Home » ‘स्टुडेंट ऑफ द ईयर’ साठी आलियाच्या कास्टला सिद्धार्थ, वरुण धवनने दिला होता नकार

‘स्टुडेंट ऑफ द ईयर’ साठी आलियाच्या कास्टला सिद्धार्थ, वरुण धवनने दिला होता नकार

बॉलिवूड मधील अभिनेत्री आलिया भट्टने वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रासोबत करण जौहरचा सिनेमा 'स्टुडेंट ऑफ द ईयर' मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता.

by Team Gajawaja
0 comment
Koffe with karan
Share

बॉलिवूड मधील अभिनेत्री आलिया भट्टने वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रासोबत करण जौहरचा सिनेमा ‘स्टुडेंट ऑफ द ईयर’ मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. मात्र तुम्हाला माहितेय का, वरुण आणि सिद्धार्थच्या सिनेमानत आलियालाच्या कास्टिंगवरुन या दोघांनी नकार दिला होता. याचा खुलासा आता करणने आपला शो ‘कॉफी विद करण-8’ मध्ये केला आहे. लेटेस्ट एपिसोडमध्ये वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा गेस्ट म्हणून आले होते. याच दरम्यान हा खुलासा करण्यात आला आहे. (Koffe With Karan)

करण जौहरने असे म्हटले की, वरुण आणि सिद्धार्थ त्याला स्टुडेंट ऑफ द ईयरमध्ये आलिया ऐवजी एखाद्या दुसऱ्याला कास्ट करण्यासाठी अन्य अभिनेत्रींचे फोटो पाठवायचे. या दोघांना माहिती नव्हते असा बॉम्ब करण त्याच्या या शोमध्ये आता फोडणार होता. करणने असे म्हटले की, आता भले आलिया आणि वरुण, सिद्धार्थ मध्ये उत्तम बॉन्ड आहे. पण सुरुवातीला दोन्ही अभिनेत्यांना तिच्या सोबत काम करायचे नव्हते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Disney+ Hotstar (@disneyplushotstar)

करण जौहरने जेव्हा हे सांगितले तेव्हा वरुण आणि सिद्धार्थ थोडे बाचकले. त्याने असे ही म्हटले मला अजूनही आठवते जेव्हा आलिया पहिल्यांदा आली होती तेव्हा तुम्ही दोघांनी कसे मला मेसेज करून तिला कास्ट नये असे म्हटले होते. तुमच्यापैकी एकाने म्हटले होते ती फार लहान आहे. याची सुरुवात अशी झाली होती. मात्र जेव्हा त्या घटनेच्या तीन महिन्यानंतर आलियासोबत फोटोशूट केले तेव्हा ती शांत होती.(Koffe With Karan)

करण जौहरने पुढे असे म्हटले की, तिने तुमच्या दोघांकडे सुद्धा पाहिले नाही. खरंतर ही लाजत होती आणि कॉन्शस सुद्धा होती. कारण तुम्ही मला आधीपासूनच ओळखत होता. ती मला अजिबात ओळखत नव्हती.


हेही वाचा- प्रोडक्शन हाउस तर कधी एक्टिंग स्कूल, ‘या’ कलाकारांनी केलाय आर्थिक तंगीचा सामना


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.