Home » सॅम मानेकशॉ यांच्या नेतृत्वाखाली १९७१ मध्ये जेव्हा भारताने पाकिस्तानला गुडघे टेकण्यास भाग पाडले

सॅम मानेकशॉ यांच्या नेतृत्वाखाली १९७१ मध्ये जेव्हा भारताने पाकिस्तानला गुडघे टेकण्यास भाग पाडले

by Team Gajawaja
0 comment
Sam Manekshaw Birth Anniversary
Share

३ एप्रिल, आजच्या दिवशी १९१४ मध्ये देशाच्या पहिल्या फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांचा जन्म झाला होता. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने १९७१ च्या युद्धात पाकिस्तानला गुघडे टेकण्यास भाग पाडले होते. ३ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानी सैन्याने भारतावर हल्ला केला. भारताने पाकिस्तानाच्या या हल्ल्याचे असे उत्तर दिले की, केवळ १३ दिवसांत पाकिस्तानच्या सैन्याला आपली हत्यारे खाली टेकवावी लागलीच. पण त्याचसोबत पाकिस्तानच्या ९० हजारांहून अधिक सैनिकांनी आत्ममर्पण ही केले.(Sam Manekshaw Birth Anniversary)

असे मानले जाते की, एखाद्या युद्धात ऐवढ्या मोठ्या संख्येने सैन्याने हत्यारे खाली टाकत माघार घेणाऱ्यां सौनिकांची ही सर्वाधिक मोठी संख्या होती. १९७१ च्या युद्धात पाकिस्तानचे फार मोठे नुकसान झाले आणि एक नव्या देशाचा त्यावेळी उगम झाला. तो म्हणजे बांग्लादेश. भारतीय सैन्य या यशाचे श्रेय सॅम मानेकशॉ यांना देतात.

वडिलांच्या विरोधात जाऊन सैन्यात भरती झाले
मानेकशॉ यांचा जन्म ३ एप्रिल १९१४ रोजी अमृतसर मध्ये झाला होता. मानेकशॉ यांचे वडिल डॉक्टर होते आणि त्यांना सुद्धा डॉक्टर व्हायचे होते. मानेकशॉ यांना डॉक्टरी शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला जायचे होते. परंतु वडिलांनी त्यासाठी नकार देत असे म्हटले की, परदेशात एकटे जाऊन राहण्यासाठी आता तुझे वय कमी आहे. याच कारणामुळे ते वडिलांवर नाराज झाले. अशातच त्यांनी वडिलांच्या निर्णयाच्या विरोधात आक्रमकतेने सैन्यात भरती होण्यासाठी त्यासंबंधित परिक्षा देऊन तेथे सामील झाले.

इंदिरा गांधी यांना दिला होता १९७१ युद्धावेळी दिला होता खास सल्ला
१९७१ मध्ये जेव्हा पंतप्रधान इंदिरा गांधी यांना असे वाटत होते की, एप्रिल महिन्यात भारत पूर्व पाकिस्तान (आताचा बांग्लादेश) वर हल्ला करावा, पण मानेकशॉ यांनी असे करण्यास स्पष्ट नकार दिला. त्यांनी इंदिरा गांधी यांना असे सांगितले की, यावेळी युद्ध हरण्याची शक्यता आहे.

त्यानंतर त्यांनी इंदिरा गांधी यांच्याकडे युद्धासाठी तयारी करण्याकरिता वेळ मागितली आणि युद्धासाठी सैन्याला तयार केले. अखेर हे युद्ध एप्रिल ऐवजी डिसेंबर मध्ये झाले आणि भारताचा त्यामध्ये विजय झाला.

…जेव्हा मानेकशॉ यांना लागल्या होत्या ७ गोळ्या
दुसऱ्या महायुद्धादरम्यान, देश हा इंग्रजांच्या हातात गेला होता आणि भारतीय जवानांना सुद्धा इंग्रजांच्या सैन्याशी लढावे लागत होते. त्या वेळी मानेकशॉ सुद्धा बर्मा येथे जपानच्या सैन्याविरोधात युद्ध लढत होते. या यु्द्धादरम्यान मानेकशॉ यांना ७ गोळ्या लागल्या होत्या. ते जीवंत राहण्याची शक्यता ही फार पुसट होती, पण डॉक्टरांनी त्यांचे ऑपरेशन करुन सर्व शरिरातील सर्व गोळ्या काढल्या आणि मानेकशॉ यांचा जीव वाचवला.(Sam Manekshaw Birth Anniversary)

हे देखील वाचा- १९७१: जेव्हा भरताने बदलला होता जगाचा नकाशा, पाकिस्ताचे दोन भाग… बांग्लादेशाचा उदय

१९७३ मध्ये सॅम मानेकशॉ यांना फील्ड मार्शल बनवण्यात आले. या पदावर पोहचणारे ते देशाचे पहिलेच सैन्य अधिकारी होती. त्यांना काही पुरस्काराने ही गौरवण्यात आले होते. १९७१ मध्ये भारत सरकारने त्यांना पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. १९७३ मध्ये सैन्याच्या प्रमुख पदावरुन सेवानिवृत्त झाल्यानंतर ते वेलिंगटनाला गेले आणि तेथे गेल्यानंतर जून २००८ मध्ये वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.