Home » चीनमध्ये रहस्यमयी न्युमोनियामुळे रुग्णालये फुल्ल

चीनमध्ये रहस्यमयी न्युमोनियामुळे रुग्णालये फुल्ल

चीनमध्ये रहस्यमयी न्युमोनिया आजार वेगाने फैलावत आहे. खासकरून याचा फटका लहान मुलांना बसत आहे. येथील रुग्णालये याच कारणास्तव फुल्ल झाली आहेत.

by Team Gajawaja
0 comment
china
Share

चीनमध्ये रहस्यमयी न्युमोनिया आजार वेगाने फैलावत आहे. खासकरून याचा फटका लहान मुलांना बसत आहे. येथील रुग्णालये याच कारणास्तव फुल्ल झाली आहेत. डब्लूएचओने जारी केलेल्या विधानानुसार याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे. लोकांना सतर्कता बाळगण्यास सांगण्यात आले आहे. त्याचसोबत डब्लूचओने चीनच्या हेल्थ अधिकाऱ्यांना याबद्दल अधिक माहिती देण्यास सांगितले आहे. (China)

उत्तर चीनमध्ये या आजाराचा प्रकोप अधिक आहे. बीजिंग आणि लियओनिंगच्या रुग्णालयात या रहस्यमयी आजारामुळे प्रभावित झालेल्या मुलांचा आकडा वाढत चालला आहे. या रहस्यमयी न्युमोनियामुळे मुलांच्या फुफ्फुसात दुखणे आणि ताप येणे अशा समस्या दिसून येत आहेत.

हा आजार वेगाने फैलावत असल्याने येथील शाळा बंद करण्यात आल्या आहेत. ओपन एक्सेस सर्विलांस प्लॅटफॉर्म प्रोमेडने चीनमध्ये फैलावत असलेल्या या न्युमोनियावर असे म्हटले आहे की, खासकरून मुलांना याचा फटका बसत आहे. याचे भयंकर फटका हा महारोगात बदलू शकतो.

न्युमोनियाच्या वाढत्या धोक्यामुळे डब्लूएचओने असे म्हटले आहे की, श्वसनासंबंधित या आजाराची जोखिम कमी करण्यासाठी लोकांनी काही गाइडलाइन्स फॉलो केल्या पाहिजेत. त्याचसोबत मुलांमध्ये न्युमोनियाच्या क्लस्टरवर विस्तृत माहितीसाठी चीनने अधिकाधिक मााहिती द्यावी असे सांगण्यात आले आहे. डब्लूएचओचे असे म्हणणे आहे ऑक्टोंबरमधये मध्य ते उत्तर चीनमध्ये गेल्या तीन वर्षांच्या काळाच्या तुलनेत इंन्फ्लूएंजा सारख्या आजारात वाढ झाली आहे. (China)

दुसऱ्या बाजूला हेल्थ एक्सपर्ट्स सुद्धा नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्यास सांगत आहेत. यामध्ये स्वच्छता बाळगणे, रेस्पिरेटरी संबंधित समस्यांची लक्षणे दिसून आल्यास डॉक्टरांना संपर्क करावा अशा काही गोष्टी फॉलो करण्यास सांगितले जात आहे. चीनमध्ये पुन्हा एकदा रहस्यमयी आजाराच्या वाढत्या प्रसारामुळे जागतिक स्तरावर लोकांमध्ये चिंता वाढत चालली आहे. कारण यापूर्वी सुद्धा कोविड-१९ च्या महारोगाचा प्रकोप जगाने पाहिला आहे.


हेही वाचा- नॉर्थ कोरियाकडून स्पाय सॅटेलाइट लॉन्च


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.