Home » दुबईचा पाऊस की रईसीची हौस…

दुबईचा पाऊस की रईसीची हौस…

by Team Gajawaja
0 comment
Dubai
Share

दुबई, यूएई, सौदीसह अनेक देशांमध्ये आलेला पूर हा नैसर्गिक होता की, कृत्रिम होता याची चर्चा सुरु झाली आहे.  नैसर्गिक पाऊस म्हणजे, आकाशात बाष्पीभवनानं जे ढग येतात त्यातून पडणारा आणि कृत्रिम पाऊस म्हणजे, केमिकलचा मारा करुन नकली ढग निर्माण करायचे, त्यालाच क्लाउड सीडिंग म्हणतात,  याच ढगातून पाऊस पाडण्यात येतो. दुबईमध्ये पूरासारखा पैसा वाहतो असे म्हणतात. (Dubai)

याच पैशाच्या पुरामुळे पाऊस पाडण्याचा प्रयत्न झाला. पण त्यातून आलेल्या पावसाच्या आक्रमक रुपानं या श्रीमंत शहरातील अनेक गोष्टी जगापुढे आल्या आहेत. त्यातील प्रमुख म्हणजे, येथे पैसा आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर निसर्गालाही बंदिस्त करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.(Dubai) 

यापूर्वीही दुबईमध्ये कृत्रिम पावसाचे प्रयोग झाले आहेत. मात्र यावेळी झालेल्या याच प्रयोगाचा अतिरेक झाला आणि दुबईसह त्याच्या शेजारी देशांनाही आक्रमक पावसाचा फटका सहन करावा लागला आहे.  दुबईमध्ये झालेल्या या क्लाउड सीडिंगचे हे वरवरचे परिणाम आहेत. कारण आत्ताही या क्लाउड सीडिंगमुळे पाकिस्तानवर अतिमुसळधार पावसाचे संकट आहे. शिवाय पुढच्या काही दिवसातही दुबईसह शेजारी देशांमध्ये असाच मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता निर्माण झाली आहे.  (Dubai)

जगातील सर्वात अलिशान विमानतळ म्हणून दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची ओळख आहे.  याच विमानतळाचे तलावात रुपांतर झाल्याचे फोटो, व्हिडिओ व्हायरल झाले आणि सर्वत्र एकच चर्चा सुरु झाली, दुबईत एवढा पाऊस झालाच कसा. येथे २४ तासांत ६.२६  इंचांपेक्षा जास्त पाऊस झाला. 

‘द वेदरमॅन डॉट कॉम’च्या म्हणण्यानुसार, एवढा पाऊस दुबईत दोन वर्षात पडतो.  त्यावरुन या पावसाच्या प्रमाणाचा अंदाज येतो.  हा पाऊस फक्त दुबई पुरता मर्यादित राहिला नाही तर त्यानं संयुक्त अरब अमिराती (यूएई), सौदी अरेबिया, बहारीन आणि ओमानमध्येही आपले आक्राळविक्राळ रुप दाखवले.  या पावसानं रस्ते, घरे आणि मॉलमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण केली.(Dubai)

 ‘द वेदरमॅन डॉट कॉमया हवामानाची माहिती देणाऱ्या वेबसाइटवर या पावसाची बातमी देण्यात आली.  मात्र असा पाऊस पडेल अशी साधी आगाऊ सूचनाही येथे नव्हती.  वास्तविक दुबई आणि सौदी अरेबियामध्ये हवामानाच्या बाबतीत सूचना देण्यात येणारे आधुनिक तंत्रज्ञान आहे.  त्यामुळेच अचानक आलेला हा पाऊस अनेक प्रश्नांनाही सोबत घेऊन आला आहे.  

