Home » मलिशियाच्या गायब विमानामागे एलियन

मलिशियाच्या गायब विमानामागे एलियन

by Team Gajawaja
0 comment
Aliens
Share

८ मार्च २०१४ ही तारीख मलेशिया आणि चीनच्या इतिहासात कायम लक्षात ठेवली जाणार आहे. या दिवशी मसेशियाचे एक विमान त्याच्या क्रू मेंबर आणि प्रवाशांसह गायब झाले.  आजपर्यंतही या विमानाचा शोध घेता आलेला नाही.  आता दहा वर्षानंतर पुन्हा हेच विमान चर्चेत आले आहे.  त्याचे कारण आहे, सोशल मिडियावर या विमानाबाबत सुरु झालेली चर्चा.  मलेशियाचे MH३७० हे विमान गायब झाल्यानंतर पुन्हा त्याची चर्चा सुरु झाली, त्याला कारण ठरले आहेत, एलियन्स. 

सोशल मिडियावर या विमानाचा व्हिडिओ शेअर करत एका व्यक्तीनं त्या विमानासोबत एक दुसरे विमान असल्याचे दाखवण्यात आले आहे.  ते विमान एलियनचे असल्याचा दावा कऱण्यात आला असून याच एलियनने हे विमान पळवले असल्याचे या व्यक्तीनं सांगितले आहे.  सोशल मिडियावर या विमानाची चर्चा एवढी चालू झाली आहे की, अब्जाधीश एलेन मक्सनेही यात उडी घेतली आहे.  त्यानं एलियनने हे विमान पळवल्याची शक्यता फेटाळून लावली आहे.  तरीही दहा वर्ष एखादे विमान कसे गायब होऊ शकते, हा प्रश्न विचारण्यात येत आहे.  

जगात अनेक रहस्यमयी घटना होतात, ज्यांची उकल करणे कधीही शक्य होत नाही.  त्यातच मलेशियाच्या एका विमानाची घटना आहे.  मलेशियन एअरलाइन्स बोइंग ७७७ MH३७०  ने मार्च २०१४ रोजी क्वालालंपूर, मलेशिया येथून उड्डाण केले. हे विमान बीजिंगला जाणार होते. त्या विमानात १२क्रू मेंबर आणि २२७ प्रवासी होते.  हे सर्वच प्रवाशी चीनचे होते.  उड्डाणानंतर अगदी दहा मिनिटाच्या आता या विमानाचा रडारशी संपर्क तुटला. 

त्यानंतर विमानाशी संपर्क करण्याचा अनेकवेळा प्रयत्न करण्यात आला. अगदी चीन आणि जगातील अन्य देशांनीही हे विमान शोधण्याचा प्रयत्न केला.  पण त्यानंतर हे विमान नेमके कुठे गेले याबाबत कधीही तपास लागला नाही.  मलेशियाच्या या विमानाचा माग उपग्रहामार्फतही काढण्याचा प्रयत्न झाला.  त्यातही अपयश आले.  जणू अख्खं विमान गायब झाल्यासारखे झाले.  त्यासोबत त्यातील प्रवाशीही गायब झाले.  या २२७ प्रवाशांपैकी आणि १२ क्रू मेंबरपैकी कुणाबरोबरही नंतर साधा संपर्कही झाला नाही.  विमान अपघातांमध्ये सर्वात आश्चर्यचकीत घटना म्हणून या घटनेचा उल्लेख करण्यात येतो.  

MH३७० गायब झालेल्या दिवसाला आता दहा वर्ष झाली आहेत. आजपर्यंत त्या विमानाचा कोणताही अवशेष सापडलेला नाही किंवा त्या विमानाची कोणतीही बातमी मिळालेली नाही. आता ते विमान बेपत्ता होण्यामागे एलियन्सचा हात असल्याचा संशय सोशल मिडियावर व्यक्त करण्यात आला.  त्यानंतर पुन्हा MH३७०या विमानाची चर्चा सुरु झाली आहे.   

यासाठी एका व्यक्तीनं एक व्हिडिओ शेअर करत MH३७०च्या शेजरी दुसरे तबकडीसारखे विमान उडत असल्याचे दाखवले आहे.  हे विमान एलियनचे असल्याचा दावा त्यांनी केला.  हा व्हिडिओ काही क्षणात व्हायरल झाला. त्याच्यावर उलटसुलट चर्चा सुरु झाली.  एलॉन मस्कनेही या दाव्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.  मस्क यांनी कुठल्याही एलिनय शिपची कल्पना नाकारली आहे.  तसेच आमच्या कंपनीला एलियन शिप दिसले तर त्याचे पहिले फोटो आम्ही शेअर करु असेही सांगितले.  असे असले तरी MH३७० या विमानाचे रहस्य कायम आहे.  

==============

हे देखील वाचा : गाझापट्टीच्या हवेची अमेरिकन विद्यापिठात धडक

==============

MH३७० हे विमान कायम एक रहस्य म्हणून नोंदवले गेले. या हरवलेल्या विमानाचा शोध हा विमान वाहतुकीच्या इतिहासातील सर्वात महागडा शोध ठरला. विमानाने दक्षिण हिंद महासागरात दक्षिणेकडे प्रवास केला होता. बेपत्ता झाल्यानंतर लगेचच त्याचा उपग्रहामार्फतही शोध घेण्यात आला. त्यासाठी खास रडार असलेल्या बोटीही शोध मोहिमेवर रवाना झाल्या.  पण त्यांना यश आले नाही.  या संपूर्ण शोध मोहिमेवर  चीनी नागरिकांनी प्रचंड टिका केली.  कारण या विमानातील बहुतांश प्रवासी हे चीनमधील होते.  २०१५ आणि २०१६ दरम्यान पश्चिम हिंदी महासागरात ढिगाऱ्यांचे अनेक तुकडे किनाऱ्यावर वाहून गेलेयापैकी अनेक तुकडे MH३७० चे असल्याचे सांगितले गेले.  मात्र त्यातील प्रवाशांचे कुठलेही अवशेष मिळाले नाही, हे ही एक गुढ होते.  दहा वर्षानंतर हेच MH३७० विमान पुन्हा चर्चेत आले आहे.  

सई बने

 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.