांचे चक्र पुन्हा सुरु होण्याच्या बेतात आहे. त्याचवेळी अमेझॉन नदिपात्राच्या काठावर मिळालेल्या जुन्या जीवाश्मांमुळे या प्रक्रियेला मदत होईल, अशी माहिती पुढे येणार आहे.

यासंदर्भात झुरिच विद्यापीठातील जीवाश्मशास्त्र विभागात काम करणारे अल्डो बेनिट्स-पलोमिनो संशोधन करीत आहेत. अमेझॉनमधील डॉल्फिन (Dolphin)  गंगा आणि सिंधू नद्यांमध्ये कसे गेले याचाही ते अभ्यास करणार आहेत. गंगा नदीतील डॉल्फिन आणि सिंधू नदी डॉल्फिन या गोड्या पाण्यातील डॉल्फिनच्या दोन प्रजाती आहेत. हे डॉल्फिन (Dolphin)  भारत, बांगलादेश, नेपाळ आणि पाकिस्तानमध्ये आढळतात.

======

हे देखील पहा : देवनार वृक्षांनी वेढलेलं हाट कालिका मंदिर

======

भारत सरकारने 18 मे 2009 रोजी गंगा डॉल्फिनला (Dolphin)  भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून घोषित केले आहे. गंगा नदीत आढळणा-या गंगा डॉल्फिनच्या संवर्धनासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. या डॉल्फिनच्या (Dolphin)  शिकारीचे प्रमाणही वाढले होते. तेलासाठी त्यांची मोठ्याप्रमाणात होणारी शिकार रोखण्यात सरकारला यश आले आहे. आता याच डॉल्फिनच्या जीवन साखळीवर अभ्यास करणार येणार आहे.
सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.