Home » इस्रोचे ‘पिता’ म्हणून ओळखले जाणारे विक्रम साराभाई

इस्रोचे ‘पिता’ म्हणून ओळखले जाणारे विक्रम साराभाई

चांद्रयान-3 च्या जबदरस्त यशानंतर विक्रम साराभाई यांची आठवण येतेय. ज्यांनी काही समस्या आणि संसाधनांचा अभाव होता तरीही इंडियन स्पेस अॅन्ड रिसर्च ऑर्गेनाइजेशनची स्थापना केली.

by Team Gajawaja
0 comment
Father of ISRO
Share

चांद्रयान-3 च्या जबदरस्त यशानंतर विक्रम साराभाई यांची आठवण येतेय. ज्यांनी काही समस्या आणि संसाधनांचा अभाव होता तरीही इंडियन स्पेस अॅन्ड रिसर्च ऑर्गेनाइजेशनची स्थापना केली. त्यानंतर या संघटनेने सातत्याने देशाला प्रगतीच्या मार्गावर नेहमीच पुढे नेण्यासाठी काम केले. खरंतर विक्रम साराभाई केवळ एक हुशार वैज्ञानिक होते ज्यांच्या विचारामुळे भारताने इस्रोची स्थापना केली आणि भारताला आपल्या आंतराळ मोहिमांबद्दल विचार करता आला. आज भारताने आंतराळ संशोधनात जेवढा विकास केला आहे त्याचा पाया घालण्यामागे कोणत्या ना कोणत्या रुपात विक्रम साराभाईच आहेत.(Father of ISRO)

१२ ऑगस्ट १९१९ मध्ये अहमदाबाद मध्ये जन्मलेलेल साराभाई केवळ इस्रोचे चेअरमनच नव्हते. त्यांनी इस्रोच्या स्थापनेत फार मोठी भुमिका पार पाडली होती. हे तेच विक्रम साराभाई होते ज्यांनी रशियाचे पहिले आंतराळयान स्पूतनिकच्या प्रक्षेपणानंतर भारत सरकारला यासाठी तयार केले होते की, भारताने सु्द्धा आपले आंतराळ मोहिमा सुरु कराव्यात. साराभाई यांनी आपली डॉक्टरेट क्रँब्रिज युनिव्हर्सिटीतून कॉस्मिक रेंज मध्ये मिळवली होती. १९६२ मध्ये भारत सरकारने त्यांच्या सल्ल्यानुसार नॅशनल स्पेस कमेटी फॉर स्पेस रिसर्चची स्थापना केली.

तर हिच INCOSPAR नंतर स्थापन करण्यात आली. त्याला १९६९ मध्ये इस्रो असे नाव दिले गेले. प्रयत्नांचेच फळ होते की, भारताने १५ ऑगस्ट १९६९ मध्ये इस्रोची स्थापना केली होती. त्यांना याचे पहिले चेअरमन म्हणून निवडले होते. त्यांच्या योगदानाच्या कारणास्तवच त्यांना इस्रोचे पिता असे म्हटले जाते.

साराभाई यांनी होमी जहांगीर भाभा यांच्या मदतीने पहिले रॉकेट लॉन्चिंग स्थापन केले. ते व्यापार, नवाचार आणि विकास क्षेत्रातएक उत्तम विचारधारणेचा व्यक्ती म्हणून ओळखले जायचे. त्यांनी आपल्या याच कौशल्याच्या मदतीने भारतीय खगोलीय भविष्याचा पाया रचला आणि देशात काही आंतराश संसोधनाच्या सुविधांचा पाया घातला.

त्यांच्या योगदानात भारतात पहिल्यांदा सॅटेलाइट आर्यभट्ट यांच्या व्यतिरिक्त भारतात पहिल्या केबल टीव्हीचा सुद्धा उदय झाला होता. १९७५ मध्ये नासाच्या कनेक्शनमुळे सॅटेलाइट इंस्ट्रक्शनल टेलिव्हिजन एक्सपेरिमेंटची स्थापना झाली होती. ते १९६६ ते १९७१ पर्यंत आण्विक उर्जा आयोगाचे चेअरमन राहिले होते. (Father of ISRO)

हेही वाचा- नासामध्ये संधी मिळत असूनही ‘ते’ केवळ देशासाठी इस्रोमध्ये काम करत राहिले… 

तर ३० डिसेंबर १९७१ मध्ये केरळातील तिरुवनन्तपुरमधील कोवलम मध्ये त्यांचे निधन झाले. १९६६ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या विक्रम साराभाई यांना १९७२ मध्ये मरणोपरांत पद्मविभूषाने सन्मानित करण्यात आले होते.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.