Home » आलिशान बंगला आणि महागड्या गाड्या….सलमान खानचा भावोजी कोट्यावधींचा मालक

आलिशान बंगला आणि महागड्या गाड्या….सलमान खानचा भावोजी कोट्यावधींचा मालक

आयुष शर्माने वर्ष 2018 मधील सिनेमा 'लवयात्री' मधून बॉलिवूडमधून डेब्यू केला होता. यानंतर 'अंतिम' आणि 'किसी का भाई किसी की जान' मध्येही आयुष शर्मा झळकला होता.

by Team Gajawaja
0 comment
Bollywood
Share

Bollywood : आयुष शर्मा सध्या आपल्या अपकमिंग सिनेमा ‘रुस्लान’मुळे चर्चेत आहे. या सिनेमाचा पहिला ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. अशातच चाहत्यांकडून सिनेमा प्रदर्शित होण्याची वाट पाहिली जात आहे. ‘रुस्लान’ 26 एप्रिल रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

आयुष शर्माने वर्ष 2018 मध्ये ‘लवयात्री’ सिनेमातून डेब्यू केला होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता. यानंतर आयुष शर्मा सलमान खानसोबत अंतिम सिनेमात दिसून आला होता. पण सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपटला गेला होता. गेल्या वर्षात प्रदर्शित झालेला सिनेमा ‘किसी का भाई किसी की जान’चा हिस्सा राहिला होता. तो देखील सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपटला गेला होता.

आयुष शर्माचे नेटवर्थ
फ्लॉप अॅक्टिंगच्या करियरनंतर आयुष शर्मा आलिशान आयुष्य जगतोय. टॉप प्लॅनेट बेवसाइटनुसार, वर्ष 2020 मध्ये अभिनेत्याचे नेटवर्थ 67 कोटी रुपये होते. आयुष शर्माची पत्नी अर्पिता खानने वर्ष 2022 मध्ये मुंबईत एक आलिशान बंगलाही खरेदी केला होता. त्याची किंमत 10 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. 1750 स्क्वेअर फूटवर विस्तारलेले आयुष आणि अर्पिताचे अपार्टमेंट राजमहालासारखे आहे. (Bollywood)

मुंबईत आलिशान अपार्टमेंट
आयुष शर्माने मॅशेबलला आपल्या मुंबईतील ब्रॅण्ड न्यू अपार्टमेंटचा व्हिडीओ टूर करून दाखवला होता. या व्हिडीओमध्ये आयुषने घरातील सुंदर इंटीरियर डिझाइनचे क्रेडिट आपल्या बायकोला दिले होते. याशिवाय अभिनेत्याने सलमान खानने गिफ्ट केलेल आर्टवर्कचे महत्त्वही सांगितले होते.

अभिनेत्याकडे आहेत आलिशान गाड्या
आलिशान बंगल्याव्यतिरिक्त आयुष शर्माकडे महागड्या गाड्यांचेही कलेक्शन आहे. आयुषला आलिशान गाड्या फार आवडतात. अशातच आयुषकडे रोल्स रॉयल फँटम, रेंज रोव्हर आणि लॅण्ड रोव्हरसारख्या आलिशान कार आहेत.


आणखी वाचा :
एका वर्षात मोडले होते लग्न, बॅक टू बॅक फ्लॉप सिनेमे दिल्यानंतर अचानक इंडस्ट्रीमधून गायब झाला हा अभिनेता
उदरनिर्वाहासाठी केली होती टुथपेस्टच्या रिकाम्या डब्याची विक्री… आज आहे टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री
वर्ष 1977 मधील ‘या’ ब्लॉकबस्टर सिनेमाने बॉक्स ऑफिसच नव्हे तर परदेशातही केली होती जबरदस्त कमाई

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.