Home » आता २४ नाही २६ तासांचा दिवस

आता २४ नाही २६ तासांचा दिवस

by Team Gajawaja
0 comment
Days Hours
Share

दिवसाचे किती तास असतात, हा प्रश्न विचारल्यावर बहुधा सर्वचजणं २४ तास असे उत्तर देतील. कारण आपल्या सर्वांना दिवस २४ तासांचा आहे, हे माहित आहे.  पण नॉर्वे या देशातील एका शहरानं चक्क दिवसाचे दोन तास वाढवण्याची मागणी केली आहे.  या शहराचं नाव Vadsø म्हणजेच, वडसो आहे.  या वडसो नगरपालिकेनं आपल्याला २६ तासांचा दिवस मिळावा अशी आश्चर्यचकीत करणारी मागणी केली आहे.  त्यासाठी या शहरातर्फे युरोपिय कमिशनला पत्रही देण्यात आले आहे.(Days Hours)

 नॉर्वे हा बर्फाचा देश आहे. या देशातील बहुतांश शहरे ही बर्फाच्या आवरणाखाली असतात.  नितांत सुंदर असलेल्या देशातील वडसो हे शहरी आपल्या नैसर्गिक सौदर्यानं ओळखलं जातं.  येथे पर्यटक सूर्यास्ताच्यावेळी आकाशात येणारे रंगबिरंगी किरण बघायला जातात.  अतिशांत शांत आणि थंड असलेल्या या शहराचा प्रमुख व्यवसाय हा पर्यटन आहे. आपल्या भागात आलेल्या पर्यटकांना अधिक शांतता लाभावी म्हणूनही येथे २४ तासांऐवजी २६ तास करण्याची मागणी करण्यात आली आहे. आता ही मागणी मान्य होते की नाही, हे मात्र बघण्यासारखे आहे.  (Days Hours)

नॉर्वे हा देश उत्तर ध्रुवाच्या जवळ असल्यामुळे तेथील वातावरण अतिशय थंड असते.  सूर्याची किरणेही येथे फार कमी वेळ असतात.  याच देशातील वडसो या शहरानं वेगळी मागणी केली आहे. या प्रांतानं दिवसाचे २६ तास करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.  सुरुवातील ही मागणी वेगळी वाटते. पण त्यासाठी या भागानं स्पष्टीकरण ही दिले आहे.  तसेच दिवसाचे २६ तास करण्यासाठी जे बदल करावे लागणार आहेत, त्यासाठी प्रयत्नही सुरु केले आहेत.

२६ तासांचा दिवस लागू करण्यासाठी या शहरानं अतिशय रोमांचक योजना बनवली आहे.  यासाठी युरोपियन कमिशनला पत्र लिहून सविस्तर मंजुरीची मागणी केली आहे.  यासाठी वडसो  शहराच्या महापौरांनी पुढाकार घेतला आहे.  वडसोच्या महापौरांनी या योजनेला मोरटाइम प्रोजेक्टअसे नाव दिले आहे.  त्यांच्यामते या योजनेनुसार २६ तासांचा दिवस झाला तर वडसो मधील जनतेला अधिक तासांचा वेळ मिळणार आहे.  त्यामुळे त्यांच्यातील संवाद अधिक दृढ होणार आहे.  (Days Hours)

अर्थातच ही योजना जाहीर केली तरी त्यासाठी काय काय बदल करावे लागणार आहेत, याची वडसोच्या महापौरांना जाणिव आहे.  अगदी आपल्या हातातील छोट्या घड्याळामध्येही २४ तासांचा वेळ दर्शविला जातो. वडसोमध्ये जर २६ तासांचा दिवस लागू झाला, तर पहिल्यांदा ही घड्याळं बदलावी लागणार आहेत. त्यानंतर अशाच अनेक तांत्रिक गोष्टी बदलाव्या लागणार आहेत.  त्यात मोबाईलपासून ते या प्रांतात बसवण्यात आलेली हवामान मापन पद्धती याचाही समावेश आहे.  

वडसोच्या महापौरांनी यासंदर्भात आपली योजना जाहीर केली आहे. २६ तासांचा दिवस करण्यामागचे प्रमुख कारण त्यांनी शहरातील जनतेला त्यांच्या कुटुंबियांसोबत अधिक वेळ घालवता येईल हे सांगितले आहे.  हे करतांना नागरिकांना नवीन गोष्टीही शिकता येणार आहेत.  मुळातच संपूर्ण नॉर्वे शहराची लोकसंख्याही काही लाखांच्या आसपास आहे.  तिथे या वडसो शहराची लोकसंख्या किती असेल याचा अंदाज करुया.  अगदी एका छोट्या गावाएवढं हे शहर आहे.  ज्याप्रमाणे गावात वातावरण असते, तसेच या वडसोमध्ये आहे.   रशियन सीमेजवळ असलेल्या या  शहरात अत्यंत कमी लोकसंख्या आहे.  त्यामुळे मोजकी घरे येथे आहेत. (Days Hours)

या सर्व भागात येणा-या पर्यटकांचीही संख्या त्यामुळे कमी आहे.  वडसोच्या महापौरांना विश्वास आहे की २६ तासांचा दिवस केल्यानं या भागात येणा-या नागरिकांची संख्या वाढले.  नागरिकांना एकमेकांचा परिचय अधिक चांगल्या पद्धतीनं करुन घेता येईल.  पर्यटन वाढले की येथील आर्थिक सुबत्ताही वाढेल असा महापौरांचा विश्वास आहे.  यासाठी वडसोचे महापौर वांचे पेडरसन यांनी युरोपिय कमिशनला आग्रह केला आहे. (Days Hours)

============

हे देखील वाचा : हनुमान गढीवर भक्तांचा महापूर

============

२६ तास झाल्यावर वडसोमध्ये मासेमारी करण्यासाठी, शिकार करण्यासाठी नागरिकांना अधिक वेळ मिळणार आहे.  त्यांच्यामते या भागातील जीवनशैली ही भिन्न आहे.  येथील वातावरण त्यास कारणीभूत ठरते.  अतिशय थंड असलेल्या या भागीची  जीवनशैली बर्फाच्या प्रमाणावर अवलंबून असते.  बहुतांश भागात बर्फाची जाड चादर असते.  त्यामुळे येथील नागरिक एकमेकांना भेटू शकत नाहीत.  जर त्यात दिवसाचे दोन तास वाढवले तर परिस्थिती सुधारेल, अशी आशा महापौरांना आहे.  

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.