Home » EVM मशीन ठेवल्या जाणाऱ्या खोलीला स्ट्रॉन्ग रुम का म्हणतात?

EVM मशीन ठेवल्या जाणाऱ्या खोलीला स्ट्रॉन्ग रुम का म्हणतात?

सध्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरूवात झाली आहे. अशातच ईव्हीम मशीनच्या माध्यमातून मतदार मतदान करतात. पण ईव्हीएम मशीन ठेवल्या जाणाऱ्या खोलीला स्ट्रॉन्ग रुम का म्हणतात हे माहितेय का?

by Team Gajawaja
0 comment
Lok Sabha Election 2024
Share

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिलपासून सुरू झाले आहे. या दिवशी देशभरातील 102 मतदारसंघांसाठी मतदान झाले. मतदानाची वेळ पूर्ण झाल्यानंतर ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट अगदी सुरक्षितरित्या ठेवण्याचे काम केले गेले. पण तुम्हाला माहितेय का, ईव्हीएम मशीन ठेवल्या जाणाऱ्या खोलीला स्ट्रॉन्ग रुम का म्हटले जाते? ही खोली कशी तयार केली जाते? याबद्दलच जाणून घेऊया सविस्तर…..

स्ट्रॉन्ग रुम म्हणजे काय?
मतदान पूर्ण झाल्यानंतर जेथे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन ठेवले जातात त्या खोलीला स्ट्रॉन्ग रुम म्हटले जाते. खरंतर मतदारांनी केलेल्या मतदानाची हेराफेरी होऊ नये म्हणून अगदी सुरक्षितपणे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन ठेवल्या जाता. याशिवाय या खोलीमध्ये सुरक्षा कर्मचाऱ्यांशिवाय कोणालाही जाण्याची परवानगी नसते. खरंतर, मतांची मोजणीकरण्यावेळीच पुन्हा स्ट्रॉन्ग रुममध्ये जाण्याची परवानगी अधिकाऱ्यांना दिली जाते.

एखाद्या इमारतीत का तयार करत नाहीत स्ट्रॉन्ग रुम?
स्ट्रॉन्ग रुम कधीच एखाद्या इमारतीच्या खोलीत तयार केली जात नाही. ती नेहमीच शासकीय इमारतीत तयार केली जाते. ज्या ठिकाणी स्ट्रॉन्ग रुम तयार करायची आहे तेथील जागा आधीच ठरवली जाते. त्यानंतर त्या खोलीच्या सुरक्षिततेची व्यवस्था केली जाते. याशिवाय स्ट्रॉन्ग रुम एखाद्या पोलीस स्थानकातही तयार केले जाऊ शकत नाही. स्ट्रॉन्ग रुम तयार करण्यासाठी काही नियम आणि अटींचे पालन करावे लगाते. यासंदर्भातील सविस्तर माहिती निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर मिळू शकते. (Lok Sabha Election 2024)

स्ट्रॉन्ग रुमची सुरक्षितता कशी केली जाते?
स्ट्रॉन्ग रुमची सुरक्षा सेंट्रल पॅरा मिलिट्री फोर्सकडून केली जाते. खरंतर सेंट्रल पॅरा मिलिट्री फोर्स स्ट्रॉन्ग रुमच्या आतमधील सुरक्षितता करतात. खोलीच्या बाहेरच्या सुरक्षिततेची जबाबदारी राज्य सुरक्षा बलाला असते. तिसरी सुरक्षितता स्थानिक पोलिसांकडून केली जाते. पोलिसांना स्ट्रॉन्ग रुमच्या आजूबाजूच्या परिसरातील इमारतींमध्ये तैनात केले जाते.


आणखी वाचा :
डीडी न्यूजचा नवा भगवा लोगो पाहून विरोधक म्हणाले, “हे तर प्रचार भारती…”
विरोधक नारायण राणेंना ‘कोंबडी चोर’ म्हणत का टीका करतात?
इंदिरा गांधींच्या सरकारने श्रीलंकेला सोपवलेल्या कच्चातिवु बेटाची कथा

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.