Home » पत्रकार ऑस्ट्रेलियाची, प्रश्न पाकिस्तानचा आणि उत्तर अमेरिकेचे

पत्रकार ऑस्ट्रेलियाची, प्रश्न पाकिस्तानचा आणि उत्तर अमेरिकेचे

by Team Gajawaja
0 comment
Journalist
Share

भारताचे जागतिक स्थान कितवे हे आकड्यात सांगितले नसले तरी भारताचे वजन आंतराष्ट्रीय स्तरावर वाढले आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. काही वर्षापूर्वी भारतात घडलेल्या घटनांबद्दल युरोपीय देशांमध्ये प्रश्न विचारले जायचे.  मात्र आता भारतासंदर्भातील घटनांमध्ये आपली ढवळाढवळ योग्य नसल्याची जाणीव या देशांना झाली आहे.  जगात स्वतःला सर्वोच्च स्थानावर समजत असलेला अमेरिकाही त्यात आहे.   नुकतीच ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनची दक्षिण आशिया पत्रकार अवनी डियाझ ही चर्चेत आली आहे. (Journalist)

अवनीने आपल्याला भारतीय सरकारनं निवडणुकांचे कव्हरेज करण्यापासून रोखल्याचा गळा काढला.  भारतासंदर्भात आंतरराष्ट्रीय सोशल मिडियावरुन टिपण्णी तिने केली.  यावरुन भारतात मिडियला निवडणुकीत रोखण्यात येत आहे का अशी चर्चा काही देशांमध्ये सुरु झाली.  अर्थातच आपला शेजारी पाकिस्तान त्यात पहिल्या नंबरवर होता.  अमरिकेमध्ये एका पत्रकार परिषदेमध्ये या ऑस्ट्रेलियाच्या अवनी संदर्भात ऑस्ट्रेलियन पत्रकारानं नाही तर पाकिस्तानी पत्रकाराने प्रश्न उपस्थित केला. 

यावर अमेरिका काय उत्तर देणार हे महत्त्वाचे होते. मात्र यावर अमेरिकेने प्रत्येक देशाचे काही नियम असतात.  त्यांना त्यांच्या देशात कुणाला रिपोर्टिग करु द्यायचे आहे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.  त्यामुळेच आम्ही भारताच्या विषयात पडणार नाही असे स्पष्ट सांगितले.  यावर अवनी सोबत पाकिस्तानी पत्रकारही तोंडावर पडले आहेत.  या घटनेमुळे भारताचा आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढलेला दबदबा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.  (Journalist)

भारतात लोकसभेच्या निवडणुका सुरु आहेत.  १९ एप्रिल ते १ जून या कालवधीत तब्बल सात टप्प्यात मतदान होणार आहेत.  ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे.  २८  राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशात होणा-या निवडूक प्रक्रीयेसाठी भारतीयांसोबत परदेशी नागरिकांनाही उत्सुकता असते.  त्यामुळेच जगभरातील पत्रकार भारतात येत असतात.  अशाच पत्रकारांमध्ये ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनची दक्षिण आशिया पत्रकार अवनी हिचा समावेश होता.  अवनीला तिचा भारतातील व्हिसा वाढवून देण्यात येणार होता. 

मात्र अवनीने त्यासंदर्भातील आदेशाचे योग्य अवकलन न करताच भारतासंदर्भात टिका करायला सुरुवात केली.  अवनीने आपल्याला भारताने निवडणूक प्रक्रीयेपासून दूर केले.  हे सांगायला सुरुवात केली.  यामागे तिचा भारतीय निवडणुकांमध्ये फेरफार केले जातात, हे सांगण्याचा उद्देश होता.  तिच्या या तक्रारीची दखल इतर कोणीही घेतली नाही तरी पाकिस्ताननं घेतली.  आधीज भारतीय निवडणूक प्रक्रीयेनं खवळलेल्या पाकिस्ताननं अवनीची बाजू थेट अमेरिकेच्या कोर्टात ठेवली.  (Journalist)

याआधी भारताच्या परराष्ट्र खात्यानं अवनी संदर्भात झालेल्या कारवाईची माहिती आवश्यक तिथे दिली होती.  अवनीच्या विनंतीवरून, अवनीला सार्वत्रिक निवडणुकांच्या कव्हरेजसाठी तिचा व्हिसा वाढविला जाईल असे आश्वासन दिले गेले आहे.  सर्व व्हिसाधारक पत्रकारांना बूथच्या बाहेरील निवडणूक कार्यक्रम कव्हर करण्याची परवानगी आहे.  तशीच ती अवनीलाही होती.  पण या सर्वांची खात्री करुन न घेता, अवनीने भारत सोडण्याचा निर्णय घेतला आणि आंतरराष्ट्रीय सोशल मिडियावर भारताला बदनाम करण्यास सुरुवात केली.  हे प्रकरण अमेरितेच्या परराष्ट्र खात्याकडे गेले. त्यांच्या पत्रकार परिषदेत याबाबत पाकिस्तानच्या पत्रकाराने प्रश्न विचारला. 

============

हे देखील वाचा : माया संस्कृतीची राजेशाही अचानक कशी संपली

============

शिवाय भारताला याप्रकरणी जाब विचारणार का, असेही विचारले.  त्यावर अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे उपप्रवक्ते वेदांत पटेल यांनी  कोणत्या परदेशी नागरिकांना प्रवेश द्यायचा की नाही हे तो देशच ठरवेल. मग तो अल्पकालीन प्रवासी असो वा आंतरराष्ट्रीय पत्रकार.  भारत सरकार आपल्या व्हिसा धोरणाबद्दल माहिती सांगेल, तो अधिकार आम्हाला नाही.  असे स्पष्ट करुन पाकिस्तानी आणि ऑस्ट्रेलियाच्या पत्रकारांना तोंडघाशी पाडले आहे. (Journalist) 

भारतानं यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली नसली तरी भारतातर्फे अवनीच्या दाव्यावर आधीच निवडणूक प्रकियेतील सर्व नियम स्पष्ट केले होते.  या सर्वांनंतर आंतरराष्ट्रीय पत्रकार काय स्वरुपात भारताची प्रतिमा जगभरात देत आहेत, याचीही चर्चा सुरु आहे.  अनेकवेळा भारतासंदर्भात गैरसमज होतील, असे वृत्तांकन करणा-या या पत्रकारांवर वेळीच कारवाई व्हावी अशी मागणीही आता होत आहे.  

सई बने

 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.