Home » पक्ष की उमेदवार…? स्टार प्रचारकाचा खर्च कोण उचलतात? जाणून घ्या सविस्तर…

पक्ष की उमेदवार…? स्टार प्रचारकाचा खर्च कोण उचलतात? जाणून घ्या सविस्तर…

सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. अशातच निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिलेले उमेदवार ठिकठिकाणी जाऊन मतदारांमध्ये आपली छाप पाडण्याचा प्रयत्न प्रचारसभा किंवा रॅलीतून करताना दिसतायत.

by Team Gajawaja
0 comment
Lok Sabha Election 2024
Share

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूक देशभरात प्रत्येत पाच वर्षांनी होते. यंदाची लोकसभा निवडणुकही अत्यंत खास आणि महत्त्वाची आहे. यावेळी कोणाचे सरकार येणार, कोणाची मत कोणाकडे वळली जाणार अशा सर्व गोष्टी पाहण्यास सर्वजण उत्सुक आहेतच. पण निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले उमेदवार मतदारांमध्ये जाऊन मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. पण यावेळी स्टार प्रचारकांवर सर्वाधिक मोठी जबाबदारी दिली जाते. स्टार प्रचारकांना पक्षाने निवडणुकीसाठी तिकीट दिलेल्या उमेदवारासाठी प्रचार करायचा असतो. यासाठी प्रचार रॅली, सभेचेही आयोजन केले जातेय. पण सभा आणि रॅलींसाठी लागणारा पैसा नक्की येतो कोठून हे तुम्हाला माहितेय का? याबद्दलच जाणून घेऊया सविस्तर…..

स्टार प्रचारक कोणाला बनवले जाते?
स्टार प्रचारकाची विशिष्ट अशी व्याख्या नाही. राजकीय पक्ष आपल्या नेत्यांना स्टार प्रचारक म्हणून नेमतात. जसे की, ज्या नेत्याची सर्वाधिक लोकप्रियता त्याच्याकडे स्टार प्रचारकाची जबाबदारी सोपवली जाते. यामुळे गरजेचे नसते की, स्टार प्रचारक लोकसभेच्या एखाद्या मतदारसंघातीलच असावा. स्टार प्रचारकाचे मुख्य काम असते आपल्या उमेदवारासाठी प्रचार करणे. पक्ष सर्वसामान्यपणे स्टार प्रचारकांचे एक वेळापत्रक तयार करते. याशिवाय उमेदवारांच्या मागणीनुसार स्टार प्रचारकांना त्यांच्यासोबत प्रचारासाठी पाठवावे लागते.

उमेदवारांच्या खत्यामधून केला जातो अर्धा खर्च
निवडणूक आयोगाने स्टार प्रचारक झाल्यास त्यांच्यासाठी काही नियम तयार केले आहेत. यानुसार प्रचारासाठी स्टार प्रचारकासाठी येणारा एकूण खर्चाच्या 50 टक्के हिस्सा त्या उमेदवाराच्या निवडणुकीवेळी केल्या जाणाऱ्या खर्चात जोडला जातो. म्हणजेच, एखाद्या क्षेत्रात स्टार प्रचारकाच्या प्रचारावेळी वापरली जाणारी वाहने, एअरक्राफ्ट किंला हेलिकॉप्टर, फुलांच्या माळा किंवा हार, झेंडे अश सर्व गोष्टींचा अर्ध खर्च उमेदवाराच्या खात्यातून केला जातो. उर्वरित अर्धा खर्च पक्षाकडून केला जातो. (Lok Sabha Election 2024)

आपल्याच मतदारसंघात स्टार प्रचारकांच्या खात्यातून केला जातो खर्च
एखादा स्टार प्रचारक आपल्याच मतदारसंघात प्रचार करत असल्यास आणि तेथीलच उमेदवार असल्यास याचा संपूर्ण खर्च स्टार प्रचारकाच्या खात्यातून केला जातो. म्हणेजच स्टार प्रचारकाला एका उमेदवाराप्रमाणेच मानले जाते. पण आपल्याच मतदारसंघात स्टार प्रचारकाला मिळणाऱ्या कोणत्याही सुविधेचा फायदा घेता येत नाही.


आणखी वाचा :
बाळासाहेब व शरद पवारांनी सुरू केलेलं एक ‘फ्लॉप’ मासिक
डीडी न्यूजचा नवा भगवा लोगो पाहून विरोधक म्हणाले, “हे तर प्रचार भारती…”
विरोधक नारायण राणेंना ‘कोंबडी चोर’ म्हणत का टीका करतात?

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.