Home » Sabyasachi च्या फॅशनचा जलवा

Sabyasachi च्या फॅशनचा जलवा

by Team Gajawaja
0 comment
Sabyasachi
Share

न्यूयॉर्कच्या रस्त्यावरील एक फोटो शुट चर्चेत आलं आहे.  पांढऱ्या शर्टवर बेज रंगाची पँट आणि गळ्यात टूमलाइन, हिरे, मोती आणि पाचू यांचा जड नेकलेस घातलेला सब्यसाची मुखर्जी याच्या या फोटोनं एक इतिहास रचला आहे, असं सांगितलं तर आश्चर्य वाटेल.  मात्र भारताच्या साडीला नवं रुप देणा-या आणि भारतीय विणकामातील खासियत जगभर करणा-या सब्यसाची मुखर्जी हा मेट गालाच्या रेड कार्पेटवर हजेरी लावणारा पहिला भारतीय डिझायनर ठरला आहे. (Sabyasachi)

प्रसिद्ध बॉलीवूड फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जीचे पोशाख या मानाच्या समजल्या जाणा-या मेट गालाच्या रेट कार्पेटवर घालून फिरणा-या सौदर्यवती आत्तापर्यंत दिसत होत्या.  मात्र यावेळी थेट सब्यसाचीलाच या रेट कार्पेटवर मानाचे आमंत्रण आले.  ही भारतीय फॅशन विश्वातील मोठी गोष्ट ठरली आहे.  बॉलिवडूमधील कलाकारांच्या लग्नाचे पोशाख करणारा ड्रेस डिझाइनर अशी सब्यसाचीची ओळख आहे. 

मात्र सब्यसाचीनं आपल्या भारतीय कपड्यातील खुबी ओळखून त्याचा सर्वदूर प्रचार केला आहे.  भारताची ओळख असलेल्या भरकामालाही सब्यसाचीनं नवीन रुप दिलं आहे.  आपल्या देशाच्या विविध भागातील याच भरतकामाला एकत्र करत त्याचे पारंपारिक रुप सब्यसाचीनं जगासमोर सादर केले आहे.  त्यामुळेच बॉलिवूडसह  हॉलिवूडमध्येही सब्यसाचीनं डिझाइन केलेल्या कपड्यांना मोठी मागणी आहे.  (Sabyasachi)

मेट गाला हा अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये होणारा प्रसिद्ध फॅशन शो सुरु झाला आणि अभिनेत्री आलिया भटचा सुंदर साडीमधील फोटो व्हायरल झाला. आलियानं डिझाइनर सब्यसाचीनं डीझाइन केलेली ही साडी घालून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.  तिच्या या लूकची चर्चा मेट गालामध्ये रंगली असतानाच मेट गालाच्या दुस-या दिवशी थेट सब्यसाची मुखर्जीचेच फोटे शेअर करण्यात आले.  न्यूयॉर्क शहरातील रस्त्यांवर उभा राहून पोज देतानांचे हे सब्यसाचीचे फोटे खास ठरले.(Sabyasachi)

  कारण सब्यसाची हा मेट गालामध्ये हजेरी लावणारा पहिला भारतीय फॅशन डिझायनर ठरला आहे.  सब्यसाचीनं त्याच्याच सब्यसाची रिसॉर्ट २०२४’ या कलेक्शनमधील  एम्ब्रॉयडरी केलेला पांढ-या रंगाचा कॉटन डस्टर कोट, पांढरा शर्ट आणि बेज पँट हा पोशाख या खास दिवसासाठी निवडला.  सोबतच त्यांनं घातलेल्या ज्वेलरीनंही सर्वांच्याच भुवया उंचवल्या.  मोती, पन्ना, हिरा, टूमलाइन लेयर्ड नेकपीस, हातात मोठ्या बांगड्या,  सनग्लासेस आणि ब्राउन शूजने त्याने लूक पूर्ण केला आहे.  भारताच्या हस्तकलेला जागतिक दर्जा देण्यामध्ये सब्यसाचीची महत्त्वाची भूमिका आहे.  

कलकत्याच्या एक ब्राह्मण घरात जन्मलेल्या या सब्यसाचीनं आपल्या कलेच्या जोरावर स्वतःच्या नावाचा ब्रॅन्ड तयार केला आहे.  त्याच्या या करिअरची सुरुवात बहिणीनं दिलेल्या २० हजार रुपायांपासून झाली आहे. कोलकाता मध्ये १९७४ मध्ये त्यांचा जन्म झाला.  त्यांचे प्रारंभिक शिक्षण चंदननगर येथील श्री अरबिंदो विद्यामंदिर येथे झाले. वयाच्या १५ व्या वर्षीच त्य़ानं फॅशन डिझाईनर म्हणून काम करायचे ठरवले.  त्यासाठी आपल्या बहिणीकडून २० हजार रुपये उधारीवर घेतले. १९९९ मध्ये त्यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी इंडिया मधून पदवी प्राप्त केली.(Sabyasachi)

त्यानंतर अवघ्या चार महिन्यातच सब्यसाची लेबल वापरून डिझायनर वस्तू बाजारात आणल्या.  आता मुखर्जी हे फॅशन डिझाईन कौन्सिल ऑफ इंडियाच्या असोसिएट डिझायनर सदस्य आहेत. भारतीय सिनेमाच्या राष्ट्रीय संग्रहालयाचे सर्वात तरुण मंडळ सदस्य आहेत. फेमिना ब्रिटीश कौन्सिलचा भारतातील मोस्ट आउटस्टँडिंग यंग डिझायनर पुरस्कार त्यांच्या नावावर आहे. बॉलिवूड आणि देशातील उच्चभ्रू सोसायटीमध्ये सब्यसाची हे आवडते नाव आहे. रिलायन्स जिओच्या संचालिका ईशा अंबानी पिरामल यांनीही त्यांच्या लग्नामध्ये सब्यसाची यांनी डीझाईन केलेले पोशाख परिधान केले होते.  

=============

हे देखील वाचा : अमेरिकेत का काढली जात आहे जेएनयु आंदोलनाची आठवण

=============

भारतीत तयार होणा-या कपड्याला आधुनिक रुप देण्यात सब्यसाची यांचा हातखंडा आहे.  बांधणी, गोटा वर्क, ब्लॉक प्रिंटिंग, हॅन्ड डाईंगचा शास्त्रीय पद्धतींचा वापर करीत सब्यसाची यांनी तयार केलेले भारतीय वधूंचे पोशाख हे नावाजले गेले आहेत.  त्यांनी सेव्ह द साडी हा प्रकल्प सुरु केला. त्याला भारतातील मान्यवरांनी दाद दिली.  अनुष्का शर्मा, विद्या बालन, दिपिका पदुकोण, प्रियंका चोप्रा यांनी त्यांच्या विवाहात सब्यसाची यांनी डीझाईन केलेले पोशाख परिधान केले होते. 

याशिवाय बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री त्यांच्या पोशाखांच्या चाहत्या आहेत. उधारीवर सुरु केलेला सब्यसाची हा ब्रॅण्ड आता आंतरराष्ट्रीय ख्यातीचा आहे.  कलकत्यात त्यांचे मुख्य कार्यालय असले तरी जगभरात त्याच्या शाखा आहेत.  आता मेट गालाच्या रेड कार्पेटवर सब्यसाची मुखर्जी यांनी हजेरी लावली आहे.  हा सब्यसाची यांच्यासाठी मोठा बहुमान आहे.  सोबतच भारतीय कलेलाही मिळालेली ही एक दाद आहे.  

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.