Home » ग्रहांच्या युतीमुळे होणार ‘या’ राशीला फायदा

ग्रहांच्या युतीमुळे होणार ‘या’ राशीला फायदा

by Team Gajawaja
0 comment
Weekly Horoscope
Share

प्रत्येकजणला आपल्या जीवनात पुढे काय होणार आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता असते. मग ते करिअरच्या बाबतीत असो, आरोग्याच्या बाबतीत असो, धन लाभाच्या बाबतीत असो की अगदी प्रेमाच्या बाबतीत… त्यामुळे हा आठवडा बारा राशींसाठी कसा असेल, कोणत्या राशींवर कुठल्या ग्रहांचा प्रभाव असेल हे जाणून घेऊयात…(Weekly Horoscope 01 May to 07 May)

मेष – मे महिन्याच्या सुरुवातीलाच आपल्या राशीचा धनेश शुक्र राशीच्या पराक्रम स्थानात प्रवेश करत आहे, तेथेच असलेल्या लग्नेश मंगळाशी शुक्राची युती झाल्यामुळे धाडसी निर्णय घेतले जातील. आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ द्याल. लग्नातील रवी, बुध, गुरु, राहू आणि चंद्राचे होणारे पंचमस्थानातून भ्रमण विवाहेच्छूक तरुणांना मनाजोगा जोडीदार देणारे राहील. आपली रास ही रवीची उच्चरास असल्यामुळे रवी, गुरुची होणारी युती सामाजिक प्रतिष्ठा उंचावणारी राहील. तसेच अनेक क्षेत्रात मनाजोग्या घटना घडतील. नोकरीत सुसंधी चालून येतील. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. भागीदारी व्यवसायात मात्र स्वतः लक्ष घालण्याची गरज राहील नाहीतर नुकसान होण्याची शक्यता राहते. आठवड्याच्या उत्तरार्धात कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका. मन सैरभैर होणाऱ्या घटना घडू शकतील.

शुभ दिनांक – 4 ते 6

वृषभ – राशी स्वामी शुक्र आपल्या राशीच्या धनस्थानात प्रवेश करत आहे. तेथेच असलेल्या व्ययेश मंगळाशी शुक्राची युती होईल. तर सुखस्थानातून चंद्राचे भ्रमण होणार आहे. त्यामुळे अर्थार्जन जरी चांगले झाले तरी अनपेक्षित खर्च उद्भवू शकतात. त्यामुळे पूर्वनियोजित तजवीज करून ठेवण्याची गरज आहे. घरातील सुख सुविधा वाढवण्याच्या दृष्टीने इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तूंची खरेदी केली जाईल. शेती व्यवसाय तसेच वडिलोपार्जित जमिनीचे व्यवहार मार्गी लागतील. संततीच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. नवीन मैत्रीला उजाळा मिळेल. नोकरी व्यवसायातील कामाचा व्याप वाढल्यामुळे प्रकृतीकडे दुर्लक्ष होऊ शकते. परदेशात व्यवसाय उद्योगाची व्याप्ती वाढवण्यात यश येईल. उत्तरार्धात जोडीदाराचे चांगले सहकार्य लाभेल. आपल्या अंगभूत कला गुणांना चांगला वाव मिळेल.

शुभ दिनांक – 6, 7

मिथुन – राशीत आलेले मंगळ, शुक्र आणि पराक्रमातून भ्रमण करणारा चंद्र आपल्या कर्तृत्वाला चांगली झळाळी देणारा राहील. अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल. कवी, कलाकार यांच्या उत्कर्षासाठी ग्रहमान अनुकूल आहे. उंची वस्त्रालंकारांची खरेदी केली जाईल. घरात पाहुण्यांची वर्दळ राहील. गृहसुशोभीकरणासाठी आकर्षक, शोभेच्या वस्तूंची खरेदी कराल. मातृसौख्य लाभेल. धार्मिक स्थळांना भेटी द्याल. आध्यात्मिक प्रगती होईल. हातून दान धर्म होतील. स्पर्धात्मक परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना अथक परिश्रम करण्याची गरज आहे. प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे या उक्तीची आठवण ठेवून परिश्रम केलेत तर यशाची गोळी नक्कीच चाखता येईल. भावंडांच्या गाठीभेटी होतील. मामा, मावशीचा एखादा सल्ला उपयोगी पडेल.

