Home » EVM मशीनचे बटण दोन वेळेस दाबले तर काय होईल?

EVM मशीनचे बटण दोन वेळेस दाबले तर काय होईल?

भारतात प्रत्येक वर्षाला काही निवडणूका होतात. पुढील वर्षात म्हणजेच 2024 मध्ये लोकसभा निवडणूक होणार आहे. यापूर्वी देशातील पाच राज्यांच्या निवडणूकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

by Team Gajawaja
0 comment
Share

भारतात प्रत्येक वर्षाला काही निवडणूका होतात. पुढील वर्षात म्हणजेच 2024 मध्ये लोकसभा निवडणूक होणार आहे. यापूर्वी देशातील पाच राज्यांच्या निवडणूकांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वी राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढसह पाच राज्यांच्या निवडणूकांची तारीख जाहिर केली आहे. यानंतर निवडणूकीसंदर्भातील तयारी जोरदार सुरु झाली आहे. मतदानासाठी ईवीएम मशीन सुद्धा तयार केल्या जात आहे. ज्या काही पोलिंग बूथवर पोहचवण्याचे काम केले जाईल. अशातच जर ईव्हीएम मशीनचे बटण दोनदा दाबल्यास तर काय होईल याच बद्दल जाणून घेऊयात. (evm machine)

निवडणूक आयोगाच्या मते, नोव्हेंबर महिन्यात पाच राज्यांत विविध तारखांना निवडणूकांसाठी मतदान होणार आहे. त्याचे निकाल 3 डिसेंबरला जाहीर केले जातील. या निवडणूकीत हजारो ईव्हीएम मशीनचा वापर केला जाईल. जे आधीपासूनच तयार केले जातात. निवडणूकीच्या तारखेच्या आधी या वोटिंश मशीन्स पोलिंग बूथवर आणल्या जाता. याचे सेटअप पीठासीन अधिकारी करतात.

What is an EVM: Advantages & Use an Electronic Voting Machine

दोनदा बटण दाबल्यास काय होईल?
आता प्रश्न असा उपस्थितीत राहतो की, जर ईव्हीएम मशीनचे बटणाच्या माध्यमातून मतदान केले जाते. मात्र जर एखाद्याने एकाचवेळी काही बटणे दाबल्यास काय होईल? काही लोक असा विचार करतात की, विविध निशाणी असलेली बटणे दाबल्यास दोन पक्षांना मत दिले जाईल. मात्र असे नसते. एकदा मत दिल्यानंतर कोणतेही बटण दाबल्यास काहीही फायदा होत नाही.

मतदान केल्यानंतर लॉक होते मशीन
निवडणूक आयोगाकडून दिल्या गेलेल्या माहितीनुसार जेव्हा मतदार मतदान करण्यासाठी बटण दाबतो तेव्हाच लगेच त्याचे मतदान पूर्ण होते. त्यानंतर मशीन लॉक होते. जर एखादा व्यक्ती ईव्हीएम मशीनचे बटण मतदान केल्यानंतर दाबत असेल तर पुन्हा मतदान होत नाही. ईव्हीएम मशीन ही एका व्यक्तीच्या एका मतदानाच्या प्रक्रियेच्या आधारावर तयार करण्यात आलेली असते. जेव्हा पीठासन अधिकारी पुन्हा बटण दाबतो तेव्हा दुसरे मतदान होते. म्हणजेच एक व्यक्ती एकापेक्षा अधिक वेळा मतदान करू शकत नाही. (evm machine)


हेही वाचा- भारतातील मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांना किती असतो पगार?


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.