हवामानतज्ञांनी  आखाती देशांमध्ये आलेल्या या मुसळधार पावसाचे आणि त्यामुळे आलेल्या पुराचे कारण क्लाउड सीडिंग म्हणजेच कृत्रिम पाऊस असल्याचे स्पष्ट केले आहे.  यासंदर्भात काही वर्तमानपत्रानी दुबई प्रशासनाने क्लाउड सीडिंगद्वारे पाऊस पाडण्यासाठी सोमवारी आणि मंगळवारी विमानांची उड्डाने केल्याची माहिती दिली आहे.  या विमानांनी एकदा नाही तर तब्बल सातवेळ उड्डान केल्याचेही सांगण्यात आले आहे.  त्यामुळेच हा मुसळधार पाऊस आल्याचा दावाही करण्यात आला आहे. (Dubai)

ज्या देशांमध्ये अती उष्णता असते तिथे पावसाची जास्त गरज असते. तेव्हाच असा कृत्रिमरित्या पाऊस म्हटले जाते.  म्हणजेच क्लाउड सीडिंग. ढगांचे पावसात कृत्रिम रुपांतर करण्याच्या तंत्राला क्लाउड सीडिंगम्हणण्यात येते.  यासाठी सिल्व्हर आयोडाइड, पोटॅशियम आयोडाइड आणि ड्राय आइस सारखी रसायने हेलिकॉप्टर किंवा विमानांद्वारे ढगांजवळ आकाशात विखुरली जातात.  काही तासांच्या या प्रक्रियेनंतर आकाशात वादळी ढग तयार होतात आणि पाऊस पडतो.

दुबाईमध्ये याआधीही जुलै २०२१ मध्ये कृत्रिम पाऊस झाला होता. २०२१ मध्ये दुबईचे तापमान ५० अंशांवर पोहोचले होते.  या भडकलेल्या उष्म्यापासून सुटका व्हावी म्हणून क्लाउड सीडिंग करण्यात आले. आखाती देशांमध्ये दुष्काळाचा सामना करण्यासाठी हे तंत्र अनेकदा वापरले जाते. याची सुरुवात १९९० मध्ये युएईपासून झाली

 

अर्थातच निसर्गाच्या विरुद्ध असलेल्या या तंत्रज्ञानाचा पहिल्यांदा वापर चीननं केला आहे.  आता हे तंत्रज्ञान पाऊस नसलेल्या देशांमध्ये वापरण्यात येते.  काही ठिकाणी शेतीसाठीही पाण्याची गरज असल्यानं क्लाउड सीडिंगचा आधार घेण्यात येतो.  अमेरिकेसह जगातील ६० देशांकडे कृत्रिम पाऊस पाडण्याचे तंत्रज्ञान आहे. हे तंत्रज्ञान भारतातही उपलब्ध आहे. गेल्या वर्षा दिल्लीमध्ये प्रदुषणाची पातळी खालावली होती.  तेव्हा या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा विचार करण्यात आला होता.  (Dubai)

मात्र दुबईमध्ये जो पाऊस झाला, तो ढगफुटीसारखा होता.  त्याला कारण म्हणजे, क्लाउड सीडिंगमुळे किती ढग जमा झाले यावर ढग फुटणे अवलंबून असते. जास्त बाष्पाने भरलेल्या ढगांमध्ये क्लाउड सीडिंग केल्यास ढग फुटू शकतात. असेच काहीसे या देशात झाल्याचा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.  या मुसळधार पाऊसामुळे या देशातील सर्वच शहरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती.  विमानतळ पाण्याने वेढले गेले. पुराचे पाणी मेट्रो स्टेशन, मॉल, रस्ते, व्यापारी संस्थांमध्ये घुसले.(Dubai)

============

हे देखील वाचा : मक्का-मदिनाच्या वाळवंटाचे बदलते रुप

============

 कारण जगातील सर्वात आधुनिक शहरांमध्ये गणल्या गेलेल्या या देशांमध्ये पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याची सोयच नाही आहे.  हा पाऊस झाल्यावर आता तो कसा आला याच्यावर चर्चा सुरु झाली आहे.  मात्र या पावसाचे संकट अद्यापही दुबई आणि आसपासच्या देशांवर आहे.  कारण पाकिस्तानमध्ये १९ तारखेपर्यंत असाच पाऊस पडेल हा अंदाज देण्यात आला आहे.  अचानक आलेल्या या पावसाचे कोडे कधी सुटेल हे सांगता येणार नाही, पण त्यामुळे आधुनिक आणि श्रीमंत शह असलेल्या दुबईला मात्र पाण्यात बुडतांना पहाता आले आहे.  

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.