Home » चमचमत्या दुनियेचा मेट गाला म्हणजे नेमकं काय ?

चमचमत्या दुनियेचा मेट गाला म्हणजे नेमकं काय ?

by Team Gajawaja
0 comment
What Is Met Gala
Share

जगाच्या कुठल्याही कोप-यात काही बातमी झाली तरी ती बातमी पहिल्यांदा येते ती सोशल मिडियावर. त्यामुळे अगदी काही क्षणापूर्वीच घडलेल्या घटनेची माहिती जगभर होते. अशीच एक बातमी सध्या व्हायरल होत आहे, ती म्हणजे मेट गाला संदर्भातील.  मेट गाला म्हणजे जगभरातील मान्यवर फॅशन डिझायनर, मॉडेल, अभिनेत्री आणि मान्यवरांचा चमचमता मेळा. (What Is Met Gala)

या मेट गालामध्ये अंबानी कुटुंबाची लाडकी लेक ईशा अंबानी लाखों रुपयांची साडी घालून पोहचली. तिच्यापाठोपाठ कपूर घरण्याची सून, म्हणजेच, आलिया भट्ट कपूरही मेट गालामध्ये दिसली. या दोघींच्या साड्यांचे फोटो सोशल मिडिवर सर्वाधिक व्हायरल होत आहेत.  त्यासोबत मेट गालामध्ये सहभागी झालेल्या अन्य देशातील सौदर्यवतींचीही छायाचित्रे दिसत आहेत. यासोबतच हे मेट गाला म्हजे नेमकं काय, याचीही चर्चा रंगली आहे.  तर हा मेट गाला म्हणजे, एक प्रकारचा फॅशन शो आहे. 

What Is Met Gala

यात जगभरातील ड्रेस डिझाईनर आणि तारे तारका सहभागी होतात. हा जगातील सर्वात महागडा आणि मानाचा फॅशन शो आहे.  कारण त्यात कोणालाही सहभागी होता येत नाही. त्यासाठी मेट गालाच्या आयोजकांतर्फे खास आमंत्रण येते.  अमेरिकेच्या मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट्स कॉस्च्युम इन्स्टिट्यूटसाठी यातून निधी गोळी केली जाते आणि या मेट गालामध्ये प्रवेश करण्यासाठी जे तिकिट देण्यात येते, त्याची किंमत आहे ७५००० डॉलर्स आणि जर सहभागी होणा-यांना आपल्यासाठी संपूर्ण टेबल बूक करायचे असेल तर त्यासाठी त्यांना फक्त  तर संपूर्ण टेबलची किंमत $३५००००एवढी रक्कम आधी भरावी लागले. (What Is Met Gala)

त्यामुळेच या मेट गालाला जगातील सर्वात महागडा फॅशन शो म्हटले जाते.  कारण ही फक्त यात सहभागी होण्याची फी आहे.  मेट गालामध्ये जाण्यासाठी जे खास पोशाख तयार केले जातात, त्यांनी किंमत लाख आणि करोडोच्या घरात असते. मेट गाला हा फॅशन जगतातील अतिशय प्रसिद्ध शो आहे.  दरवर्षी मेट गाला कार्यक्रमाच्या रेड कार्पेटवर उपस्थित राहण्यासाठी  जगभरातील कुठल्या सेलेब्रिटीला आमंत्रण केले आहे, याची उत्सुकता असते. 

दरवर्षी हा शो मे महिन्याच्या पहिल्या सोमवारी MET MONDAY म्हणून आयोजित केला जातो.  हॉलिवूड आणि बॉलिवूड मधील कलाकारांची या मेट गाला मध्ये गर्दी असते. अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्टमध्ये ही फॅशन शो होतो.  दरवर्षी यासाठी एक थीम ठेवली जाते.  यात सहभागी झालेले सर्व स्टार त्या थिमनुसारच आपल्या कपड्यांचे डिझाईन करुन घेतात.   या वर्षी मेट गालाची थीम  ‘स्लीपिंग ब्यूटीज: रीअवेकनिंग आहे.  या थिमनुसारच त्यात सहभागी होण्यासाठी जे सेलेब्रिटी येतात त्यांचे कपडे डिझाईन केलेले असतात.  यातून अनेक नव्या फॅशन डिझाईनर्सनाही जागतिक फॅशन दुनियेची द्वारे खुली झाली आहेत. (What Is Met Gala) 

मेट गालाच्या रेड कार्पेट फॅशन शो ची सुरुवात १९४८ मध्ये झाली. सुरुवातीपासूनच मेट गालानं फक्त आमंत्रितांनाच प्रवेश असे धोरण ठेवले.  त्यामुळे मेट गालाचे आमंत्रण मिळणे, हा मोठा बहुमान समजला जाऊ लागला.  पार्ट ऑफ द इयर, मेट बॉल, द ऑस्कर ऑफ ईस्ट कोस्ट अनेक नावांनीही या मेट गालाची ओळख आहे.  (What Is Met Gala)

मेट गालाच्या आमंत्रितांची यादी गुप्त असते.  व्होग एडिटर इन चीफ अँन विंटूर यांच्याकडे हे सर्वाधिकार असतात. या फॅशन शो मधून मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट्स कॉस्च्युम इन्स्टिट्यूटसाठी निधी उभारला जातो. भारतार्फे आत्तापर्यंत या मेट गालामध्ये २०१७ मध्ये प्रियांका चोप्रा आणि दीपिका पादुकोण यांना या रेड कार्पेटवर येण्याची संधी मिळाली.  त्यानंतर आलिया भट्ट, सोनम कपूर, कंगना रणौत आणि ईशा अंबानी या  सेलिब्रिटींनी मेट गालामध्ये हजेरी लावली आहे. (What Is Met Gala)

=============

हे देखील वाचा : मतदाराच्या बोटाला लागणाऱ्या ‘शाई’बद्दल ‘या’ गोष्टी ठाऊक आहेत का?

=============

यावेळीही आलिया भट्ट मेट गालामध्ये सहभागी झाली आहे. तिने प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यसाची यांनी तयार केलेली साडीने घातली आहे. तर अंबानी घराण्याची लेक ईशा अंबानीही यावर्षी मेट गालाच्या उद्घाटन सोहळ्यातच सर्वांचा चर्चेचा विषय झाली. कारण ईशा अंबानीने लांब ट्रेल असलेली साडी परिधान केली आहे. तिची साडी राहुल मिश्राने डिझाइन केली आहे. ही साडी बनवण्यासाठी सुमारे १०००० तास लागले आहेत.  या साडीवर भारतीय पद्धतीची नक्षी विणण्यात आलेली आहे. मेट गालाच्या उदघाटन सोहळ्याला भारताच्या या दोन सौदर्यवतींचा लूक आणि त्यांच्या भारतीय परिधानाला सर्वाधिक पसंती मिळाली आहे.  

सई बने

 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.