Home » नोबेल पुरस्काराने सन्मानित रवींद्रनाथ टागोर यांच्याबद्दलच्या खास गोष्टी

नोबेल पुरस्काराने सन्मानित रवींद्रनाथ टागोर यांच्याबद्दलच्या खास गोष्टी

by Team Gajawaja
0 comment
Rabindranath Tagore Jayanti
Share

Rabindranath Tagore Jayanti: भारताचे राष्ट्रगीत लिहिणारे, कवि आणि नोबल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर यांची ७ मे रोजी जयंती आहे. रवींद्रनाथ टागोर यांना ‘गुरुदेव’ नावाने सुद्धा ओळखले जाते. नोबेल पुरस्काराने सन्मानित केलेले ते पहिलेच भारतीय होते. तसेच टागोर यांनी भारत आणि बांग्लादेशाचे राष्ट्रगीत लिहिले. पण फार कमी लोकांना माहिती आहे की, श्रीलंकेच्या राष्ट्रगीताचा एक हिस्सा हा टागोर यांच्या कवितेतून प्रेरित आहे.

रवींद्रनात टागोर यांचा जन्म ७ मे १९६१ मध्ये जोडासांको मध्ये एका बंगाली घरात झाला होता. भारतात ७ मे तर बांग्लादेशात ९ मे रोजी त्यांची जयंती साजरी केली जाते. रवींद्रनाथ टागोर यांच्या वडिलांचे नाव देवेंद्र टागोर असे होते. तर आई शारदा देवी. टागोर हे १४ भावंडांमध्ये सर्वाधिक लहान होते.

टागोर हे अभ्यात बालपणापासूनच खुप हुशार होते. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण सेंट जेवियर स्कूलमध्ये केले. १८७८ मध्ये इंग्लंड मधील ब्रिचस्टोन पब्लिक स्कूलमध्ये शिकण्यासाठी ते गेले. त्यानंतर लंडन युनिव्हर्सिटी मधून लॉ चे शिक्षण घेतले. पण १८८० मध्ये डिग्री शिवायच देशात परतले. त्यांनी तेव्हापासून लिहिण्यास सुरुवात केली. रवींद्रनाथ टगोर यांनी भारताचे राष्ट्रगीत ‘जन गण मन’ लिहिले. तर बांग्लादेशासाठी ‘आमार सोनार बांग्ला’ लिहिले. टागोर हे कवि, संगीतकार, नाटककार, निबंधकारच नव्हे तर साहित्यात ही फार निपुण होते.

Rabindranath Tagore Jayanti
Rabindranath Tagore Jayanti

बालपणापासूनच टागोर यांना कथा आणि कविता लिहायचे. ते जेव्हा ८ वर्षाचे होते तेव्हा त्यांनी आपली कविता लिहिली होती. वयाच्या १६ व्या वर्षी टागोर यांची पहिली लघुकथा प्रदर्शित झाली होती. टागोर यांनी १९०१ मध्ये पश्चिम बंगालच्या ग्रामीण भागात शांति निकेतन येथे एक प्राथमिक महाविद्यालय सुरु केले. या शाळेत त्यांनी भारत आणि पश्चिमात्य परंपरेचा मेळ घालण्याचा प्रयत्न केला. १९२१ मध्ये हेच कॉलेज विश्व भारती युनिव्हर्सिटी झाले. (Rabindranath Tagore Jayanti)

विश्व धर्म संसदेला दोन वेळा संबोधित करणारे टागोर हे दुसरे भारतीय होते. याआधी स्वामी विवेकानंद यांनी धर्म संसदेला संबोधित केले होते. टागोर यांनी काही कविता आणि पुस्तके लिहिली. काव्यरचना गींताजलीसाठी रवींद्रनाथ टागोर यांना १९१३ मध्ये साहित्यात नोबेल पुरस्कार मिळाले. हा पुरस्कार जिंकरणारे ते पहिलेच नॉन-युरोपीन व्यक्ती होते. पण टागोर यांना हा पुरस्कार थेट स्विकारला नव्हता. खरंतर त्यांच्या ऐवजी तो ब्रिटेनच्या एका राजदूताने तो घेतला होता.

हेही वाचा- मृत्यूनंतर चोरला होता आइंस्टाइन यांचा मेंदू

ब्रिटिश सरकारने रवींद्रनाथ टागोर यांनी ‘सर’ या उपाधीने गौरविले. पण जलियनवाला बाग हत्याकांडानंतर त्यांनी ती उपाधी परत दिली. टागोर यांना बॅरिस्टर व्हायचे होते.त्यांच्या बद्दल असे म्हटले जाते की, रवींद्रनाथ टागोर यांना कलर ब्लाइंडनेस होता. त्यांना प्रोस्टेट कॅन्सर होता. ७ ऑगस्ट १९४१ रोजी टागोर यांचे निधन झाले होते.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.