Home » पांचवीबार पुतिन की सरकार

पांचवीबार पुतिन की सरकार

by Team Gajawaja
0 comment
Vladimir Putin
Share

भारतात लोकसभेच्या निवडणुकीसाठी तिस-या टप्प्यातील मतदान होत असतांना तिकडे भारताचा मित्रराष्ट्र असलेल्या रशियामध्ये व्लादिमीर पुतिन यांनी पाचव्यांदा रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. मॉस्को येथील ग्रँड क्रेमलिन पॅलेसमध्ये पुतिन यांनी केवळ ३३ शब्दांत ही शपथ घेतली.

रशियाच्या झार घराण्यातील अलेक्झांडर दुसरा, अलेक्झांडर तिसरा आणि निकोलस दुसरा यांचा राज्याभिषेक झाला, त्याच ठिकाणी व्लादिमीर पुतिन यांचा हा शपथसमारंभ झाला. सध्या जगात रशियावर युद्धपिपासू देश म्हणून टिका होत आहे.  युक्रेनबाबत रशियाच्या भूमिकेवर जगभरातून नाराजी आहे.  ही नाराजी रशियामध्येही होती. मार्च महिन्यात झालेल्या निवडणुकीत पुतिन यांना ८८ टक्के मते मिळाली.  रशियातील तरुण वर्गाने पुतिन यांना भरभरुन मते दिल्याचे स्पष्ट झाले. (Vladimir Putin)

त्यांचे विरोधक निकोले खारिटोनोव्ह यांना केवळ ४ टक्के मते मिळाली. देशातून मिळालेल्या या भरघोष पाठिंब्यामुळे आता जगभर आपल्यावर कोणी टीका करत असेल याची पर्वा व्लादिमीर पुतिन यांना नाही. आपल्या शपथ समारंभानंतर मोजक्या शब्दात त्यांनी आपल्या पुढच्या कार्यकालात काय होणार हे स्पष्ट केले. आम्ही आणखी मजबूत होऊ. जे देश आम्हाला शत्रू मानतात त्यांच्याशी आम्ही आमचे संबंध मजबूत करू.” असे सांगून त्यांनी आपल्या शत्रूंनाही योग्य शब्दात समज दिली आहे.  

व्लादिमीर पुतिन यांनी पाचव्यांदा रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. ७१ वर्षीय पुतिन (Vladimir Putin) यांनी क्रेमलिनमध्ये एका भव्य समारंभात शपथ घेतली.  त्यांच्यावर देशातील विरोधी पक्ष दडपल्याचा आरोप जगभरातून होत आहे.  त्यामुळे अनेक देशांनी या शपथविधी समारंभावर बहिष्कार टाकला होता.  गेल्या दोन दशकांहून अधिक काळ रशियात व्लादिमीर पुतिन यांची सत्ता आहे. ऑगस्ट १९९९ मध्ये त्यांची पंतप्रधानपदी नियुक्ती झाली होती. डिसेंबर १९९९ मध्ये ते कार्यवाहक राष्ट्रपती झाले. पुतिन यांनी २००० मध्ये पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यानंतर ते २००४, २०१२ आणि २०१८ मध्ये राष्ट्रपती झाले आहेत. आता पाचव्यांदा त्यांनी रशियाचे अध्यक्षपद भूषवले आहे.

असे असले तरी त्यांच्यावर होणारे आरोप कमी नाहीत. पुतिन यांनी त्यांच्या बहुतांशी विरोधकांना संपवल्याचा आरोप होत आहे.  या निवडणुकीत आर्क्टिक तुरुंगात गूढ परिस्थितीत अलेक्सी नवलनी यांच्या मृत्यूचे सावट होते. पुतिन यांचे बहुतांश विरोधक एकतर तुरुंगात आहेत किंवा त्यांनी देश सोडला आहे आणि काहींचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. २०२२ मध्ये युक्रेनवर आक्रमण रशियाला पाश्चात्य निर्बंधांनाही सामोरे जावे लागले.

त्यामुळे  रशियन अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला आहे.  युक्रेनमधील विजय हे त्यांच्यासाठी मोठे आव्हान आहे कारण अमेरिका आणि पाश्चात्य देश उघडपणे युक्रेनच्या पाठीशी उभे आहेत.  यामुळेच पुतिन यांच्या शपथविधी सोहळ्यावर अमेरिका, ब्रिटन आणि अनेक युरोपीय देशांनी बहिष्कार टाकला आहे. मात्र, या कार्यक्रमाला भारताचे राजदूत विनय कुमार उपस्थित होते. 

पुतिन (Vladimir Putin) यांचा हा समारंभ त्यांच्या थाटासारखा शाही झाला. शपथविधीची तयारी पूर्ण झाल्यानंतर पुतिन ग्रँड क्रेमलिन पॅलेसमध्ये पोहोचले. याचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला.  त्याला क्षणार्धात लाखो लाईक मिळाले.  रशियाचा राष्ट्रीय ध्वज आणि रशियन मानक पुतिन यांच्या शपथविधीपूर्वी राष्ट्रपती ध्वज पॅलेसमध्ये आणण्यात आले होते. 

पुतिन यांच्या शपथविधी आणि राष्ट्रगीतानंतर लष्कराने त्यांना २१ तोफांची सलामी दिली.  या शपथविधी सोहळ्याला रशियाच्या फेडरल कौन्सिलचे सदस्य (सिनेटचे खासदार), स्टेट ड्यूमाचे सदस्य (कनिष्ठ सभागृहाचे खासदार), उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, राजदूत आणि विविध देशांचे राजनयिक कॉर्प्स उपस्थित होते.  समारंभानंतर, रशियन ऑर्थोडॉक्स चर्चच्या कुलगुरूंनी कॅथेड्रल चर्चमध्ये राष्ट्रपतींसोबत प्रार्थना केली. ही प्रथा १४९८ सालातील आहे.  तेव्हा मॉस्कोचे प्रिन्स दिमित्री इव्हानोविचचे लग्न झाले होते. 

=============

हे देखील वाचा :  रंगीला पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याच्या तयारीत

=============

पुतिन जेव्हा शपथ घेतात तेव्हा वापरण्यात येणारी संविधानाची प्रत अतिशय खास आहे. त्याचे आवरण लाल रंगाचे आहे. त्यावर सोनेरी रंगात रशियाचे संविधानलिहिलेले आहे. याशिवाय रशियन कोट ऑफ आर्म्सचे चित्र चांदीच्या रंगात बनवले आहे. राज्यघटनेची ही प्रत राष्ट्रपतींच्या ग्रंथालयात ठेवण्यात येते.  रशियन राज्यघटनेनुसार कोणतीही व्यक्ती सलग दोन वेळा राष्ट्राध्यक्ष होऊ शकत नाही. 

पुतिन (Vladimir Putin) यांची ही पाचवी टर्म अनेक अर्थानं वैशिष्टपूर्ण होणार आहे.  या टर्मच्या शेवटी, जोसेफ स्टॅलिनला मागे टाकून सर्वात जास्त काळ रशियावर राज्य करणारे नेता म्हणून त्यांचे नाव होईल.  पुतिन २०३६ पर्यंत राष्ट्राध्यक्ष राहणार आहेत, तशी त्यांनी राज्यघटनेत दुरुस्तीच करुन घेतली आहे.  आता या कार्यकाळात ते रशियाला जगात सर्वशक्तीशाली राष्ट्र बनवण्यासाठी काय करतात, हे पहाण्यासारखे आहे.  

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.