शुभ दिनांक – 2, 3

कर्क – दशमेश मंगळ आणि लाभेश शुक्र यांचे भ्रमण आपल्या राशीच्या व्ययस्थानातून होत आहे तर चंद्राचे भ्रमण आपल्या राशीच्या धनस्थानातून होत आहे. दशमस्थानातील ग्रहाधिक्यामुळे अर्थार्जनासाठी आपणास अनेक मार्ग खुले राहतील. तरुणांना नवीन नोकरीच्या संधी चालून येतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल अशी खरेदी केली जाईल. परदेशस्थ भावंडांची सुसंवाद साधाल. कुटुंबात धार्मिक शुभ समारंभाचे आयोजन केले जाईल. स्वजनांच्या गाठीभेटी होतील. रंगाचा बेरंग होणार नाही याची काळजी आपणास घ्यावी लागेल. उत्तरार्धात संततीच्या संबंधी सुवार्ता कानी येतील. उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याचे प्रयत्न करत असलेल्या विद्यार्थ्यांना यश येईल. संशोधन पर अभ्यासक्रमातून पुरस्कार प्राप्त होतील. करमणुकीच्या कार्यक्रमातून आनंद घ्याल.

शुभ दिनांक – 1 ते 3

सिंह – आपल्याच राशीतून आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण होत आहे, तर रवी, बुध, गुरु, राहू आणि हर्षल यांचे भाग्यस्थानातून आणि शुक्र- मंगळाचे लाभस्थानातून भ्रमण होत आहे. असे अतिशय अनुकूल असे ग्रहमान आपल्याला लाभलेले आहे. सामाजिक, राजकीय क्षेत्रात नावलौकिक लाभेल. आपल्याला अनेक सुसंधी चालून येतील त्याचा निश्चित फायदा घ्यावा. वैयक्तिक तसेच कौटुंबिक उत्कर्षामुळे मन प्रसन्न राहील. रेंगाळलेली सरकारी कामे, वडिलोपार्जित जमीन जुमल्या संबंधीची कामे मार्गी लागतील व त्यातून फायदा होईल. भावंडांशी सलोख्याचे संबंध ठेवावेत. उत्तरार्धात स्वजनांच्या गाठीभेटीमुळे आनंदी वातावरण राहील. धार्मिक शुभ समारंभात सहभागी व्हाल. अध्यात्मिक प्रगती होईल.

शुभ दिनांक – 1 ते 3

कन्या – राशीच्या व्ययस्थानातून होणारे चंद्राचे भ्रमण कामानिमित्त प्रवास योग दर्शविते. व्यवसाय उद्योगात मोठे प्रकल्प हाती घ्याल. धाडसी निर्णय घेतले जातील. कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका. कवी, कलाकार यांना चाहत्यांकडून चांगली दाद मिळेल. अंगभूत कला गुणांना चांगला वाव मिळेल. आपले आवडते छंद जोपासता येतील. अष्टमस्थानातील ग्रहाधिक्यामुळे महत्त्वाची कागदपत्रे जरी हाती लागली तरी तूर्तास कोणत्याही कागदपत्रांवर सही करू नका. योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन घ्यावे. कर्मस्थानात होणाऱ्या मंगळ, शुक्राच्या युतीमुळे आपणावर मातालक्ष्मी प्रसन्न राहील. संत सज्जनांचा सहवास लाभेल. धार्मिक कार्यात रुची वाढेल. तीर्थस्थळांना भेटी द्याल. दानधर्म कराल. उत्तरार्धात भावंडांचे सहकार्य लाभेल.

शुभ दिनांक – 6, 7

तूळ – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या लाभस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. पंचमस्थानात शनि तर सप्तमस्थानातून रवी, बुध, गुरु, राहू आणि हर्षल यांचे भ्रमण होत आहे. विवाहेच्छूक तरुणांना मनपसंत जोडीदार मिळेल. भाग्यस्थानातील मंगळ शुक्रामुळे जोडीदाराबरोबर सहलीला जाण्याचे योग येतील. भागीदारी व्यवसायातून नवीन प्रकल्प राबवले जातील. जुनी व्यावसायिक येणी वसूल होतील. सामाजिक पतप्रतिष्ठा उंचावेल. करमणुकीच्या कार्यक्रमातून आनंद घ्याल‌. आपल्या उत्तम संवाद शैलीमुळे अनेकांना आपलेसे कराल. नवीन ओळखी होतील, त्यातून भविष्यात निश्चित लाभ होतील. उत्तरार्धात घरात पाहुण्यांची वर्दळ राहील. आनंदी आणि प्रसन्न वातावरणामुळे हा आठवडा आपल्याला खूप समाधान देणारा राहील.

शुभ दिनांक – 4 ते 6

वृश्चिक – आपल्या राशीच्या दशमस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. तर षष्ठस्थानात रवी, बुध, गुरु, राहू आणि हर्षल असल्यामुळे नोकरीत अनपेक्षित चांगल्या संधी चालून येतील. मिळालेल्या संधीचा नक्कीच फायदा घ्यावा. आपल्या चांगल्या कामामुळे वरिष्ठांकडून प्रशंसा केली जाईल. महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या जातील. सरकारी नोकरीसरकारी नोकरीत कार्यरत असणाऱ्यांची मला जोग्या ठिकाणीबदली होईल. कोणतेही काम करताना समजदारीने करावे. अष्टमस्थ‌ शुक्र – मंगळामुळे कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक त्रासदायक ठरेल. वाहन चालवताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे. व्यवसाय उद्योगाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाली केल्या जातील. त्यातून अनपेक्षित चांगले अर्थार्जन होईल.

