Home » जगातील सर्वाधिक हॉरर सिनेमे

जगातील सर्वाधिक हॉरर सिनेमे

सिनेमे बहुतांशजण आवर्जुन पाहतात. ते कधी आपल्याला हसवतात, तर कधी रडवतात. मात्र अलीकडल्या काळात असे काही हॉरर सिनेमे आले आहेत जे एकट्याने पाहणे मुश्किलच आहे.

by Team Gajawaja
0 comment
Horror movies in world
Share

सिनेमे बहुतांशजण आवर्जुन पाहतात. ते कधी आपल्याला हसवतात, तर कधी रडवतात. मात्र अलीकडल्या काळात असे काही हॉरर सिनेमे आले आहेत जे एकट्याने पाहणे मुश्किलच आहे. काही लोक असे सिनेमे फार एन्जॉय करतात. परंतु तुम्ही हॉरर सिनेमे पाहून घाबरत असाल तर एकदा ते पाहण्याची डेरिंग जरूर करून पहा. असे जगातील कोणते हॉरर सिनेमे आहेत हे आपण पाहूयात. (Horror movies in world)

एक एक्सॉसिस्ट (१९७३)
द एक्सॉसिस्ट ज्यांनी पाहिला त्यांना तो एक वेगळ्याच प्रकारचा हॉरर सिनेमा वाटला. सिनेमाची कथा एक मुलीच्या अवतीभवती फिरते. तिला भूताने पछाडलेले असते. सिनेमात एलेन बर्स्टिन, मॅक्स वॉन सिडो, लिंडा ब्लेअर आणि लीजे कोब्बो मुख्य भुमिकेत आहेत.

द शाइनिंग (१९८०)
हा सिनेमा १९८० मध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमाबद्दल अजूनही लोकांच्या मनात भीती आहे. सिनेमाची कथा एका परिवाराची आहे. जे भयावय अशा एका हॉटेलमध्ये रात्र घालवतात. त्यानंतर तेथे विचित्र गोष्टी घडतात. स्टेनिक कुब्रिक यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात जॅक निकोलसन, शेली डुवैल, डॅनी लॉयड आणि स्कॅटमॅन क्रॉथर दिसून येणार आहे.

द रिंग मूवी (२००२)
या सिनेमात नाओमी वाट्स, मार्टिन हेंडरसन, डेविड डॉर्फमॅन आणि ब्राइन कॉक्स आहेत. हा सिनेमा गोर वर्बिंस्की यांच्या दिग्दर्शनाखाली तयार करण्यात आला आहे. यामध्ये एक न्यूज रिपोर्टर आहे ती एक शोध घेत असते. शोधात तिला एक व्हिडिओ टेप मिळते. पुढे काय होते हे पाहण्यासाठी तुम्हाला सिनेमाच पहावा लागेल.

पॅरानॉर्मल अॅक्टिव्हिटी (२००७)
२१ व्या शतकातील हा सर्वाधिक हिट हॉरर सिनेमा होता. या सिनेमाचा प्लॉट अगदी सिंपल आहे. मात्र कथेत एक कपल दाखवले आहे जे एका नव्या घरात शिफ्ट होतात. त्यापुढेच संपूर्ण कथा सुरु होते. (Horror movies in world)

द कॉन्ज्युरिंग (२०१३)
हा सिनेमा अगदी आवर्जुन पाहिला जातो. जेम्स वॉन यांच्या दिग्दर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या सिनेमाची फ्रेंचाइजीचा हा पहिला सिनेमा आहे. सिनेमाची कथा कॅरोलिन आणि रोजर पेरोन यांच्यावर आहे. ते आपल्या परिवारासह फार्महाउसमध्ये राहतात. त्यानंतर पुढील कथा सुरु होते.


हेही वाचा- डिप्रेशनमध्ये येऊन ‘या’ कलाकारांनी संपवले आपले आयुष्य


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.