Home » भगवान शिवाला समर्पित असलेले हे भव्य मंदिर

भगवान शिवाला समर्पित असलेले हे भव्य मंदिर

by Team Gajawaja
0 comment
Raj Rajeshwar Swamy Temple
Share

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशमधील वेमुलवाडा येथील प्रसिद्ध आणि ऐतिहासिक अशा राज राजेश्वर स्वामी मंदिराला भेट दिली. या ऐतिहासिक मंदिराला दक्षिणेची काशी म्हटले जाते. श्री राज राजेश्वर मंदिर त्याच्या वास्तू वैभवासाठी तसेच आध्यात्मिक पावित्र्यासाठी ओळखले जाते. वेमुलवाडा शहर ही चालुक्यांची राजधानी होतीभगवान शिवाला समर्पित असलेले हे भव्य मंदिर चालुक्य राजांनी ७५० ते ९७३ या दरम्यान बांधले. राजा नरेंद्र याने या भव्य मंदिराची उभारणी केली.  राजा नरेंद्र हा अजुनाचा वंशज आहे. अर्जुनाचा नातू राजा परीक्षित यांचा तो  नातू होता.  या भव्य मंदिराची ख्याती एवढी झाली की, त्याला दक्षिणेची काशी असेही संबोधण्यात येऊ लागले.  (Raj Rajeshwar Swamy Temple)

आंध्र प्रदेश राज्यातील करीमनगर जिल्ह्यातील वेमुलवाडा गावात हे प्राचीन शिवमंदिर आहे. जगभरात भगवान शंकराची अनेक मंदिरे आहेत, त्यापैकी हे एक वैशिष्टयपूर्ण मंदिर आहे. कारण येथे भगवान शंकरासह भगवान विष्णुचाही वास असल्याचा उल्लेख अनेक पौराणिक ग्रंथात आहे. श्री राजेश्वरी स्वामी मंदिर अर्जुनाचा नातू असलेल्या परीक्षिताचा नातू राजा नरेंद्र यांनी बांधले होते. त्यासंदर्भात एक कथा सांगितली जाते. राजा नरेंद्रने चुकून एका ऋषीच्या पुत्राचा वध केला.

त्यामुळे त्या ऋषीने त्याला शाप दिला. राजा नरेंद्रला त्यामुळे कुष्ठरोग झाला. या शापापासून मुक्ती मिळवण्यासाठी राजा नरेंद्रने धर्मगुंडम येथील पुष्करणी तलावात स्नान केले. भगवान शंकराची आराधना केली. भगवान राज राजेश्वर आणि देवी राज राजेश्वरी यांनी राजा नरेंद्रला स्वप्नात दर्शन दिले. या दोघांनी राजा नरेंद्रला मंदिर बांधण्याची आज्ञा दिली. यानंतर त्याचे आजोबा परीक्षित यांनी पुष्करणी तलावाजवळ शिवलिंगाची स्थापना केली.  त्यासाठी मोठा धार्मिक सोहळा झाला. (Raj Rajeshwar Swamy Temple) 

यानंतर राजा नरेंद्र याने ७५० मध्ये या मंदिराच्या बांधणीस सुरुवात केली. ९७३ पर्यंत त्याच्याच वंशातील अन्य राजांनी मग हे मंदिर पूर्ण केले. यासोबत या मंदिराबाबत आणखी एक धार्मिक कथा सांगण्यात येते. पुराणानुसार एकदा साक्षात सूर्यदेवाला अपंगत्व आले होते.  तेव्हा सूर्यदेवाने या मंदिरात येऊन भगवान शंकराची आराधना केली आणि आपल्या आजारावर विजय मिळवला.  तेव्हापासून या मंदिराला भास्कर क्षेत्रम् असेही म्हटले जाऊ लागले.  राजा राजेश्वर मंदिरात भगवान शिवाची नीला लोहिता शिव लिंगमरूपात पूजा केली जाते.   मंदिराचे प्रमुख देवता हे राजा राजेश्वर स्वामी आहेत, ज्यांना स्थानिक भाविक राजन्ना म्हणून ओळखतात. राज राजेश्वराच्या मूर्तीच्या उजव्या बाजूला राज राजेश्वरी देवीची मूर्ती तर डाव्या बाजूला लक्ष्मीसह सिद्धी विनायकाची मूर्ती विराजमान आहे.(Raj Rajeshwar Swamy Temple)

दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या या मंदिराच्या परिसरात श्री अनंत पद्मनाभ स्वामी मंदिर आणि श्री सीताराम चंद्र स्वामी मंदिर आहे.  त्यामुळे या मंदिर परिसराला हरिहर क्षेत्रम म्हटले जाते. त्यामुळेच शैव आणि वैष्णवांसाठी हे मंदिर प्रिय आहे. या मंदिरात महाशिवरात्री आणि रामनवमीचा उत्सव साजरा केला जातो.  

=============

हे देखील वाचा :  अक्षय्य तृतीयेचा सोनेरी योग

=============

हे मंदिर धर्मगुंडम नावाच्या मोठ्या तलावाच्या काठावर उभारलेले आहे.  मंदिरात दर्शनाला जाण्याआधी भाविक या तलावात आवर्जून स्नान करतात. असे मानले जाते की, या तलावाच्या पाण्यात औषधी गुणधर्म आहेत. त्यामुळे या पाण्यात स्नान केल्यास सर्व आजार दूर होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या मंदिरात भाविक कोडे मोक्कू नावाचा अनोखा विधी करतात. स्थानिक लोकांचा असा विश्वास आहे की, जेव्हा भक्त बैलाची पूजा करुन मंदिराभोवती प्रदक्षिणा घालतात तेव्हा भगवान भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात.  पूजा केल्यावर भाविक ते बैल मंदिर अधिकाऱ्यांच्या स्वाधीन करतात.

मंदिर परिसरात अनंत पद्मनाभ स्वामी मंदिर, सीता राम मंदिर, अंजनेय मंदिर, काशी विश्वेश्वर मंदिर, दक्षिणा मूर्ती मंदिर, सुब्रमण्य मंदिर, बाला त्रिपुरा सुंदरी देवी मंदिर, सोमेश्वर मंदिर, उमा महेश्वर मंदिर, उमा महेश्वर मंदिर, कोटिलिंगलु आणि काल भैरव स्वामी मंदिर देखील आहे.  येथील शिवरात्रीचा आणि रामनवमीचा उत्सव हा जगप्रसिद्ध असून यावेळी हजारो भाविक उपस्थित असतात.  

सई बने

 


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.