Home » ट्विटरवर वेरिफाइड अकाउंटसाठी प्रति महिन्याला द्यावे लागणार १६०० रुपये अन्यथा…

ट्विटरवर वेरिफाइड अकाउंटसाठी प्रति महिन्याला द्यावे लागणार १६०० रुपये अन्यथा…

by Team Gajawaja
0 comment
Twitter Blue Tick
Share

जेव्हापासून एलन मस्कने माइक्रो ब्लॉगिंग साइट सांभाळण्यास सुरुवत केली आहे तेव्हापासून त्यांच्याकडून करण्यात येणाऱ्या बदलांवाकडे अधिक लक्ष दिले जात आहे. ज्याचा थेट परिणाम ट्विटरवर होताना दिसून येणार आहे. अशातच मस्क यांनी असे म्हटले आहे की, ट्विटर आपल्या युजर वेरिफिकेशनमध्ये बदल करणार आहे. त्यामुळे ज्या लोकांना आपले ट्विटर अकाउंट वेरिफाइड करायचे आहे किंवा ज्यांचे आधीपासूनच वेरिफाइड आहे त्यांना आता प्रति महिन्याला पैसे मोजावे लागणार आहेत. असे न केल्यास त्यांचे ट्विटटर हँडलवरुन वेरिफाइड साइन हटवले जाईल. (Twitter Blue Tick)

प्लॅटफॉर्मरच्या रिपोर्ट्सनुसार या संबंधित दोन लोकांचा हवाला देत असे सांगितले गेले की, ट्विटर आपल्या अकाउंट होल्डरची ओळख म्हणून देण्यात आलेल्या ब्लु टिक मार्कसाठी आता शुल्क वसूल करण्याचा विचार करत आहे. रिपोर्ट्सनुसार, जर हे मंजूर झाल्यास युजर्सला ट्विटर ब्लू टीक मार्कसाठी ४.९९ डॉलर प्रति महिने सब्सक्राइब करावे लागणार आहे किंवा तसे न केल्यास ब्लू टीक मार्क काढले जाणार आहे.

Twitter Blue Tick
Twitter Blue Tick

वर्जच्या रिपोर्टमध्ये काय?
द वर्जच्या आणखी एका रिपोर्ट्सनुसार असे म्हटले गेले आहे की, ट्विटर सध्या नव्या ट्विटर ब्लू सब्सक्रिप्शनसाठी १९.९९ डॉलर चार्ज करण्याचा विचार करत आहे. यामध्ये पुढे असे म्हटले आहे की, प्रोजेक्टवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना फिचर लॉन्च करण्यासाठी ७ नोव्हेंबर पर्यंतचा कालावधी दिला गेली होती. तर काम पूर्ण न झाल्यास त्यांना काढून टाकण्यात येणार असे ही सांगितले होते.

दरम्यान, टेस्ला इंकच्या सीईओकडून अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. प्रोजेक्ट आता सुद्धा संपवला जाऊ शकतो. मात्र प्लॅटफॉर्मरच्या मते, अशी शक्यता आहे की, वेरिफिकेशन ट्विटर ब्लूचा हिस्सा बनू शकते. ट्विटर ब्लू गेल्या वर्षात जून मध्ये सब्सक्रिप्शनच्या आधारावर प्रीमियम सुविधांपर्यंतच्या खास गोष्टी देते. ज्यामध्ये ट्विट एडिट करण्याची सुद्धा सुविधा मिळते.(Twitter Blue Tick)

पोलनंतर देण्यात आली होती एडिटची सुविधा
ट्विट एडिट करण्याची सुविधा याच महिन्याच्या सुरुवातीला मस्क यांच्या आग्रहानंतर एप्रिम मधअये एका ट्विटर पोलचा वापर केल्यानंतर उपलब्ध करुन देण्यात आली होती. ज्यामध्ये त्यांच्या लाखो फॉलोअर्सने विचारले होते की, त्यांना एडिट बटण हवे का? ७० टक्क्यांहून अधिक लोकांनी यासाठी सहमती दर्शवली होती.

हे देखील वाचा- इंस्टाग्रामवरील व्हिडिओ डाउनलोड करण्यासाठी ‘या’ ट्रिक्स वापरा

पराग अग्रवाल यांची हकालपट्टी
४४ बिलियन डॉलरचा करार करत ट्विटर खरेदी केल्यानंतर मस्क यांनी ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह काही अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली. यामध्ये विजय गड्डे आणि सीएफओ नेल सहगल यांचा सुद्धा समावेश आहे. टेस्लाचे सीईओंना ट्विटरला फ्री स्पेस बनवायचे आहे आणि मानवतेसह काम करायचे आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.