Home » असे पडले एम करूणानिधींच्या मुलाचे नाव स्टॅलिन

असे पडले एम करूणानिधींच्या मुलाचे नाव स्टॅलिन

तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टालिन प्रत्येक वेळी आपल्या विधानांमुळे चर्चेत असतात. मात्र यावेळी स्टालिन यांचा मुलगा उदयनिधी स्टालिन यांच्याबद्दल चर्चा सुरु आहे.

by Team Gajawaja
0 comment
M krunanishdi son
Share

तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टालिन प्रत्येक वेळी आपल्या विधानांमुळे चर्चेत असतात. मात्र यावेळी स्टालिन यांचा मुलगा उदयनिधी स्टालिन यांच्याबद्दल चर्चा सुरु आहे. खरंतर तमिळनाडू सरकारमध्ये क्रिडा मंत्री असलेल्या उदयनिधी यांनी सनातन धर्माबद्दल एक विधान केले आहे. त्यात त्यांनी असे म्हटले की, सनातन धर्म मच्छरांद्वारे पसरणारा डेंग्यू आणि मलेरिया आहे. (M Karunanidhi son)

सनातन धर्मावर असे विधान केल्यानंतर करुणानिधी यांचा पुत्र एमके स्टालिन आणि नातून उदयनिधी यांच्या धर्मासह नावावरुन वाद सुरु झाला आहे. यामुळेच स्टालिन नाव हे चर्चेत आले आहे. लोक आता असा प्रश्न विचारू लागले आहेत की, अखेर करुणानिधींच्या परिवारात स्टालिन हे नाव कोठून आले? खरंतर सोवियत संघाच्या बड्या राजकीय नेत्याचे नाव जोसेफ स्टालिन असे होते. अखेर एमके स्टालिन आणि जोसेफ स्टालिन यांच्यात काय संबंध हे जाणून घेऊयात.

करुणानिधी कोण होते?
एम करुणानिधी यांचे पूर्ण नाव मुत्तूवेल करुणानिधी होते. ते द्रविड मुनेत्र कडगम म्हणजेच DMK चे नेता आणि पाच वेळा तमिळनाडूचे मुख्यमंत्री होते. मात्र करुणानिधी यांनी आपल्या करियरची सुरुवात तमिश सिनेमा उद्योगात पटकथा लेखकाच्या रुपात केली होती. येथूनच हळूहळू ते राजकरणात आले आणि कुशल राजकीय नेते झाले. करुणानिधी यांनी तमिळ सिनेमा ‘पराशक्ती’ही तयार केला. या सिनेमात द्रविड आंदोनलाच्या विचारधारेचे समर्थन करण्यात आले होते. तर रुढीवादी हिंदू सिनेमाच्या विरोधात होते. कारण यामध्ये ब्राम्हणवादावर टीका करणारे तत्व होते.

स्टालिनच्या नावाचा इतिहास
स्टालिन नावाचा एक मोठा इतिहास आहे. खरंतर सोवियत संघाच्या एका बड्या राजकीय नेत्याचे नाव जोसेफ स्टालिन होते. त्याला सर्वाधिक क्रूर शासक मानले जात होते. १९२२ ते १९५३ पर्यंत त्यांनी सोवित संघाचे नेतृत्व केले होते. खास गोष्ट अशी की, जोसेफ स्टालिनची तुलना हिटलरशी केली जायची. साम्यवादावा प्रोत्साहन देणारे स्टालिन यांना काहीवेळेस हिटलरपेक्षा ही अधिक खतरनाक मानले गेले होते. स्टालिनने सोवित संघाला ऐवढे मजबूत बनवले होते की , दुसऱ्या महायुद्धात हिटलरच्या जर्मन सैन्याला सुद्धा हार पत्करावी लागली होती. असे सुद्धा म्हटले जाते की, स्टालिनच्या नितींमुळे लाखो लोकांचा जीव गेला होता. (M Karunanidhi son)

१९५३ मध्ये स्टालिनचा जन्म झाला होता
करुणानिधी यांनी तीन विवाह केले. त्यांचा मुलगा आणि तमिळनाडूचे सध्याचे मुख्यमंत्री एमके स्टालिन यांचा जन्म १ मार्च १९५३ ला झाला होता. असे मानले जाते की, करुणानिधी यांनी एमके स्टालिन नाव हे जोसेफ स्टालिन यांच्या नावावरुनच ठेवले होते. कारण करुणानिधींना जोसेफ स्टालिन आणि त्यांचे किस्से फार आवडायचे. ५ मार्च १९५३ रोजी त्यांचे निधन झाले. त्यानंतर स्टालिन नावावर खुप चर्चा झाली. पाहता पाहता करुणानिधी यांनी आपल्या मुलाचे चार दिवसांनी नाव एमके स्टालिन असे ठेवले.

हेही वाचा-  केवळ राजकरणच नव्हे तर क्रिकेट आणि कॉर्पोरेटमध्ये ही शरद पवारांची होते चर्चा

करुणानिधी यांचा तिसरा मुलगा स्टालिन
एमके मुथु आणि एमके अलागिरी यांच्यानंतर एमके स्टालिन करुणानिधींचे तिसरे पुत्र आहेत. एमके मुथु यांना सिनेमात फार आवड होती. तर स्टालिन यांना राजकरणात यायचे होते. हा तो काळ होता जेव्हा डीएमके नेते अन्नादुरई यांचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा केला जात होता. अशातच एमके स्टालिन तरुणांची एक संस्था तयार करण्यात आली. येथूनच डीएमचे युथ विंग तयार झाली. एमके स्टालिन यांनी पहिल्यांदा १९६८ मध्ये चेन्नईत महापालिका निवडणूकीत डीएमकेसाठी प्रचार केला होता. १९८९ मध्ये पहिल्यांदा ते आमदार झाले होते.

 

 


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.