Home » Facebook वर तुम्हाला कोण स्टॉक करतेय हे ‘या’ ट्रिक्सने कळेल

Facebook वर तुम्हाला कोण स्टॉक करतेय हे ‘या’ ट्रिक्सने कळेल

by Team Gajawaja
0 comment
stalk on fb
Share

सोशल मीडिया साइट फेसबुक सध्या एकमेकांना लगेच कनेक्ट होण्याचे एक माध्यम बनले आहे. येथे लोक आपली पर्सनल आणि प्रोफेशनल माहिती पोस्ट करतात. मात्र काही वेळेस पर्सनल आणि प्रोफेशनल माहिती शेअर करणे सुद्धा नुकसानदायक ठरू शकते. खरंतर जेव्हा तुम्ही तुमच्या फेसबुक प्रोफाइलला लॉक लावत नाही तो पर्यंत सर्वजण तुमच्या बद्दल सर्वकाही माहिती मिळवू शकता. त्यामुळे तुम्हाला कळत नाही की, तुम्हाला फेसबुकवर नक्की कोण स्टॉक करतेय. (Stalk on FB)

एखादा स्टॉक करत असेल तर काय कराल?
जर एखादा गुन्हेगारीच्या प्रवृततीने तुम्हाला स्टॉक करत असेल तर तो तुमचा फोटो, व्हिडिओ आणि पर्सनल, प्रोफोशनल माहिती मिळवू शकतो. याच माहितीचा तो गैरवापर ही करू शकतो. तु्म्ही बातम्यांमध्ये पाहिले, ऐकले असेल की फेसबुकच्या माध्यमातून माहिती काढून गुन्हे केले जातात. अशातच तुम्ही आपल्या फेसबुक प्रोफाइलवर स्टॉक करणाऱ्या व्यक्तीची माहिती अगदी सहज मिळवू शकता.

स्टॉक करणाऱ्याला कसे शोधाल?
-सर्वात प्रथम तुमचे फेसबुक प्रोफाइल डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवर सुरू करा
-आता त्यानंतर Control>U करावे लागेल
-तुमच्यासमोर फेसबुकजे व्यू पेज सुरु होईल
-त्यानंतर Control>F प्रेस करा
-आता तुम्हाला Budddy_id असे लिहायचे आहे
-सर्च केल्यानंतर तुम्हाला काही सर्च दिसतील. त्यापुढे एक कोड दिसेल. ते तुम्हाला कॉपी करायचे आहेत.
-ही सर्व प्रोसेस एका वेगळ्या टॅबमध्ये सुरु करुन Facebook.com/ पुढे पंधरा डिजिटला कोड पेस्ट करावा लागेल. एंटर प्रेस केल्यानंतर स्टॉक करणारे प्रोफाइल तुम्हाला दिसतील

लक्षात ठेवा, या प्रोसेसच्या मदतीने तुम्हाला तुमच्या फ्रेंन्ड लिस्टमधीलच लोकांची माहिती मिळेल. जर एखादा व्यक्ती तुमच्या फ्रेंन्ड लिस्टमध्ये नाही आणि तो तुम्हाला स्टॉक करत असेल तर त्याची माहिती मिळू शकत नाही. (Stalk on FB)

हेही वाचा- Dark Pattern च्या जाळ्यात तुम्ही असे अडकले जाता

दरम्यान,कंपनी आता स्वत:चे अॅप स्टोर तयार करण्याचा विचार करत आहे. अशी चर्चा सुरु आहे की, युरोपियन युनियन असणाऱ्या देशात थेट फेसबुकच्या जाहिरातीवरूनच अॅप डाउनलोड करता येऊ शकते. याची सुरुवात यंदाच्या वर्षाच्या अखेरीस केली जाणार आहे.सध्या मार्केटमध्ये गुगल आणि अॅप्पलचा दबदबा वाढला गेला आहे. युरोपियन युनियनने एक कायदा तयार केला आहे आणि म्हटले ऑप्शनल अॅप स्टोर सुद्धा असावे. मेटाचे असे म्हणणे आहे की, जे डेव्हलपर आपल्या अॅपला फेसबुकवर पब्लिश करतील त्यांना अधिक इंगेजमेंट मिळेल.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.