Home » गाझापट्टीच्या हवेची अमेरिकन विद्यापिठात धडक

गाझापट्टीच्या हवेची अमेरिकन विद्यापिठात धडक

by Team Gajawaja
0 comment
American University
Share

गेल्या सहा महिन्यापासून सुरु असलेल्या हमास आणि इस्रायलमध्ये सुरु असलेल्या युद्धाचे पडसाद अमेरिकेच्या मोठ्या उद्यागाला बसण्याची शक्यता आहे.  हा उद्योग म्हणजे, शिक्षणक्षेत्र. अमेरिकेतील विद्यापीठात (American University) जगभरातील विद्यार्थी मोठ्या संख्येने शिक्षण घेण्यासाठी येतात.  यात पदव्योत्तर शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. 

आता याच विद्यार्थ्यांमध्ये इस्रायलने गाझापट्टीमध्ये केलेल्या कारवाईविरोधात असंतोष निर्माण झाला आहे.  परिणामी या विद्यापिठात इस्त्रायलच्या विरोधात आंदोलने सुरु झाली आहेत. या विद्यार्थ्यांना विद्यापीठ प्रशासनानं समज दिली, मात्र त्यांची आंदलने थांबण्याऐवजी ती उग्र झाली.  परिणामी या विद्यापिठात पोलीसांना बोलवावे लागले आहे. पोलीसांनी आंदोलन करणा-या विद्यार्थ्यांना अटक केली आहे. 

यात एका भारतीय विद्यार्थिनीचाही समावेश आहे.  ही आंदोलनाची हवा अन्य विद्यापीठातही पसरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.  त्यामुळे अमेरिकेत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. अमेरिकेत या विद्यापीठांमार्फेत मोठा आर्थिक व्यवहार होतो.  यात लाखो विद्यार्थी जगभरातून येतात. त्यामुळे येथील शिक्षण क्षेत्र हे एका उद्योगाच्या स्वरुपात उदयाला आले आहे. अमेरिकेत अंदाजे ६००० महाविद्यालये आणि विद्यापीठे आहेत.  या सर्वच विद्यापीठात आता अमेरिकन सरकारन सतर्क रहाण्याच्या सूचना दिल्या आहेत.  (American University)

हमासने ऑक्टोबर रोजी इस्रायलच्या शहरांवर पाच हजारांहून अधिक रॉकेट डागून हल्ला केला.  त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने गाझापट्टीमध्ये हमासच्या दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू केली. ही कारवाई अद्यापही चालू आहे.  परिणामी संपूर्ण गाझापट्टी उद्धवस्त झाली आहे.  इस्रायलला हमासचा नायनाट करायचा आहे. 

त्यामुळे त्यांच्या रॉकेटचा मारा रोज या गाझापट्टीवर होत आहे.  या रॉकेटच्या मा-याचा अधिक त्रास येथील सर्वसामान्यांना होत आहे.  अनेक लहान मुले या हल्ल्यात मारली गेली आहेत आणि तितकीच जखमी झाली आहेत.  गाझापट्टीमध्ये निर्माण झालेल्या या मानवतावादी परिस्थितीबद्दल अमेरिकेत संताप वाढत आहे.  त्याचेच परिणाम अमेरिकेतील विद्यापीठात दिसू लागले आहेत.  दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठात झालेल्या निदर्शनानं त्याची सुरुवात झाल.  आता हे इस्रायलविरोधी आंदोलन इतरही विद्यापीठांमध्ये पसरत असून त्यामुळे अमेरिकन सरकारनं चिंता व्यक्त केली आहे. (American University)

लॉस एंजेलिस पोलिस विभागाने युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियामध्ये ९३ विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे.  या आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या जेवढी मोठी आहे, तेवढीच संख्या त्यांना बाहेरुन पाठिंबा व्यक्त करणा-यांची आहे.  त्यामुळेच अमेरिकेतील प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.  अमेरिकन विद्यापिठात प्रवेश घेण्यासाठी दोन सत्रात परीक्षा होतात.  त्यात ऑगस्ट आणि डिसेंबर महिने आहेत.  ऑगस्ट महिन्यात जे प्रवेश होतात, त्याची तयारी आता सुरु झाली आहे. 

जगभरातून येणा-या या विद्यार्थ्यांसाठी बहुतांश देशांमध्ये अमेरिकन विद्यापिठे आपले प्रतिनिधी पाठवतात. हे प्रतिनिधी संबंधित विद्यार्थ्यांमधून सर्वोत्तम विद्यार्थी निवडतात आणि त्यांना आपल्या विद्यापीठात प्रवेश देतात.  मात्र आता या निवड प्रक्रियेदरम्यानच अमेरिकन विद्यापिठात आंदोलनाची हवा पसरत असल्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.  त्यातच अमेरिकेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांवर हल्ला करण्याचे आणि त्यात त्यांचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे.  गेल्या सहा महिन्यात भारातातील किमान ८ विद्यार्थ्यांचा अशा स्वरुपाच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.  याचाही परिणाम प्रवेश प्रक्रीयेवर होत आहे.  (American University)

त्यामुळेच अमेरिकन प्रशासनानं आता आंदोलनकारी विद्यार्थ्यांवर कडक निर्बंध घालायला सुरुवात केली आहे.  लॉस एंजेलिस पोलिस विभागानं विद्यापीठ खाजगी कॅम्पस आहेत, तिथे प्राणघातक शस्त्रांचा वापर झाला तर अटक हाच एक मार्ग असल्याची नोटीस विद्यार्थ्यांना दिली आहे.  शिवाय अमेरिकन संसदेचे अध्यक्ष माइक जॉन्सन यांनी कोलंबिया विद्यापीठाला भेट देऊन तेथील परिस्थितीची पहाणी केली.  अमेरिकन विद्यापीठे कोणीही ताब्यात घेऊ शकत नाहीत, असे आश्वासन त्यांनी केले. मात्र, जॉन्सन यांनी विद्यापीठाला भेट दिल्यावर विद्यार्थ्यांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली आणि भाषणादरम्यान अपशब्दही वापरले.  ही सर्वच परिस्थिती चिंताजनक असल्याचे पोलीसांनी सांगितले. यानंतर ज्या विद्यार्थ्यांना अटक झाली त्यात भारतातील एक विद्यार्थिनीचा समावेश आहे.  या तरुणीला आंदोलनामुळे ती रहात असलेल्या ब्लॉकमधूनही बाहेर काढण्यात आले आहे.  (American University)

============

हे देखील वाचा : पत्रकार ऑस्ट्रेलियाची, प्रश्न पाकिस्तानचा आणि उत्तर अमेरिकेचे

============

अमेरिकेमध्ये सध्या ६००० विद्यापीठे आहेत. यातील बहुतांशी विद्यापिठे ही फक्त परदेशातून आलेल्या विद्यार्थ्यांकडून मिळणा-या पैशातून चालतात.  २०२० मध्ये अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये सुमारे २० दशलक्ष विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.  हे सर्व अन्य देशातील विद्यार्थी आहेत.  कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क, टेक्सास आणि पेनसिल्व्हेनिया ही सर्वाधिक महाविद्यालये आणि विद्यापीठे असलेली राज्ये आहेत. प्रत्येक राज्यात २०० पेक्षा जास्त संस्था आहेत आणि कॅलिफोर्निया हे एकमेव राज्य आहे जिथे ३०० पेक्षा जास्त विद्यापीठे आहेत.  या सर्वच विद्यापीठांना आता सरकारतर्फे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत.  

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.