Home » शी जिनपिंगच्या कार्यकाळात किती बदलला चीन, वाचा सविस्तर

शी जिनपिंगच्या कार्यकाळात किती बदलला चीन, वाचा सविस्तर

by Team Gajawaja
0 comment
Xi Jinping
Share

चीनमध्ये पुन्हा ‘शी-युग’ चालूच राहणार आहे. राष्ट्राध्यक्षाच्या रुपात शी जिनपिंग हे आपला कार्यकाळ सुरु करणार आहेत. कम्युनिस्ट पार्टीचा रबर स्टॅम्प मानल्या जाणाऱ्या चीनच्या संसदेने बिनविरोध त्यांना आपले समर्थन दिले. जवळजवळ ३ हजार सदस्यंच्या सदस्यांनी त्यांच्या पक्षाच्या बाजूने मत दिले आणि पुन्हा एकदा त्यांना देशातील सर्वोच्च नेता म्हणून निवडले. (Xi Jinping)

कम्युनिस्ट पार्टी ऑफ चाइनाने एका दशकापूर्वी शी जिनपिंग यांना निवडले होते. तेव्हा कोणताही नेता सातत्याने १० वर्षापर्यंत एकाच पदावर कायम राहिल असा नियम होता. मात्र जिनपिंगच्या शासन काळात हा नियम बदलला गेला. याच बदलावामुळे जिनपिंग यांना तिसऱ्यांदा देशातील राष्ट्राध्यक्ष बनण्याची संधी मिळाली.

भारताशी वाद आणि कोरोनाच्या काळातील काही गोष्टी पाहता यासाठी नकार दिले जाऊ शकत नाही की, एका राष्ट्राच्या रुपात गेल्या एक दशकाता चीन मोठी शक्ती म्हणून उभा राहिले आहे. माओत्से तुंग यांच्या दरम्यान गोरिल्ला कमांडर राहिलेले शी झोंगशुन यांचा मुलगा जिपिंग यांनी १० वर्षात चीनला फार पुढे नेले आहे. गेल्या एका दशकात जिनपिंगच्या काळात चीनने काही संधी आपल्या नावावर ही केल्या आहेत.

संघर्षात्मक आयुष्य जगले
बीजिंगमध्ये १५ जून १९५३ मध्ये कम्युनिस्ट पार्टीचे अधिकारी शी झोंगशुन यांच्या घरी जिनपिंग यांचा जन्म झाला. पिता झोंगशुन चीन मध्ये सुरु असलेल्या गृह युद्धातील माजी गुरिल्ला कमांडर होते. ज्या संघर्षानंतर १९४९ मध्ये कम्युनिस्ट पार्टी सत्तेत आली. जिनपिंग यांनी अन्य नेत्यांपेक्षा त्यांना आपले वडिल क्रांतिकारी आणि उदार असल्याचे वाटले.

माओने त्यांना शिक्षण आणि प्रचार मंत्री बनवले. दरम्यान नंतर झोंगशुन आणि माओमध्ये मतभेद निर्माण झाल्यानंतर परिवाराला निर्वासित केले गेले. क्रांतीच्या त्या काळात जिनपिंग यांना वयाच्या १३ व्या वर्षात शाळा सोडावी लागली. जिनपिंग जसे मोठे झाले तेव्हा बीजिंगच्या प्रतिष्ठिश शिंहुआ युनिव्हर्सिटीतून केमिकल इंजिनिअरिंगचा अभ्यास पूर्ण केला.

राजकरणातील एन्ट्री
१९७४ मध्ये सीपीसी मध्ये सहभागी होण्यास ते यशस्वी झाले. पार्टीत राहून खुप काम केले. शांत आणि धीर-गंभीर दिसणारा हा नेता स्वत:ला माओत्से तुंग यांच्यामुळे प्रभावित होत गेला. वर्ष २०१२ मध्ये जिनपिंग कम्युनिस्ट पार्टीचे महासचिव बनले आणि त्याच्या पुढील वर्षात चीनचे राष्ट्राध्यक्ष झाले.

सत्ता सांभाळण्यासह जिनपिंग (Xi Jinping) यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात एक कठोर अभियान ही चालवले. त्याच्या मदतीने सर्वसामान्य लोकांमध्ये ते अधिकच लोकप्रिय झाले. २०१८ मध्ये त्यांचा ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांनी त्यांनी राष्ट्राध्यक्षाच्या कार्यकाळाची ही सीमा रद्द केली होती. चीनच्या राष्ट्राध्यक्षाच्या रुपात त्यांनी १० वर्ष पूर्ण केले आणि आपल्या पुढील कार्यकाळात त्यांनी प्रवेश केला.

हे देखील वाचा- सोवित संघाचे संस्थापक लेनिन यांचा मृत्यू कसा झाला?

जिनपिंग यांच्या निर्णयांवर टीका
जिनपिंग यांच्या कार्यकाळात भले चीनची प्रगती झाली. मात्र काही प्रकरणांमध्ये ते अयशस्वी झाले. कोरोना काळात संपूर्ण जगाने चीनला अयशस्वी म्हणून पाहिले. महारोग पसरवण्याचा त्यांच्या संशयात्मक भुमिकेबद्दल जागतिक स्तरावर त्यांची इमेज खराब झाली. चीनमध्ये जनतेने सरकारच्या विरोधात खुप आंदोलन ही केले. ज्या झिरो कोविड पॉलिसीचे पालन करण्यास भाग पाडले खरे पण त्यामुळे लोकांमध्ये एका काळानंतर संताप व्यक्त झाला. जगातील १७ देशांसोबत त्यांचे संबंध बिघडले गेले आहेत. ते बिघडलेले संबंध सुधारतील असे दिसून ही येत नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.