शुभ दिनांक – 1, 2

धनु – राशी स्वामी गुरु बरोबर भाग्येश दशमेश रवी बुधाचे होणारे भ्रमण आपणास अनुकूल फलदायी ठरेल. संततीच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. उच्च शिक्षणासाठी बाहेर जाण्याचे प्रयत्न करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना यश लाभेल. संशोधन पर अभ्यासक्रमातून यश लाभेल. धार्मिक स्थळांना भेटी द्याल. अध्यात्मिक उन्नती होईल. नवपरिणींना गोड बातमीची चाहूल लागेल. सप्तमातील मंगळ- शुक्रामुळे जोडीदाराचे चांगले सहकार्य लाभेल. विवाहेच्छूक तरुणांना मनपसंत जोडीदार मिळेल. नोकरीत बढती बदलीचे योग संभवतात. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. उत्तरार्धात करमणुकीच्या कार्यक्रमातून आनंद मिळेल.

शुभ दिनांक – 3, 4

मकर – आपल्या राशीच्या सुखस्थानातून रवी, बुध, गुरु, राहूचे होणारेे भ्रमण घरातील वातावरण अतिशय आनंदी आणि उत्साही ठेवणारे राहील. नवीन वाहन-वास्तूचेे योग येतील. घरात धार्मिक शुभ समारंभाचे आयोजन केले जाईल. आप्तस्वकीयांच्या गाठीभेटी होतील. रेंगाळलेली सरकारी कामे मार्गी लागतील. प्रकृतीच्या तक्रारी दूर होतील. मोठ्या उत्साहाने आणि धाडसाने काही निर्णय घेतले जातील. व्यवसाय उद्योगात नवीन कार्यारंभ होतील. आपल्या इच्छा, आकांक्षा पूर्ण होण्याच्या दृष्टीने या आठवड्यातील ग्रहमान अतिशय अनुकूल राहील. उत्तरार्धात कामानिमित्त प्रवास घडतील. विदेशात आपला व्यवसाय सुरू करण्याच्या दृष्टीने निर्णय घ्याल.

शुभ दिनांक – 6, 7

कुंभ – आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या सप्तमस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. जोडीदाराबरोबर चांगला वेळ व्यतीत करता येईल. महत्त्वाचे कौटुंबिक निर्णय घेतले जातील. पराक्रमस्थानातील रवी, बुध, गुरु, राहूमुळे आपली सामाजिक पतप्रतिष्ठा उंचावणार आहे. नवीन संधी चालून येतील. व्यवसाय उद्योगासाठी केलेली बोलणी यशस्वी होतील. भावंडांचे सहकार्य लाभेल. तीर्थस्थळांना भेटी द्याल. हातून पुण्यकर्म घडेल. एकापेक्षा अधिक व्यवसाय करण्याच्या दृष्टीने थोरा-मोठ्यांचे सहकार्य लाभेल. आपल्या मेहनतीने, चिकाटीने व उत्तम बुद्धिमत्तेच्या जोरावर यश संपादन कराल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ग्रहमान अनुकूल राहील.

शुभ दिनांक – 4 ते 6

मीन – आपल्या राशीच्या धनस्थानातून रवी, बुध, गुरु आणि राहूचे भ्रमण तर सुखस्थानातून मंगळ- शुक्राचे भ्रमण होत आहे. आपल्या आमदानीमध्ये मनाजोगी वाढ होणार आहे. व्यावसायिकांसाठी ग्रहांचे हे गोचर भ्रमण अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे. आपल्या उत्तम संवाद शैलीच्या जोरावर मोठी मजल माराल. घरात शुभ कार्याचे आयोजन केले जाईल. स्वजनांच्या गाठीभेटी होतील. घरातील सुख सुविधा वाढवण्याच्या दृष्टीने इलेक्ट्रॉनिक्सच्या तसेच आकर्षक शोभेच्या वस्तूंची खरेदी केली जाईल. सामाजिक पतप्रतिष्ठा उंचावेल. जोडीदाराचे चांगले सहकार्य लाभणार आहे. भागीदारी व्यवसायातून लाभ होतील. मात्र कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका.

शुभ दिनांक – 2, 3

  • श्री बालाजी ज्योतिषालय आणि वास्तू कन्सल्टन्सी, पुणे 

9011149780 / 8668293104

टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असू असेही नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.